অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाथरफोडी

पाथरफोडी

पाथरफोडी

(सं. शिलापुष्प; लॅ. डायडिमोकार्पस पेडिसेलॅटा ; कुल-जेस्नेरिएसी). या लहान ⇨ ओषधीचा प्रसार उपोष्ण कटिबंधीय पश्चिम हिमालयात चंबा ते कुमाऊँ येथे ७७५-१,७०५ मी. उंचीपर्यंत आहे. खोड र्हमसित (ऱ्हास पावलेले) व त्यावर समोरा-समोर पानांच्या २-३ जोड्या येतात. पाने गोलसर अंडाकृती, गुळगुळीत, प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त), ७-१५ सेंमी. व्यासाची असतात. सुकलेल्या पानांना विशिष्ट मसाल्यासारखा वास येतो व त्यांवर तांबूस भुकटी पसरल्यासारखी दिसते. फुले पंचभागी, पाकळ्या जुळलेल्या, केसरदले बहुधा चार व व्दधोन्नत (दोन लांबट), किंजपुट ऊर्ध्वस्थ, दोन कप्प्यांचा [→ फूल]. फळात बिया अनेक असतात.

पाने अश्मरीवर (मूत्रपिंड व मूत्राशय यांतील खड्यांवर) उपयुक्त; पानांमध्ये पेडिसीन, पेडिसेलीन, पेडिसिनीन इ. बरीच स्फटिकी रंगद्रव्ये असतात. वाळलेल्या पानांतील पेडिसीन (सु. १%) मत्स्यविष आहे. पानांतील बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल पातळ, सुख्या गवताच्या रंगाचे व सुगंधी असून त्यात मुख्यतः डायडिमोकार्पेन (१.६%) असते.

 

लेखक: जामदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate