অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्यावरण विषयक नियोजन

पर्यावरण व्यवस्थापन साधन

भारतासारख्या देशाच्या विकासामध्ये उद्योगांचा विकास ही इष्टापती आहे. औद्योगिकीकरणामुळे धोकादायक टाकाऊ पदार्थ निर्माण होऊन त्याद्वारे पर्यावरण प्रदूषित होते आणि पर्यावरणास होणारा धोका वाढत आहे. मानवी वसाहती, वने, जलसाठे व हवा हे घटक, प्रदूषणास अधिक संवेदनक्षम आहेत आणि प्रदूषणामुळे त्यांचा -हास होऊ शकतो म्हणून त्या संवेदनक्षम क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणविषयक नियोजनकाची गरज आहे. 
सध्या, विसर्जन/उत्सर्जन मानके तयार करुन त्याद्वारे विनिमामक संस्था उद्योग स्थापन करण्यासाठी प्रस्तावित जागा देतात. तथापि, उद्योग, प्रदूषण करणार नाही याची हमी नसते. तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहित केलेल्या मानकांचे पालन करण्यासाठी उद्योगामध्ये वापरलेल्या प्रदूषण नियंत्रण साधन सामग्रीचा सर्वच वेळी किंवा तिच्या इच्छित कार्यक्षम पातळीपर्यंत वापर करता येऊ शकत नाही. 
ज्या जागा अंतिमत: निश्चित केलेल्या आहेत, त्या जागी असलेले जलसाठे जलप्रदूषणामुळे बाधीत होतील तसेच उत्सर्जन करणा-या उद्योगामुळे हवेच्या दर्जावर परिणाम होईल. परिणामी, नैसर्गिक संतुलनास धोका निर्माण होईल. 
भविष्यामध्ये या समस्येचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व जी टी झेड (जर्मन तंत्रज्ञान सहकार्य) जर्मनीच्या सहयोगाने व पर्यावरण व्यवस्थापन क्षमता बांधणी प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेच्या वित्तीय सहाय्याने राज्यामध्ये "उद्योगांची स्थापना करण्यासाठी जिल्हानिहाय क्षेत्रिय नकाशे'' तयार केले आहेत. 
उद्योग स्थापन करण्यासाठीच्या क्षेत्रिय नकाशांमध्ये, प्रक्षेत्र व जिल्हयातील वर्गिकृत पर्यावरण आणि विविध जागांची / प्रक्षेकांची प्रदूषण ग्रहण करण्याची क्षमता दर्शविलेली आहे आणि वाचण्यास सहज सोप्या असलेल्या नकाशांद्वारे उद्योगांसाठी शक्य असलेल्या पर्यायी जागा सुचविलेल्या आहेत.

क्षेत्रिय नकाशे
उद्योग स्थापन करण्यासाठीच्या क्षेत्रिय नकाशांमध्ये, प्रक्षेत्र व जिल्हयातील वर्गिकृत पर्यावरण आणि विविध जागांची / प्रक्षेकांची प्रदूषण ग्रहण करण्याची क्षमता दर्शीवलेली आहे आणि वाचण्यास सहज सोप्या असलेल्या नकाशांद्वारे उद्योगांसाठी शक्य असलेल्या पर्यायी जागा, सुचविल्या आहेत. 
उद्‌दिष्ट

  • प्रक्षेत्र तयार करणे व जिल्हयामधील पर्यावरण वर्गिकृत करणे
  • उद्योगांची स्थापना करण्यासाठी ठिकाणे निश्चित करणे आणि
  • निश्चित केलेल्या जागांसाठी योग्य उद्योग निश्चित करणे

टॉप

आवश्यक घटक
क्षेत्रिय नकाशांमध्ये केवळ पर्यावरणीय पैलूंचा विचार केला आहे. उद्योग उभारण्यासाठी, कच्च्या मालाची, तयार मालाची बाजारपेठेची, पाणी पुरवठयाची, विद्युत पुरवठयाची, मजुरांची उपलब्धता यांसारख्या आर्थिक घटकांबरोबरच पर्यावरणीय घटक हे दोन्हीही घटक विचारात घेतले पाहिजे. असे गृहित धरले जाते की, आर्थिक घटक विचार घेता सुयोग्य जागा निश्चित करण्यामध्ये उद्योग हा उत्तम न्यायाधिश असतो. त्यानंतर उद्योग, आर्थिक व पर्यावरणीय हे दोन्ही घटक विचारात घेऊन, सुयोग्य जागा निश्चित करतील. पर्यावरणीय घटक विचारात न घेतल्यामुळे अल्प काळात अधिकाअधिक नफा मिळेल परंतु पर्यावरणीय घटक विचारात घेतल्यामुळे, दीर्घ कालावधीसाठीचे दायित्व कमी होईल. प्रदूषण वाढल्यामुळे, पर्यावरणीय मानके, अधिकाधिक कडक करण्यात आले आहेत. 
उद्योगांमधील पर्यावरण नियंत्रण गुंतवणुकीचा खर्च, प्रचंड प्रमाणात वाढला आहे, काही वेळा, त्यामुळे उद्योगांवर प्रचंड भार पडतो आणि त्याचबरोबर विनियामक प्राधिकरणांकडून उद्योग बंद करण्याची जोखीम सुध्दा असते. म्हणून पर्यावरणीय घटकांच्या आधारे तयार केलेले क्षेत्रिय नकाशे, सुसंगत व उचित आहेत.

