অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घुगरी

घुगरी

घुगरी

(चिराती; हिं. अगुमकी, बिलारी; लॅ. मेलोथ्रिया मदर-सपाटना कुल-कुकर्बिटेसी). ही जमिनीवर पसरणारी किंवा कुंपणावर चढून वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी श्रीलंका, मलाया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व भारत इ. देशांत आढळते. भारतात १,८०० मी. उंचीपर्यंतच सर्वत्र आढळते. खोड कोनयुक्त व केसाळ; पाने अंडाकृती किंवा अर्धत्रिकोणी, अखंड किंवा ३-५ खंडित व सूक्ष्म दातेरी असतात. प्रताने (तनाव) साधी; फुले लहान, एकलिंगी, एकाच झाडावर व पिवळी; पुं-पुष्पांचे झुबके व स्त्री-पुष्पे एकएकटी व बिनदेठाची किंवा अर्धवट झुबक्यांत जुलैत येतात [ कुकर्बिटेसी फूल]; फळ गोलसर वाटाण्याएवढे, किंचित काटेरी, प्रथम हिरवे व त्यावर पिवळट ठिपके असून शेवटी लाल दिसते. बिया अंडाकृती-लांबट आणि करड्या असतात.

पोपट व इतर पक्षी फळे खातात. कोवळे कोंब व कडू पाने सौम्य रेचक असून पित्ताधिक्य व भोवळ यांवर देतात. मुळे चघळल्यास दातदुखी थांबते. त्यांचा काढा उदरवायूवर देतात. बियांचा काढा स्वदेक (घाम आणणारा) असून त्यांचे चूर्ण अंगदुखीवर लावतात.

 

जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate