অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुज्ना

सुज्ना

सुज्ना : (हिं. सेंगोरा; लॅ. मोरिंगा कोंकनेन्सिस; कुल-मोरिंगेसी). शेवग्याच्या प्रजातीतील दुसऱ्या प्रकारचा हा वृक्ष कोकण, गुजरात, सिंध, राजस्थान व बलुचिस्तान येथे आढळतो. याची पाने बहुधा द्विगुण-(क्वचित त्रिगुण-) पिच्छाकृती असून पर्णाक्ष तळाशी फुगलेला असतो. फुलांची रचना शेवग्याच्या फुलांसारखी असते. दलके थोडी मोठी असतात; पाकळ्या पिवळट असून त्यांवर लालसर शिरा असतात. शेंगा सरळ, लांब व त्रिकोणी असून कोणत्याही दोन बियांमधल्या भागात उथळ खाच असते. बिया सपक्ष, फिकट पिवळ्या अथवा पांढऱ्या असतात. खोड व बिया पौष्टिक असून पोटदुखीवर उपयुक्त; पाने, फुले व फळे खाद्य असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे मोरिंगेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

 

लेखक - शां. ब. मुजूमदार

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate