অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अवाढव्य "बिटल्स

अवाढव्य "बिटल्स

किटक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर नगण्य, चिमुकले, नाजूक, तुरतुर पळणारे, ऊडणारे प्राणी अशीच प्रतिमा उभी रहाते. हे पुर्णत: खोटे नसले तरी हेच कित्येक चिमुकले जीव फक्त काही दिवसात हजारो मैलांचे अंतर स्थलांतराकरता उडतात आणि ते नाजूक नाहीत हे सिद्ध करून दाखवतात. त्याच प्रमाणे काही काही किटक चक्क एक फुटाएवढे मोठे असल्यामुळे ते व्हिमुकले आणि नगण्य आहेत असेही म्हणता येत नाही. जगातील सर्वात वजनदार आफ्रिकेतील गोलीएथ ढालकीडा हा १०० ग्रॅम वजनाचा असून त्याची लांबीसुद्धा १२ सें.मी. एवढी असते. दिवसा उडणारा हा भलामोठा ढालकीडा फुलांतील परागकण, फळे, फळातील रस पीउन जगतो आणि बऱ्याच वेळेला जंगलातील झाडांच्या फांदीवर आपल्या सहा बळकट पायांनी धरून उलटा लटकलेला आढळतो.

जगातील सर्वात लांब असणारा दक्षिण अमेरीकेतील रायनोसोरस ढालकीडा हा तर अजूनच मोठा म्हणजे जवळपास ८ इंचाएवढा मोठा असतो. ह्या त्याच्या शरीराच्या एकंदर लांबीत जास्त मोठा त्याच्या शिंगाचाच भाग असतो. निशाचर असलेला हा भलामोठा ढालकीडा पालापाचोळा खाऊन रहातो आणि ह्या त्याच्या मोठ्या शिंगाचा वापर दुसऱ्या प्रतिस्पर्धी नरांबरोबर मारामारी करण्यासाठी केला जातो. आपल्या भारतातसुद्धा मोठ्या मोठ्या आकाराचे ढालकीडे सापडतात. यात सर्वात सहज दिसणारे मोठे ढालकीडे म्हणजे "लॉंग हॉर्न बिटल"https://static.vikaspedia.in/media_vikaspedia/mr/images/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-91594091f915/Beetle03.jpg"image-left" src="https://static.vikaspedia.in/media_vikaspedia/mr/images/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-91594091f915/Beetle03.jpg" />नल सरोवरला पक्षी बघायला गेलो असताना रात्री जेवून परतताना मला हा "सिक्स स्पॉटेड टायगर बिटल" रस्त्यात आढळला. अतिशय तुरूतुरू जलद पळणाऱ्याला त्या किटकाला थांबवताना माझ्या नाकी नऊ आले. याचे सुद्धा धारदार मुखावयव असल्यामुळे पटकन त्याला धरतासुद्धा येत नव्हते. सावकाश त्याला टोपीमध्ये ठेवून, थोडा शांत झाल्यावर त्याला एका झाडाच्या वाळ्क्या खोडावर ठेवून त्याचे छायाचित्रण केले. अतिशय चपळ असणाऱ्या ह्या किटकांचे छायाचित्रण करतना नेहेमीच तत्परता दाखवावी लागते. छायाचित्रात दिसणाऱ्या "स्टॅग बिटल" हा नाम्दाफाच्या घनदाट जंगलात आढळला. आकाराने तो ४/५ ईंच लांबतरी नक्कीच असावा.

अतिशय चंचल असल्यामुळे तो एका जागी बिलकूल थांबत नव्हता आणि त्याचे छायाचित्रण काही केल्या जमत नव्हते. बऱ्याच वेळानंतर अगदी काही क्षण तो नदीच्या काठावर जरा वाळूत संथ झाला तेंव्हा त्याची झटपट २/३ छायाचित्रे घेता आली. असे भलेमोठे किटक बघायला मिळणे म्हणजे नशिबाचा भाग आणी त्यातसुध्दा त्यांची चांगली छायाचित्रे मिळाली तर सोन्याहूनही पिवळेच म्हणावे लागेल.

 

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत -  युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate