महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महामंडळाच्या संचालक मंडळाची रचना पुढीलप्रमाणे आहे.
१ | राज्य शासनाने आदिवासी विकास मंत्री | महामंडळाचे पदसिध्द |
२ | शासननियुक्त सदस्य | महामंडळाचे उपाध्यक्ष |
३ | आदिवासी विकास विभागाचे सचिव | पदसिध्द संचालक |
४ | महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक | पदसिध्द संचालक |
५ | आदिवासी विकास विभागाचे उपसचिव | पदसिध्द संचालक |
६ . |
आदिवासी विकास विभाग, नाशिकचे आयुक्त | पदसिध्द संचालक |
महामंडळाचे मुख्य कार्यालय नाशिक येथे आहे. नाशिक एथिक आदिवासी विकास विभागाच्या इमारतीतच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे कार्यालय आहे महामंडळाची राज्यात १२ शाखा कार्यालये आहेत.
या १२ शाखा कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात येणारे जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत.
शाखा कार्यालय | कार्यक्षेत्रात येणारे जिल्हे |
नाशिक | नाशिक |
जव्हार – जि.ठाणे | ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई व उपनगरे |
नंदुरबार | नंदुरबार व धुळे |
यावल – जि.जळगांव | जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा |
जुन्नर – जि. पुणे | पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद बीड |
धारणी – जि.अमरावती | अमरावती, अकोला |
किनवट – जि. नांदेड | नांदेड, परभणी, हिंगोली |
नागपूर | नागपूर, वर्धा |
देवरी – जि. भंडारा | भंडारा, गोंदिया |
चिमूर – जि. चंद्रपूर | चंद्रपूर |
गडचिरोली | गडचिरोली |
यवतमाळ | यवतमाळ, वाशिम |
शबरी महामंडळाच्या अधिकारी वर्गाच्या संरचनेत महामंडळाच्या अधिकारी वर्गाच्या संरचनेत महामंडळाच्या मुख्य कार्यालयात सर्वप्रथम व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.) असतो. व्यवस्थापकीय संचालक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो. प्रशासकीय मदतीसाठी एक जनरल मॅनेजर तर वित्तीय मदतीसाठी दुसरा जनरल मॅनेजर असतो. प्रादेशिक शाखेवर शाखा व्यवस्थापक असतो. त्याच्या मदतीसाठी लेखापाल असतो. त्यानंतर निरीक्षक व त्याच्या मदतीसाठी लिपीक व शेवटी शिपाई असतो. या सर्वांच्या कार्यातून शबरी महामंडळाचे काम चालते.
संदर्भ : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ
नॅशनल सेंटर फॉर अॅडव्होकसी स्टडीज, पुणे.
अंतिम सुधारित : 6/26/2020
आज आदिवासी उपयोजनेवर देखरेख करण्यासाठी प्रकल्पाच्य...
२००४ सालामध्ये रायगड जिल्ह्यातील पेण भागात डेव्हलप...
माडिया गोंड, कोलाम णी कातकरी या तीन जमातींना महारा...
२४ जानेवारी २०१३ रोजी आंध्र प्रदेशाने अनुसूचित जात...