लायडन
नेदर्लंड्समधील याच नावाच्या प्रांताचे मुख्यालय. लोकसंख्या १,०६,८०८; महानगर १,८१,०९५ (१ जानेवारी १९८७). लायडन हे देशाच्या पश्चिम भागात, द हेगच्या ईशान्येस १६ किमी., तर ॲम्स्टरडॅमच्या नैऱ्ऋत्येस ४८ किमी.वर ओल्ड ऱ्हाईन व न्यू ऱ्हाईन या नद्यांच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ‘लगड्यूनम बॅटव्होरम’ या नावाने ओळखले जाणारे हे शहर मूलतः रोमन नाही असे म्हटले जाते.