Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 22:40:5.633038 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / निवडणूक कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्या
शेअर करा

T3 2019/05/20 22:40:5.637760 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 22:40:5.661429 GMT+0530

निवडणूक कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्या

निवडणूक कालावधीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांना विविध बाबींबाबत परवानग्या द्याव्या लागतात.

 


लोकसभा निवडणूक कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्या


लोकसभा निवडणूक कालावधीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांना विविध बाबींबाबत परवानग्या द्याव्या लागतात. निवडणुकीसंबंधीचे सर्व परवाने/ परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. वाहन, प्रचार कार्यालय, जाहीर सभा, झेंडे, बॅनर्स अशा अनेक बाबींसाठी परवानगी घ्यावी लागते.

वाहनासाठी परवानगी देताना वाहनधारकाची संमती, प्रतिदिन ठरलेल्या भाड्याच्या रकमेचा तपशील, वाहनाचे R.C., T.C. पुस्तकाची छायांकित प्रत, P.U.C. ची प्रत, वाहनचालकाचा वैध परवाना, वाहन सुस्थितीत असल्याचा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा दाखला अशी कागदपत्रे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक वाटतील, अशी अन्य कागदपत्रे घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर परवानगी देण्यात येईल. वाहन भाड्याची रक्कम निवडणूक खर्चात धरावी. मा.भारत निवडणूक आयोगाकडील सूचनांप्रमाणे महत्तम वाहनांच्या संख्येस अधिन राहून त्या-त्या कालावधीसाठी परवानगी देण्याची कार्यवाही करावी.
प्रचार कार्यालय/ उमेदवार निवडणूक कार्यालय यांचे बाबतीत परवानगी देताना, जागा मालकांची संमती, जागेचा घरफाळा थकित नसलेचा संबंधित स्थानिक प्राधिकरणाचा दाखला, ठरलेल्या भाड्याच्या रकमेचा तपशील, संबंधित पोलीस निरीक्षक यांचेकडील ना-हरकत प्रमाणपत्र अशी कागदपत्रे घ्यावीत. जागा भाड्याची रक्कम निवडणूक खर्चात धरावी. मा.भारत निवडणूक आयोगाकडील सुचनांप्रमाणे महत्तम प्रचार कार्यालय/ उमेदवार निवडणूक कार्यालय संख्येस अधिन राहून त्या-त्या कालावधीसाठी परवानगी देण्याची कार्यवाही करावी.
सभेसाठी परवानगी देताना, जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास भाडे पावती, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाचा ना-हरकत दाखला अशी कागदपत्रे घ्यावीत. भाड्याची रक्कम निवडणूक खर्चात घ्यावी.
खाजगी इमारतीवर झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स लावणेसाठी संबंधित जागा मालकांची संमती, ठरलेल्या भाड्याच्या रकमेचा तपशील इ. कागदपत्रे घ्यावीत. भाड्याची रक्कम निवडणूक खर्चात धरावी.
इलेक्ट्रॉनिक मीडियावरील जाहिरातीसंदर्भातील MCMC कमिटीची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. कक्षामध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याच ठिकाणी संबंधितांनी ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊन आवश्यक त्या परवाने/ परवानगी तात्काळ देण्यात याव्यात. सदर परवानगी देण्यासाठी पुढीलप्रमाणे अधिकारी/ प्राधिकरणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहेत.
परवानगी देणारे अधिकारी/ प्राधिकरण समोर बाब/ तपशील वाहन (प्रचार, मतदान, मतमोजणी) निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवारांचे प्रचार कार्यालय, निवडणूक कार्यालय-संबंधित क्षेत्राचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सभा मिरवणुका, ध्वनीवर्धक-पोलीस प्रशासन, सभेसाठी जागा - स्थानिक प्राधिकरण, इमारतींवर झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स इ. स्थानिक प्राधिकरण.
लेखक - जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत: महान्यूज

3.13559322034
सिद्धू जाधव Sep 17, 2017 07:27 PM

मतदान ला उभे राहण्यासाठी आपल्या नावे गुन्हा नोंद नसावे का नगरपरिषद जत

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 22:40:5.939360 GMT+0530

T24 2019/05/20 22:40:5.945146 GMT+0530
Back to top

T12019/05/20 22:40:5.522718 GMT+0530

T612019/05/20 22:40:5.540263 GMT+0530

T622019/05/20 22:40:5.622702 GMT+0530

T632019/05/20 22:40:5.623535 GMT+0530