অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोलर स्टिल्स्

सोलर स्टिल्‍स्

ग्रामीण स्त्रियांना, विशेषत: खार्‍या पाण्‍याच्‍या प्रदेशांमध्‍ये राहणार्‍यांना पिण्‍यासाठी पाणी आणणे व ते साठवून ठेवण्‍यासाठी शुध्‍द/स्‍वच्‍छ करणे फार कठीण जाते. वॉटर स्टिल अशुध्‍द पाण्‍यास सूर्यकिरणांचा वापर करून शुध्‍द व पिण्‍यायोग्य करते – म्‍हणून एक सामान्‍य, कमी खर्चिक आणि टिकाऊ नूतनीकरणीय उर्जा तंत्रज्ञान आहे.

निर्मिती

सोलर वॉटर स्टिलमध्‍ये इच्‍छित क्षमतेची, स्‍थानिक स्‍वरूपांत मिळणार्‍या अशा स्‍वदेशी सामग्रीपासून तयार करण्‍यात आलेली एक लहान उथळ टाकी असते. टाकीच्‍या तळास योग्‍य अशा काळ्या रंगाने रंगवितात. टाकीला काचेचे झाकण लावतात ज्‍याला लाकडाच्‍या फळ्यांचा आधार देऊन कलते छप्‍पर बनवितात. स्टिलचा मध्‍यभाग उंच ठेवतात आणि काचेच्‍या शीटस् बाजूच्‍या भिंतींना स्‍पर्श करीत असतात.

Solar still

पध्दत

ही तंत्रज्ञान सोप्‍या अशा बाष्पीभवन-संक्षेपण सिद्धांतावर आधारित आहे ज्‍यानुसार सूर्य  समुद्री पाण्‍याचे बाष्पीभवन करतो आणि मग पाणी थंड होऊन शुध्‍द पाण्‍याचा पाऊस पडतो. टाकीचा काळा तळ उर्जा शोषून घेतो आणि उष्‍ण होतो. ह्या उष्‍णतेचे बाष्पीभवन होते आणि जेव्‍हां हे पाणी थंड होते तेव्हां पिण्‍यायोग्‍य अशा शुध्‍द पाण्‍याचे थेंब काचेच्‍या शीटवर एकत्र होऊन टाकीत निथळतात. हे शुद्ध पाणी एका चॅनलमधून नळांमध्‍ये पाठविण्‍यात येते. म्‍हणून, आपणांस पिण्‍यायोग्‍य पाणी फक्‍त नळाची तोटी फिरविताच मिळते आणि पुढे वापर करण्‍यासाठी तुम्‍ही ते साठवूही शकता. ह्या स्टिलद्वारे क्षेत्रांतील दर चौरस मीटरवर सरासरी दर दिवशी पिण्‍यायोग्‍य 2 ते 3 लिटर पाणी मिळते.

 

स्रोत: केन्द्रीय क्षार व समुद्री रसायन संशोधन संस्था, (CSMCRI) गिजूभाई बाडेकर मार्ग, भावनगर-364 002, गुजरात

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate