Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:27:49.591485 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार
शेअर करा

T3 2019/10/14 07:27:49.596232 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:27:49.622466 GMT+0530

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार

अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य करून घेण्यास पंचायत सक्षम असेल तरच गावाचा विकास होतो

१. कलम ५४ ब अन्वये मान्यता मिळालेल्या योजना, कार्यक्रम व प्रकल्प याकरिता ग्रामपंचायतीने खर्च केलेल्या निधीच्या विवरणाबाबतचे प्रमाणपत्र ग्रामसभेकडून मिळविणे.

२. ग्रामपंचायतीच्या अधिकारात असलेली अनुसूचित क्षेत्रातील कोणतीही जमीन विकास प्रकल्पासाठी आणि अनुसूचित क्षेत्रातील अशा प्रकल्पांनी बाधा पोहचलेल्या कोणत्याही व्यक्तिच्या पुनर्वसाहतीसाठी संपादीत करण्यापूर्वी भूमिसंपादन अधिकारी तिच्याशी विचारविनिमय करील. परंतु प्रत्येक पंचायत संबंधीत भूमी संपादन अधिकाऱ्याला आपले विचार कळविण्यापूर्वी ग्रामसभेची मंजुरी घ्यावी.

३. लायसन प्राधिकाऱ्यांना शिफारशी करण्यासाठी योग्य असेल आणि लायसन प्राधिकारी ग्रामसभेशी विचार विनिमय केल्याशिवाय कोणतीही लायसन देता येणार नाही. ग्रामसभेने घेतलेला कोणताही निर्णय समूचित स्तरावर  प्राधिकाऱ्यावर  बंधनकारक असेल.

४. संबंधित गावामध्ये सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमांचे अंमलबजावणी सोपविलेल्या संस्थांच्या व पदाधिकाऱ्यांच्या प्रगतीची सहनियंत्रण करण्यास व त्यांच्या कार्याचे पर्यवेक्षण करण्यास पंचायत समिती व जिल्हापरिषद यांना योग्य त्या शिफारशी करण्यास समक्ष असेल.

५. अनुसूचित क्षेत्रातील जमिनीच्या अन्यसंक्रमणास प्रतिबंध करण्याच्या आणि अनुसूचित जमातीची बेकायदेशीरपणे अन्यसंक्रमित केलेली जमीन परत मिळविण्याच्या दृष्टीने अनुसूचित जमातीच्या व्यक्तींच्या जमिनीचे अन्यसंक्रमण करण्याच्या संबंधात जिल्हाधिकाऱ्याला शिफारशी करण्यास समक्ष असेल. परंतु प्रत्येक पंचायत, जिल्हाधिकाऱ्याला कोणतीही शिफारस करण्यापूर्वी ग्रामसभेशी विचारविनिमय करील.

६. सावकारीसाठी कोणतेही लायसन्स देण्याकरिता मुंबई सावकार अधिनियम १९४६ अन्वये नियुक्त केलेल्या निबंधकाला कोणतीही शिफारस करण्यास सक्षम असेल तसेच ग्रामसभेने घेतलेला कोणताही निर्णय हा अधिकाऱ्यांवर बंधनकारक असेल. प्रत्येक पंचायत निबंधकाला कोणतेही शिफारस करण्यापूर्वी ग्रामसभेशी विचारविनिमय करील.

७. गाव क्षेत्रामध्ये गाव बाजारासाठी ग्रामसभेकडून मान्यता मिळाल्यानंतर तो स्थापन करून चालविण्यास सक्षम असेल या बाबतीत ग्रामसभेने बहुमताने घेतलेला कोणताही निर्णय हा पंचायतीवर बंधनकारक राहील.

८. जेथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्याहून अधिक असेल अशा अनुसूचित क्षेत्रामध्ये अशा पंचायतीच्या अध्यक्ष अनुसूचित जमातीचा असेल.

९. अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य करून घेण्यास पंचायत सक्षम असेल.

१०. पंचायत पंचायतीच्या अधिकारात जमीन व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती यांच्याबाबत ग्रामसभेशी विचारविनिमय केल्यावर कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्यांशी विचार विनिमय पंचायत करील.

संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे

2.98701298701
प्रशांत भगत Apr 25, 2015 07:47 PM

सरपंच निवडीचे नियम व अटी कृपया याविषयी माहिती आवश्यक आहे....

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:27:49.914355 GMT+0530

T24 2019/10/14 07:27:49.920634 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:27:49.485764 GMT+0530

T612019/10/14 07:27:49.503919 GMT+0530

T622019/10/14 07:27:49.580563 GMT+0530

T632019/10/14 07:27:49.581499 GMT+0530