मिरज
मिरज : महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचे कर्नाटक सीमेजवळील मुख्य ठिकाण. हे सांगलीच्या आग्नेयीस ९·६५ किमी व कोल्हापूरच्या पूर्वेस सु. ४८ किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या १,०५,४५५ (१९८१). मिरज द. मध्य रेल्वेच्या पुणे-बंगलोर लोहमार्गावरील एक महत्त्वाचे प्रस्थानक असून ते कोल्हापूर, सांगली (माधवनगर), गोवा, पंढरपूर इ. ठिकाणांशी लोहमार्गाने जोडलेले आहे.