चोरटा व्यापार
आयात शुल्क चुकवून अथवा विधिप्रतिवेधाला झुगारून केलेली मालाची ने-आण. इंग्लंडमध्ये हिणकस नाण्यांची आयात राष्ट्रद्रोही ठरविणारे विधी चौदाव्या शतकापासून करण्यात आले. अशा आयातकाला अद्यापिही गुन्हेगार मानले जात असले, तरी तो नैसर्गिक न्यायाचा भंग करीत नाही, अशी तरफदारी अठराव्या शतकात प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अॅडम स्मिथने केली होती.