অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उन्‍हाळ्याला तोंड देण्‍याचे पर्यावरण-मैत्रीपूर्ण उपाय

उन्‍हाळ्याला तोंड देण्‍याचे पर्यावरण-मैत्रीपूर्ण उपाय

    उन्‍हाळ्याला तोंड देण्‍याचे पर्यावरण-मैत्रीपूर्ण उपाय

  • भरपूर पाणी प्‍या. बाटलीबंद पाणी पिणे टाळा कारण त्‍याच्‍यात चव असली तरी त्या पाण्यामधील नैसर्गिक पोषणमूल्ये नष्ट झालेली असतात.
  • कॅफिनयुक्‍त पेये पिणे टाळा. ताकासारखे नैसर्गिक थंड पेय घ्‍या.
  • फिकट रंगाचे विशेषत: सुती कपडे घाला.
  • शरीरात पाण्‍याची कमतरता (डीहायड्रेशन) होऊ नये म्‍हणून पुष्‍कळ द्रव पदार्थ प्‍या. लिंबाचा रस, शहाळी, फळांचे रस इत्‍यादि नैसर्गिक द्रवपदार्थ आहेत. शहाळ्याच्‍या पाण्‍यात शर्करा, तंतुयुक्त पदार्थ (फायबर), व्हिटॅमिन (जीवनसत्त्व) व मिनरल्‍स (खनिजे) प्रमाणेच प्रथिने देखील असतात.
  • भरपूर सॅलड आणि ज्‍यामध्‍ये नैसर्गिक स्‍वरूपात पाणी असते अशी ताजी फळे खा उदा. टरबुज. वास्‍तविक पाहतां ह्या फळामध्‍ये सुमारे 92% पाणी व 14% व्हिटॅमिन सी असते. घामाच्‍या स्‍वरूपात शरीरातून कमी होणार्‍या आर्द्रतेच्‍या घटकांचे प्रमाण टिकविण्‍यासाठी ह्याची मदत होते. तसेच ह्या फळामध्‍ये थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन बी (ब जीवनसत्त्व) आणि पोटॅशियम देखील आढळतात.
  • मातीच्‍या भांड्यांमध्‍ये (माठात) साठवलेले पाणी प्‍या.
  • तेलकट पदार्थ खाऊ नका/खाणे टाळा आणि विशेषत: फळ-विक्रेत्‍यांकडे मिळणारी चिरून-कापून ठेवलेली फळे खाऊ नका कारण अशा फळांवर माश्‍या आणि घूळ-माती बसलेली असतातच.
  • हातपंखा जवळ बाळगा. वीज गेलेली असली तरी हा पंखा कामी येतो.
  • एखाद्या उघड्या असलेल्‍या खिडकीवर वाळ्याचा पडदा लोंबत सोडा. ह्याच्‍यामुळे घरामध्‍ये थंड वारे खेळते राहील (चांगले वायुवीजन होईल).

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate