অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रुद्राक्षी

रुद्राक्षी

रुद्राक्षी : बांदोग; इं. बॅस्टर्ड सीडर , लॅ ग्वाझुमा उल्मिफोलिया, ग्वा. टोमेंटोझा; कुल-स्टर्क्युलिएसी). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग हा लहान किंवा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष मूळचा उष्ण कटिबंधीय अमेरिकेतील असून त्याच्या ग्लाझुमा प्रजातीत एकूण ४-५ जाती आहेत. भारतात (प.बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र इ. भागांत) उद्यानांतून रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता व सावलीकरिता लावलेला आढळतो.

रुद्राक्षी : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) किंजपुटाचा आडवा छेद, (४) फळे

कित्येक ठिकाणी हा जंगली अवस्थेत दिसतो. ह्याला अनेक पसरट फांद्या असतात व खोडावर तपकिरी खरबरीत साल असते. याची पाने साधी, लवदार, एकाआड एक, मध्यम आकाराची (७११×५ सेंमी.), आयत, कुंतसम (भाल्यासारखी), प्रकुंचित (लांबट टोकाची), दातेरी किनारीची आणि तळाशी हृदयाकृती व तिरपी असतात. याला जुलै-ऑगस्टमध्ये पानांच्या बगलेतील वा फांद्यांच्या टोकांवरील शाखायुक्त फुलोर्यातवर वल्लरीय परिमंजरावर; पुष्पबंध असंख्य, लहान, पंचभागी, पिवळी किंवा गडद जांभळी फुले येतात; त्यातील दहा केसरदलांची एक नळी बनते; त्या नळीचा वरचा भाग पाच वंध्य व पाच जननक्षम केसरदलांत विभागलेला असतो फूल. फळ (बोंड) कठीण, न तडकणारे, साधारण लांबट गोल, ·५ सेंमी. व्यासाचे, बारीक व बोथाट काट्यांचे, काळे व अनेक बीजी असते. बी बारीक, लंबगोल व कोरडे असते. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे स्टर्क्युलिएसी अथवा मुचकुंद कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

ळात गोड, बुळबुळीत व खाद्य मगज (गर) असतो. तो स्तंभक (आकुंचन करणाऱ्या) व वेदनाहारक असून अधिक खाल्ल्यास अतिसार होतो. पाला गुरांना खाऊ घालतात. अंतर्सालीचा काढा उसाचा रस शुद्ध करण्यास वेस्ट इंडीजमध्ये वापरतात; श्वासनलिकादाहावर फळाचा वापर मॉरिशसमध्ये कफोत्सारक (कफ काढून टाकणारा) म्हणून करतात. जावामध्ये भाजलेल्या बिया स्तंभक समजून पोटाच्या तक्रारीवर देतात. पानांचा अर्क मेदवृद्धी कमी करण्यास वापरतात. साल पोंष्टित व शामक असते. कोवळ्या फांद्यांपासून काढलेल्या धाग्यांपासून दोर व दोऱ्या करतात. लाकूड तपकिरी किंवा पिवळट, बळकट, काहीसे हलके असून त्याला घासून व रंधून उत्तम झिलाई करता येते. त्याचा उपयोग खोके, तावदाने, सजावटी सामान आणि पिपे व तत्सम वस्तूंकरिता करतात; तसेच त्याचा कोळसाही करतात. या वृक्षाची नवीन लागवड बिया व काट कलमे लावून करतात.

 

लेखक - सिंधू अ. पराडकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate