ऱ्हीसस घटक
(Rh किंवा आरएच घटक). बहुसंख्य व्यक्तींच्या रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) पृष्ठावरील पटलात आनुवंशिक रीत्या आलेली अनेक वैशिष्ट्यदर्शक प्रथिनद्रव्ये असतात. ABO या मुख्य रक्तगट पद्धतीशिवाय [मुख्य रक्तगट निदर्शक प्रतिजनांशिवाय; ⟶रक्तगट] आढळणाऱ्या या अनेक घटकांना मिळून Rh घटक असे संबोधण्यात येते.