जखमी
जखमी : (बांदुर्गी; हिं. अलियार; इं. स्विच सॉरेल, कँडलवुड; लॅ. डोडोनिया व्हिस्कोजा; कुल-सॅपिंडेसी). ह्या बळकट पण बारीक खोड व फांद्या असलेल्या आणि सु. पुरुषभर उंचीच्या सदापर्णी क्षुपाचा (झुडपाचा) प्रसार भारतात सर्वत्र असून श्रीलंका, पाकिस्तान व इतर ऊष्ण देशांत ते सामान्यपणे आढळते. ते बहुधा रुक्ष व उघड्या जागी वाढते. बागेभोवती गर्द हिरव्या कुंपणाकरिता ते लावतात.