पोर्ट ऑफ स्पेन
पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिज बेटांमधील त्रिनिदाद व टोबॅगो या देशाची राजधानी आणि प्रमुख बंदर. लोकसंख्या १,२०,००० (१९७७ अंदाज). हे त्रिनिदाद बेटाच्या वायव्य भागात पारीआ आखातावर वसले असून ते व्हेनेझुएलातील पारिआ द्विपकल्पाच्या पूर्वेला आहे. हे शहर त्रिनिदादच्या अंतर्गत भागाशी रस्त्यांनी जोडले असून, त्याच्या आग्नेयीस सु. २६ किमी.वर पीआर्को येथे विमानतळ आहे.