उपयुक्तता

  • उत्तम जागा व संबंधित पर्यावरणीय माहितीसाठी सिध्द-गणक दिलेले आहे.
  • प्रक्रिया, सोपी, वेगवान, वास्तव, पारदर्शक व विश्वासनीय करण्याचा निर्णय मिळतो.
  • देशामध्ये अभाव असलेल्या प्रत्यक्ष (जमिनीचा वापर) नियोजन प्रक्रियेमध्ये पर्यावरणीय घटकांचा समावेश करण्यासाठी आधार देते.
  • खर्चावर आधारित प्रदूषण नियंत्रण उपाययोजना व कार्यक्रम यांचे नियोजन करण्यामध्ये मदत करते.
  • त्यामुळे वेळ, प्रयत्न, गुंतवणूक यांची बचत होईल आणि पर्यावरणीय परिणाम निर्धारित करणा-या आणि विनियामक प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास विलंब करणा-या अपरिचित जागांसाठी असलेल्या जोखीमा कमी होतील. अशा सुयोग्य जागा उद्योगासाठी सहज शोधताना उद्योजकांना मदत होते.
  • रस्ते, पाणी पुरवठा, वीज, इत्यादींसारख्या पायाभूत सुविधांचा विकास करताना आणि सामाईक टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करताना व त्याची विल्हेवाट लावताना मदत होते.
  • प्रदूषणासह आधीच अति-भार असलेल्या क्षेत्रांमध्ये अधिक लोकसंख्येस अटकाव करण्यास मदत करणे.
  • उद्योगाची प्रदूषण क्षमता जागांच्या स्थानिक स्थितीशी अनुरुप करण्याची सुनिश्चिती करतात.
  • एखाद्या अति जोखीमीच्या क्षेत्रामध्ये स्थापन करण्याची इच्छा असलेल्या उच्च प्रदूषणकारी क्षमता असलेल्श उद्योगाने ज्यामुळे टाकाऊ पदार्थाची / प्रदूषणाची निर्मिती करण्यास प्रतिबंध केला जाईल आणि ती पर्यावरणाशी अनुरुप असेल अशा निर्मिती प्रक्रियेसाठी स्वच्छ तंत्रज्ञानाचा अंगिकार केला पाहिजे याची सुनिश्चित करते.
  • शेजारच्या प्रदेशात अपेक्षित असलेल्या उद्योगांचा प्रकार व प्रदूषणाचे स्वरुप याबाबत पुरेशे आधीच जनतेमध्ये जागृती करण्यास मदत करते.
  • शाश्वत विकास साध्य करण्यास मदत करते.

क्षेत्रिय नकाशे

निर्णय प्रक्रियेची साधने :
उद्योग स्थापन करण्याचे क्षेत्रिय नकाशे, केंद्र व राज्य सरकार, उद्योग, विनियामक प्राधिकरणे व सर्व सामान्य लोक यांसह विविध स्तरावर निर्णय करताना मदतगार ठरतात. विविध स्तरावर घेण्यात येतील अशा निर्णयांचे प्रकार खाली दिलेले आहेत.

शासन

  • औद्योगिक क्षेत्रांची अधिसूचना
  • औद्योगिक विकासाच्या प्रकारावरील निर्णय, जर उद्योग स्थापन करण्यासाठी आर्थिक फायद्यापेक्षा पर्यावरण विषयक फायद्यास अधिक महत्व असेल तर, शासनाला, सहन करावयास पर्यावरण विषयक खर्चाची, अंतर्भूत असलेल्या जोखमीची व मुदतविषयक दायित्वांची माहिती होईल.
  • विशिष्ट क्षेत्रांतील काही उद्योगांच्या वाढीवर निर्बंध.
  • काही उद्योगाच्या ठिकाणासंबंधी सवलत देणे आणि एखाद्या प्रदेशामध्ये / जिल्हयामध्ये कोणत्याही ठिकाणी त्यांना परवानगी देणे.

उद्योग


एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी कच्चा माल, पाणी पुरवठा, वीज, मजूर इत्यादींची उपलब्धता यांसारखे आर्थिक घटक आणि पर्यावरणविषयक घटक, विचारात घेतले जातात. जरी उद्योगास आर्थिक फायद्यातून एखादे ठिकाण उत्तम असल्याचे वाटत असले तरी त्याला पर्यावरणविषयक संरक्षणाच्या दृष्टीकोनातून त्याच्या अपेक्षित भाराची माहिती असू शकत नाही. 
क्षेत्रिय नकाशाद्वारे उद्योगास राज्याच्या विविध जिल्हयांमधील योग्य ठिकाणे शोधता येतील आणि या ठिकाणांमध्ये आपली कामे सुरु करण्याची सुसाध्यता किंवा आर्थिक वर्धनक्षमता निश्चित करता येईल. त्यानुसार सुयोग्य ठिकाणाबाबत निर्णय घेता येईल.

