অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीची कामे करताना ऊर्जा वाचवा

जलसिंचन - पंपाने पाणी उपसणे

ISI प्रमाणित पंप वापरल्याने तसेच पंपमध्ये काही किरकोळ तर काही मोठे बदल व सुधारणा केल्यास त्यांची कार्यक्षमता 25 ते 35 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते.

कमी इंधन लागण्यासाठी खालील उपाय वापरावेत

  • वॉल्व मोठा असल्यास विजेची / डिझेलची बचत होऊ शकते कारण विहिरीचे पाणी वर खेचण्यासाठी कमी इंधन व वीज लागते.
  • पाइपला बेन्ड (वळणे) आणि फिटिंग जितकी कमी तितकी विजेची बचत जास्त.
  • पाइपची वळणे (बेन्ड) फारच वेडीवाकडी असल्यास पाइपच्या आतून पाणी घासल्यामुळे 70% जास्त नुकसान होते.
  • पाइपची उंची 2 मीटरने कमी करून शेतकरी दर महिन्यास 15 लिटर डिझेल वाचवू शकतो. विहिरीतील पाण्याच्या पातळीच्या वर 10 फुटांपेक्षा कमी उंचीमध्ये पंप बसवल्यास तो अधिक कार्यक्षमतेने चालतो.
  • सक्शन पाइप चांगल्या दर्जाचा व पीवीसी प्रकारचा असल्यास ऊर्जाबचत होते तसेच 20 टक्क्यांपर्यंत वीजदेखील वाचते.
  • उत्पादकाने सांगितल्यानुसार पंपाचे ऑइलिंग व ग्रीझिंग नियमितपणे करा.
  • पॉवर फॅक्टर व वोल्टेजमध्ये सुधारणा करण्यासाठी मोटरसोबत योग्य कपॅसिटीचा ISI प्रमाणित शंट कपॅसिटर बसवा. ह्यामुळेदेखील विजेची बचत होईल.
  • विहिरीमध्ये दिवा बसवला असल्यास तो दिवसा बंद ठेवा.

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate