Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:56:45.907049 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / काजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती
शेअर करा

T3 2019/05/26 00:56:45.911853 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:56:45.937773 GMT+0530

काजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती

काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या मधमाश्‍यांच्या जाळ्यासारख्या पेशी असतात, त्यात अर्धप्रवाही घट्ट व चिकट द्रावण असते, त्यालाच काजू टरफल तेल म्हणतात.

  1. काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या मधमाश्‍यांच्या जाळ्यासारख्या पेशी असतात, त्यात अर्धप्रवाही घट्ट व चिकट द्रावण असते, त्यालाच काजू टरफल तेल म्हणतात. काजू टरफलाचे तेल हे काळ्या रंगाचे, घट्ट डांबरासारखे दिसते.
  2. काजू टरफल तेलाचा लॅमिनेटिंग कागद, ऍक्‍टिवेटेड कार्बन, ब्रेक लायनिंग, रंग, रेक्‍झिन, रबर संयुगे इत्यादी उद्योगधंद्यांत मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याव्यतिरिक्त इमारती लाकूड, होड्या, जहाजे इत्यादींना लावण्यासाठी वापर करतात. तेलामुळे लाकडाचे पाणी आणि कीटक, किडी इत्यादींपासून संरक्षण होते.
  3. काजू टरफल तेलापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. कॉरडॅनॉल हा काजू बी टरफलाचा महत्त्वाचा घटक आहे. कॉरडॅनॉलचा उपयोग पृष्ठभागावर थर देण्यासाठी, विद्युतरोधक वॉर्निश आणि लाकडी सामानाला कोटिंग देण्यासाठी होतो.
  4. काजू टरफल तेल ऊर्ध्वपतनानंतर गाळाचा उपयोग हवेवर सुकणारे वॉर्निश, सायकलचे कोटिंग, प्रायमर (रंगाच्या आधी) इ. तयार करण्यासाठी होतो. ब्रेक लायनरमध्ये टरफल तेलाचा उपयोग करतात, तर त्याच्या उपपदार्थांचा उपयोग यंत्राचे तेल, कीडनाशक, औषधी द्रव्य इत्यादीमध्ये करतात.

 

संपर्क : 02358 - 282414 
कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली

स्त्रोत: अग्रोवन

3.02352941176
सतिश देवरे May 22, 2017 03:28 PM

काजू भी टरफल घेनारयाचा काँटयाक नं पाहीजे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:56:46.283104 GMT+0530

T24 2019/05/26 00:56:46.289657 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:56:45.800592 GMT+0530

T612019/05/26 00:56:45.821232 GMT+0530

T622019/05/26 00:56:45.896353 GMT+0530

T632019/05/26 00:56:45.897273 GMT+0530