অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोमटी

गोमटी

गोमटी

गोमेटी : वेलीची फांदी व फळ

(घोयंट, वनतुंडी; हिं. तरली, कुंद्री; क. शिंदोंडे; लॅ. झेनेरिया अंबेलॅटा मेलोथ्रिया हेटेरोफायला; कुल-कुकर्बिटेसी). ही ओषधीय [→ ओषधि] वेल भारतात सर्वत्र सु. २,१०० मी. उंचीपर्यंत आढळते. हिची मुळे मांसल; पाने साधी, विविध आकारांची, अखंड किंवा विविध प्रकारे खंडित व दातेरी असतात. एकलिंगी फुले लहान, पिवळी; पुं-पुष्पे अनेक व विविध प्रकारच्या फुलोऱ्यांवर आणि स्त्री-पुष्पे एकेकटी. मृदुफळ लांबट गोल, तोंडल्यासारखे पण तपकिरी व गोडसर असून त्यात अनेक अर्धगोल, गुळगुळीत बिया असतात. मुळे, पाने व फळे खाद्य असून फळांची भाजी करतात. मूळ उत्तेजक, शक्तिवर्धक व रेचक असून परम्यावर व मूत्रोत्सर्ग बंद झाल्यावर देतात. कोकणात मुळांचा रस जिरे व साखर घालून थंड दुधातून स्वप्नावस्थेवर आणि पुष्टीकरिता देतात. बिब्बा उतल्यावर पानांचा रस लावतात. इंडोचायनात बिया रेचक म्हणून वापरतात.


 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate