অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवइंधने

जेट्रोफा (वनएरंडी)

जेट्रोफा कारकास हे दक्षिण अमेरिका व पश्चिम आशियामध्ये आढळणारे एक बारमासी झुडूप असून त्यापासून अखाद्य प्रकारचे बहुपयोगी तेल मिळते. ह्यास सामान्यतः पायसिक नट अथवा पर्जिंग नट नावाने ओळखतात. जेट्रोफा कारकासचा समावेश युफोर्बियाकी फॅमिलीमध्ये होतो. ह्यापासून रबरासारखा (लॅटेक्स) पदार्थ स्त्रवत असल्याने प्राणी ह्यास तोंड लावत नाहीत. अर्धदुष्काळी वातावरणातदेखील हे तगून राहात असल्याने ह्याचे पीक स्रोतांची उपलब्धता कमी असलेल्या भागांतदेखील 30 वर्षांपर्यंत फायदेशीर रीतीने घेता येते.

शुगरबीट

शुगरबीट (बीटा वल्गारिस वॅरि. साचारिफेरा एल्.) हे समशीतोष्ण वातावरणीय प्रदेशांमध्ये पिकवले जाणारे द्वैवार्षिक कंदमूळ असून त्यापासून साखर मिळते. सध्या शुगरबीटच्या उष्णकटिबंधांमध्ये वाढू शकणार्‍या जाती लोकप्रिय होत असून इथेनॉलच्या निर्मितीसाठी तामिळनाडूमध्ये त्याची वैकल्पिक ऊर्जादायी पीक म्हणून लागवड होत आहे. हे इथेनॉल 10 टक्क्यांपर्यत पेट्रोल अथवा डिझेलमध्ये मिसळून जैव-इंधन म्हणून वापरता येते. शुगरबीटपासून मिळणारी इतर उप-उत्पादने हिरवा चारा म्हणून गुरांना घालता येतो तर उद्योगांपासून मिळणार्‍या फिल्टर केकचा व बीटच्या लगद्याचाही पशुखाद्यासाठी वापर होऊ शकतो.

सोरगम (ज्वारी)

धान्य व चारा ह्या दोन्ही वस्तू मिळवण्यासाठी तांदुळाखालोखाल सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारीची लागवड केलेली आपणांस आढळेल. ज्वारीचा अन्य प्रकारे उपयोग केलेला दिसतो. खाद्यउद्योगामध्ये धान्याचा तर इथेनॉल, अर्क, चार्‍यासाठी जैवसमृद्ध (बायोएनरिच्ड) बगॅस, गूळ इ. बनवताना दांड्याचा वापर करतात. सहवीजनिर्मिती (कोजनरेशन) मध्येदेखील हिचा उपयोग केला जातो. मक्याकडून किंमतीची स्पर्धा सुरू झाल्यानंतर पशु व कुक्कुटखाद्य म्हणूनदेखील वापर होतो आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक कारणांसाठी व पिण्यासाठी मद्यार्काची (अल्कोहोल) मागणी सतत वाढते आहे. अलिकडील शासकीय धोरणांनुसार अल्कोहोल 5 टक्क्यांपर्यत पेट्रोल अथवा डिझेलमध्ये मिसळले जात असल्याने वैकल्पिक व औद्योगिकदृष्ट्या परवडणार्‍या कच्च्या मालाच्या रूपाने गोड्या ज्वारीची मागणी वाढते आहे. अल्कोहोलनिर्मितीसाठी अर्धदुष्काळी प्रदेशांत उसाला पूरक पीक म्हणून गोडी ज्वारी लावली जाते. ह्या पिकाचे फायदे असे - 1) कमी पाण्यावर व इतर वस्तूंच्या अल्प पुरवठ्यावरदेखील हिची वाढ चांगली होते. 2) फक्त चार महिन्यांत पीक तयार होते.

अल्कोहोलच्या निर्मितीसाठी वैकल्पिक कच्चा माल व जैव-ऊर्जा पुरवणारे विश्वसनीय पीक असल्यामुळे गोड्या ज्वारीकडे आता सर्व जगाचे लक्ष गेले आहे. यशस्वितेचा दर उच्च आहेकारण साखर कारखाने व नजीकच्या आसावनी (डिस्टिलरी) मधील सध्याचीच यंत्रसामग्री वापरता येते. गोड्या ज्वारीचा रस सोरगम हनी ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या अर्कामध्ये (सीरप) वापरता येतो. गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच शेतकरी हा सोरगम हनी बनवू शकतात. हिच्या बगॅसचे  (सरमाड/ पाचड) समृद्धीकरण करून ते पशुखाद्याच्या रूपात वापरता येते.

सहवीजनिर्मितीसाठीदेखील हा एक अत्यंत योग्य मूलरूपी पदार्थ आहे. त्याचप्रमाणे पिण्यायोग्य अल्कोहोलच्या निर्मितीसाठी वैकल्पिक कच्चा माल म्हणून ह्या धान्याचा वापर वाढतो आहे व हे एक महत्वाचे जैवइंधनदेखील आहे.

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate