অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कडूचिंच

कडूचिंच

कडूचिंच

(कडू चोंचे; हिं. कडू कोष्ट; क. तंडासीर; गु. कडवी चिंचडी; सं. दीर्घचंचु, कटुचंचु; लॅ. कॉर्कोरस ट्रायलॉक्युलॅरिस; कुल-टिलिएसी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ⇨ओषधीचा प्रसार भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश इ. प्रदेशांत आहे.

खोड व फांद्या केसाळ; पाने साधी, एकाआड एक, दातेरी व दीर्घवर्तुलाकृती; फुलोरे आखूड, कुंठित (वल्लरी) व पानांसमोर; फुले पिवळी [→ ताग; टिलिएसी], लहान आणि सप्टेंबरमध्ये येतात. बोंडे लांबट, त्रिकोनी वा चौकोनी, चोचदार; बिया (राजजिरे) काळ्या आणि त्रिधारी. दुष्काळात पानांची भाजी करतात.

धाग्यांपासून दोर बनवितात. बिया कडू असून त्यांचा (किंवा पानांचा) फांट (पाण्यात भिजवून काढलेला रस) तापावर देतात; आमवातात आणि अर्बुदावरही (गाठीवरही) बिया देतात, खोड व फांद्यांपासून मिळणारे श्लेष्मल (गिळगिळीत) द्रव्य शामक असते.

 

लेखक: न. द. हेर्लेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate