लाइपसिक
जर्मन लोकशाही प्रजासत्ताकातील (पूर्व जर्मनीतील) याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय, पूर्व बर्लिननंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक शहर. लोकसंख्या ५,५३,७०० (१९८५ अंदाज). हे शहर पूर्व बर्लिनच्या नैर्ऋत्येस १८२ किमी. अंतरावर प्लाइस, पार्ट व व्हाइस एल्स्टर या तीन नद्यांच्या संगमावर सस. पासून १२२ मी. उंचीवर वसले आहे.