অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंबरी

अंबरी

(क. अंबट्टी, उळागेरा; लॅ. नोथोपेजिया कोलेबुकियाना; कुल-अ‍ॅनाकार्डिएसी). सु. ४-५ मी. उंचीच्या या मध्यम वृक्षाचा प्रसार कोकण व उत्तर कारवारच्या सदापर्णी जंगलात असून शिवाय निलगिरी, त्रावणकोर व श्रीलंका येथेही आहे. यात जहाल पांढरा रस असतो. साल पातळ व भुरी; पाने एकाआड एक,चिवट, मध्यम आकाराची, दीर्घवृत्ताकृती, गुळगुळीत; फुले लहान, पांढरी, एकलिंगी (जानेवारी-मार्च); पुं-मंजऱ्या स्त्री मंजऱ्यापेक्षा लहान [पुष्पबंध]; फुलांची संरचना व सामान्य शारीरिक लक्षणे अ‍ॅनाकार्डिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे; फळ (मार्च-मे) अश्मगर्भी (कोय असलेले), लाल; मगज गोड व खाद्य; लाकूड कठिण, बळकट, धन व गुळगुळीत पण दुर्लक्षित आहे.

लेखक : ज. वि. जमदाडे

माहिती  स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/21/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate