आपण बाजारपेठेत फळे, भाजीपाला पॅकिंगवर स्टिकरचे लेबल चिटकविलेले पाहतो; परंतु आता बदलत्या तंत्राप्रमाणे लेबलिंग तंत्रज्ञानामध्येही बदल दिसून येत आहेत. युरोपमधील तज्ज्ञांनी फळांच्या पृष्ठभागावर लेसर तंत्रज्ञानाचा वापर करून लेबलिंग केले आहे. लेसर लेबलिंग चिटकवून लावायच्या स्टीकरपेक्षा जास्त फायदेशीर ठरते. लेसर लेबलिंगमुळे फळांवर आरोग्य विषयक टिप्स देता येतात. त्या कायमस्वरूपी फळांवर राहतात, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. फळांवर चिटकविलेल्या लेबलपेक्षा हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचा दावा या तज्ज्ञांनी केला आहे.
या तंत्रज्ञानामुळे फळे व भाजीपाल्यासाठी परिणामकारक, पर्यावरणाला पूरक तसेच पारंपरिक लेबलला एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी फळे, भाजीपाला विक्री करणाऱ्या कंपन्यांबरोबरीने हे तज्ज्ञ करार करणार आहेत. या करारामुळे महत्त्वाच्या फळ विक्री बाजारपेठांजवळ लेबलिंग करण्यासाठी लेसर यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा ...
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अ...
भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोन...
यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क...