অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रदूषणविरहित इंधनासाठी बायोगॅस

प्रदूषणविरहित इंधनासाठी बायोगॅस

बायोगॅस एक स्वस्त व प्रदूषणविरहित इंधन आहे. बायोगॅस सयंत्रापासून गॅस आणि उत्तम खताच्या स्वरूपात दुहेरी फायदा होतो.

बायोगॅस एक स्वस्त व प्रदूषणविरहित इंधन आहे. यामध्ये 55 ते 70 टक्के पर्यंत ज्वलनशील मिथेन वायू असतो. तसेच 30 ते 45 टक्के कार्बन डायऑक्‍साइड वायू असतो. या व्यतिरिक्त नायट्रोजन, हायड्रोजन सल्फाइड अत्यल्प प्रमाणात असते. या सर्व उत्सर्जित वायूमध्ये केवळ मिथेन वायू हा ज्वलनशील आहे.

  1. बायोगॅस एक उत्कृष्ट इंधन आहे. बायोगॅस सयंत्रात शेण व इतर जैविक पदार्थांवर हवेच्या अनुपस्थितीमध्ये किंण्वन प्रक्रिया होते.
  2. एक घन मीटर बायोगॅसचे उष्णतामान जवळजवळ 4700 किलो कॅलरी आहे. बायोगॅस उत्पादनाव्यतिरिक्त या संयत्राद्वारा उच्च गुणवत्तेचे जैविक खत निर्मिती करता येऊ शकते.
  3. बायोगॅस एक स्वस्त व प्रदूषणविरहित इंधन आहे. ज्याचा उपयोग सर्वसाधारणपणे घरगुती स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात होतो.
  4. बायोगॅस सयंत्रापासून गॅस आणि उत्तम खताच्या स्वरूपात दुहेरी फायदा होतो. स्वयंपाक घरामध्ये डोळे आणि फुफ्फुसाचा आजार करणाऱ्या धुरापासून मुक्तता मिळते. बायोगॅसवर अन्न शिजवल्यास वेळेची बचत होते. भांडे काळे होत नाही.

बायोगॅस सयंत्राचे प्रकार

अ) तरंगता ड्रम प्रकार 
1) के.व्ही.आय.सी. बायोगॅस संयंत्र 
2) प्रगती बायोगॅस संयंत्र

ब) स्थिर डोम प्रकार 
1) जनता बायोगॅस संयंत्र 
2) दीनबंधू बायोगॅस संयंत्र 
3) मोडिफाईड दिनबंधू संयंत्र 
4) पी.वी.सी. निर्मित गोबरगॅस संयंत्र

क) बलुन प्रकारातील बायोगॅस संयंत्र 
1) थैली प्रकार गोबरगॅस (बायोगॅस) संयंत्र 
2) लवचिक थैली प्रकार गोबरगॅस संयंत्र

बायोगॅस संयंत्राचे भाग

कुठल्याही प्रकारच्या बायोगॅस संयंत्राला दोन मुख्य भाग व चार पूरक भाग असतात. मुख्य भागामध्ये प्रथम भाग डायजेस्टर (सडविणारा भाग) व दुसरा भाग गॅस होल्डर किंवा डोम (गॅससंकलक) असतो. तसेच मिश्रणाकरिता इनलेट (प्रवेशद्वार) व आऊटलेट द्वार स्लरी बाहेर पडण्यासाठी आणि गॅस पाइपलाइन हे चार पूरक भाग असतात.

  1. डायजेस्टर : डायजेस्टरची जोडणी जमिनीखाली करतात. डायजेस्टरची निर्मिती विटा आणि सिमेंटने बांधणी करून दंड गोलाकार आकाराची असते. डायजेस्टरची खोली व आकार बायोगॅस संयंत्राच्या क्षमतेवर अवलंबून असतो.
  2. गॅस होल्डर : गॅस होल्डरमध्ये डायजेस्टरमधून बाहेर पडणारा वायू (गॅस) साठविला जातो. स्थिर किंवा डोम प्रकाराचा गॅस होल्डर विटा आणि सिमेंटने बांधणी करून तयार करतात, तर तरंगता ड्रम प्रकारामध्ये सिलेंडर आकाराचा गॅस होल्डर लोखंडी पत्र्यापासून तयार करतात. या गॅस होल्डरच्या वरील भागामधून गॅस कॉकची पाइपलाइनशी जोडणी करून घरातील गॅस बर्नरशी जोडतात.
  3. मिश्रण टॅंक किंवा प्रवेश द्वार : या टाकीत शेण व पाण्याचे 1-1 प्रमाणात मिश्रण करून ते एका इनलेट पाइपमार्फत डायजेस्टरमध्ये सोडले जाते.
  4. आऊटलेट किंवा निकास द्वार : डायजेस्टरमधून टाकण्यात आलेली स्लरीचे मिश्रण आऊटलेट किंवा निकासद्वारा मधून बाहेर येते.
  5. स्लरी साठवण्याचा खड्डा : आऊटलेटमधून बाहेर पडलेली स्लरी या खड्ड्यांमध्ये साठविली जाते. ही स्लरी एकतर वाळवतात किंवा थेट शेतात पसरवतात. या जैविक खतामध्ये दोन पट नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश आणि पोषक तत्त्व असतात.
  6. गॅस पाइपलाइन : गॅस पाइपलाइनद्वारा बायोगॅस चुली/ बर्नरपर्यंत पोचविला जातो.


संपर्क - हेमंत श्रीरामे - 9422545915 
(लेखक विद्युत आणि अपारंपारिक ऊर्जा स्रोत 
विभाग, कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate