डिट्रॉइट
डिट्रॉइट : अमेरिकेचे ‘मोटार सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेले, मिशिगन राज्यातील सर्वांत मोठे शहर व डिट्रॉइट नदीवरील बंदर. लोकसंख्या १५,१४,०६३ (१९७०); उपनगरांसह ४४,४६,८०० (१९७३). फ्रेंचमध्ये डिट्रॉइट म्हणजे सामुद्रधुनी. फ्रेंच वसाहतकऱ्यांना १७०१ मध्ये ही नदी सामुद्रधुनी वाटली म्हणून त्यांनी शहराला व नदीला डिट्रॉइट हे नाव दिले.