वृक्षपूजा
वृक्षपूजा : वृक्ष हे सचेतन असून त्यांत देवता किंवा विविध प्रकारच्या चांगल्या-वाईट शक्ती असतात, अशी समजूत असते. त्यामुळे अशुभ-निवारणासाठी किंवा शुभफलासाठी वृक्षपूजा अनेक देशांत प्रचलित आहे. आफ्रिका खंडातील सूदानमध्ये झाडांना उद्देशून कोंबड्यांचे बळी दिले जातात. तेथील वृक्षपूजेमागे पीक भरपूर येणे, आरोग्यप्राप्ती, संततीची प्राप्ती, शिकार मिळणे ह्यांसारखे उद्देश असतात.