विनियामक प्राधिकरणे

पर्यावरणविषयक निर्धारण करताना, अधिक वेळ न घालवता, विशिष्ट जागेसाठी एखादा उद्योग योग्य असल्याबाबत निर्णय घेणे.

जागेच्या विशिष्ट मानकांची अधिसूचना :
सामाईक प्रदूषण उपाययोजना व विल्हेवाट करण्याची सुविधा यांची तरतूद करणे.

प्रदूषणसंनियंत्रण व नियंत्रण कार्यक्रमाची आगाऊ योजना : आणि 
पर्यावरणविषयक विनिअमन करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक / क्षेत्रिय कार्यालयामध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ, संनियंत्रण साधने, प्रयोगशाळांची सुविधा, अर्थसंकल्प, इत्यादी संबंधी पुरेशा आधी योजना तयार करणे. 
जनता  (लोक) : 
जनतेला, क्षेत्रिय नकाशांद्वारे, त्यांच्या शेजारच्या प्रदेशामध्ये येण्याचा संभाव असलेल्या उद्योगांच्या ठिकाणांची व अपेक्षित प्रदूषणाची माहिती मिळेल. ते एखादा उद्योग प्रत्यक्षात येण्यापूर्वी देखील अशा विकासाच्या स्वीकार्यतेबाबत निर्णय घेऊ शकतील. यामुळे त्यांच्यावर प्रभाव टाकणारे प्रदूषण दूर करण्याचे त्यांना आकलन होते.

क्षेत्रिय नकाशे तयार करण्याची पध्दती :
उद्योग स्थापन करण्याचे क्षेत्र, गणितीय नकाशा आंभरुन जी आय एस उपकरणांचा वापर करुन आणि संवेदनक्षमतेच्या विविध पर्यावरणीय परिस्थितीमुळे औद्योगिक कार्यासाठी अयोग्य असलेली क्षेत्रे, वगळण्याच्या पध्दतीने तयार केले जातात. या पध्दतीमध्ये जिल्हयाच्या वैशिष्टयांची ओळख,कायदेशीर निर्बंध, भौतिक अडथळे, सामाजिक विचार, इत्यादीमुळे उद्योग उभारण्यासाठी अयोग्य असलेल्या संवेदनक्षम क्षेत्रांचे नकाशे, वायु/जल (भूपृष्ठ/भूजल) प्रदूषणाच्या संदर्भात जिल्हयाच्या प्रदूषण ग्रहण क्षमतेचे मूल्यनिर्धारण आणि विविध प्रकारच्या प्रदूषण क्षमतेनुरुप शक्य असलेलया पर्यायी जागा निश्चित करणे यांचा समावेश होतो. ही सुयोग्यता, संपूर्णपणे पर्यावरणविषयक घटकांवर आधारित आहे. विविध नकाशे तयार करण्यासाठी वापरलेले प्रमाण हे, 1:2,50,000 (1 से.मी. = 2.5 कि.मी.) असे आहे.

एखाद्या जिल्हयासाठी क्षेत्रिय नकाशे तयार करण्याची प्रक्रिया स्थूलमानाने खालील सहा टप्प्यांमध्ये विभागली जाते :

  • जिल्हयाचा आधारभूत नकाशा तयार करणे.
  • जिल्हयाची भौतिक वैशिष्टये दर्शविदेविषयक तयार करणे (जमीनीचा वापर व जलनि:सारण नकाशा, प्राकृतिक भूवर्णन, जमिनीची क्षमता इ.)
  • पर्यावरण विषयक महत्व / मार्गदर्शकतत्वे, कायदेशीर निर्बंध, सामाजिक अडचणी व भौतिक अडथळे यांमुळे उद्योग उभारण्यासाठी अयोग्य असलेली संवेदनक्षम क्षेत्रे दर्शविणारी क्षेत्रे निश्चित करणे.
  • वायु प्रदूषण संवेदनक्षमतेशी व भूजल प्रदूषण संवेदक्षमताशी संबंधित असणारे विषय नकाशे तयार करणे.
  • विषक नकाशाच्या आधारे, प्रदूषण संवेदनक्षम नकाशे तयार करणे आणि *वायु व जल प्रदूषणकारी जागांची संवेदनक्षमता आणि उद्योग स्थापन करण्यात असलेली जोखीम या आधारे संभाव्य पर्यायी ठिकाणे. ** भूजल प्रदूषणाच्या संवेदनक्षमतेच्या आधारे संभाव्य घन कच-याची विल्हेवाट लावणा-या जागा निश्चित करणे.
  • निश्चित केलेल्या विविध जागी सुयोग्य असलेल्या उद्योगां प्रवर्गाची सूची तयार करणे आणि उद्योग उभारण्यासाठी व जागेची परवानगी मिळण्याच्या प्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शकतत्वे सुचविणे.

 

माहिती संकलन: प्राची तुंगार

स्त्रोत: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate