অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किरमिरा

किरमिरा

किरमिरा

(हिं. वन-निंबू; क. गुरूवेदे, मनिक्यान; सं. वननिंबुका, अश्वशकोत; इं. टूथब्रश प्लॅंट, लॅ. ग्लॉयकॉस्मिस पेंटाफिला; कुल-रूटेसी). हे एक सरळ वाढणारे क्षुप (झुडूप) असून त्याचा प्रसार भारतात सर्वत्र आहे;

शिवाय श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, चीन, मलाया, बोर्निओ इ. प्रदेशांतही आहे. पाने संयुक्त, पिसासारखी तीन ते पाच दलांची क्वचित एकदली; फुले लहान, पांढरी व पानांच्या बगलेत लांब परिमंजऱ्यांवर येतात.

मृदुफळ गोलसर, गुलाबी किंवा फिकट पिवळसर व फार लहान, एक सेंमी. व्यासाचे; बिया एक ते तीन; फळे खाद्य. इतर लक्षणे रूटेसी कुलवर्णनाप्रमाणे असतात.

मुळे कुटून सारखरेबरोबर बारीक तापात देतात; मुळे व साल कफ, ज्वर, संधिवात, रक्तक्षय, कावीळ यांवर उपयुक्त; पानांचा रस नायटे व इतर चर्मरागांबर लावतात. ग्लॉयकॉस्मीन हे ग्लायकोसाइड पानांत असते.

 

लेखक: ठोंबरे, म. वा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate