অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॅस्करा-सॅग्रेडा

कॅस्करा-सॅग्रेडा

कॅस्करा-सॅग्रेडा

(इ. कॅलिफोर्नियन वेस्टर्न बक्थॉर्न). हे नाव ऱ्हॅम्नस पुर्शियाना व ऱ्हॅ. कॅलिफोर्निका(कुल-हॅम्नेसी) या लहान वृक्षांच्या (उत्तर अमेरिका व कॅनडा येथील)तांबूस तपकिरी सालीला व त्यापासून काढलेल्या अर्काला दिलेले आहे.

यातील औषधी गुणधर्माची माहिती पश्चिमेकडील इंडियन लोकांना व पहिल्या स्पॅनिश वसाहतवाल्यांना होती व त्यांनीच हे नाव पवित्र वल्क या अर्थी दिले आहे. उन्हाळयात दोन तीन वर्षांनी जुनी साल काढून व वाळवून अर्क काढतात.

त्यात अ‍ॅथ्रेसीन राळ, अ‍ॅमरॉइडे,टॅनीन, मॅलिक व ऑक्झॅलिक अम्ले, बाष्पनशील (उडून जाणारे) तेल इ. पदार्थ असतात. शिवाय त्यात पौष्टिक व सौम्य रेचक गुण असून त्यामुळे जुनाट मलावरोध नाहीसा होतो.

हे वृक्ष भारतात आढळत नाहीत. तथापि ऱ्हॅम्नास वंशातील रक्तरोहिडा (रगतरोडा; ऱ्हॅम्नस वाइटाय) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व निलगिरी आणि पळणी येथील टेकडयांवर आढळणाऱ्या वनस्पतींच्या सालीतही पौष्टिक, स्तंभक (आंकुचन करणारा)व रेचक गुण आढळतात.

 

लेखक: न. द. हेर्लेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate