Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:38:15.524447 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / कापूस पऱ्हाट्यापासून कांडीकोळसा
शेअर करा

T3 2019/10/17 05:38:15.529134 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:38:15.557198 GMT+0530

कापूस पऱ्हाट्यापासून कांडीकोळसा

कापसाच्या पऱ्हाट्यापासून कांडीकोळसा करण्याच्या प्रक्रिया तंत्रज्ञाना संदर्भात मार्गदर्शन.

कापसाच्या पऱ्हाट्यापासून तयार करा कांडीकोळसा

कापूस वेचणी झाल्यावर शेतकऱ्यांपुढील सर्वांत मोठा प्रश्‍न हा पऱ्हाट्यांचा असतो. अनेकजण या पऱ्हाट्या इंधन म्हणून वापरतात किंवा शेतात जाळून टाकतात. शेताच्या कडेला पऱ्हाट्या साठवल्या तर त्यावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव पुढील हंगामातील पिकामध्ये होऊ शकतो. अशा पऱ्हाट्यांपासून कांडीकोळसा तयार करून वाया जाणाऱ्या पऱ्हाट्यांवर उत्तर शोधता येते. एका एकरामध्ये सहा क्विंटल पऱ्हाट्या मिळतात. या पऱ्हाट्या वापरून किमान चार ते पाच महिने कांडीकोळसा तयार करता येतो. याव्यतिरिक्त इतर पिकांच्या काडीकचऱ्याचाही वापर करून वर्षभर कांडीकोळसा उद्योग चालवता येणे शक्‍य आहे.

कांडीकोळसा प्रक्रिया तंत्रज्ञान


भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी शेतातील काडीकचरा वापरून कांडीकोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये कोळसा तयार करण्यासाठी लागणारी भट्टी तसेच कांडीकोळसा बनविण्याचे यंत्र आणि चूल तयार केली आहे.

 

कोळसा तयार करण्याची भट्टी :

ही एक लोखंडी पिंपासारखी भट्टी असून, तिला मधोमध एक झडप असते. कोळसा तयार करण्यासाठी यात पऱ्हाट्या बारीक करून आतमध्ये टाकतात. निम्म्यापेक्षा जास्त भरल्यावर तो पेटवून देऊन झडप बंद करतात. त्यामुळे भट्टीत जितका ऑक्‍सिजन आहे, तोपर्यंत पऱ्हाट्या जळून कोळसा तयार होतो. म्हणजेच ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा केला तर कोळसा तयार होतो. भट्टी पेटवल्यानंतर पाच तासांनी झडप उघडून कोळसा बाहेर काढावा. 
------------------ 
एकूण लांबी +1100 मि.मी. 
एकूण व्यास +800 मि.मी. 
क्षमता कि./दिवस +80 कि.ग्रॅ. 
रूपांतर क्षमता +40 टक्के 
मजूर +2 
--------------------

कांडी कोळसा तयार करण्याचे यंत्र :

भट्टीत तयार झालेल्या कोळसा शेणामध्ये कालवून हे मिश्रण यंत्रामध्ये टाकतात. हे यंत्र स्क्रू प्रेस तंत्रज्ञानावर चालते. कोळसा व शेण एकत्र केलेले मिश्रण स्क्रूच्या साह्याने यंत्रामध्ये पुढे ढकलले जाते. यंत्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गोलाकार नळीतून प्रेस होऊन कांडी कोळसा बाहेर येतो. मानके
------------------- 
क्षमता +60-65 कि./ता. 
रूपांतरण क्षमता +85 टक्के 
मजूर +2 
------------------

चूल :

तयार झालेला कांडीकोळसा हा आपण चुलीत जाळू शकतो; परंतु तो एकूण क्षमतेने जाळावा व जास्त उष्णता प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट चूल तयार करण्यात आली आहे. या चुलीमध्ये दोन जाळ्या बसवलेल्या असून, त्या जाळ्यांमध्ये हा कोळसा भरतात. या चुलीखाली कागद पेटवून ठेवतात. त्यामुळे कोळसा पेट घेतो. कोळसा पेटल्यावर लाल निळसर रंगाची ज्योत मिळते. चार माणसांचा स्वयंपाक बनविण्यासाठी सरासरी 400 ते 500 ग्रॅम कोळसा लागतो. 
------------------ 
एकूण आकारमान मि.मी. +230 x 145 
वजन +2 कि.ग्रॅ. 
क्षमता +400-500 ग्रॅम 
कार्यक्षमता +23-25 टक्के 
---------------------

फायदे :


1) पऱ्हाट्यांची योग्यरीत्या विल्हेवाट लावता येते. 
2) कापसाच्या पऱ्हाट्या जाळल्याने होणारे वायूप्रदूषण कमी करता येते. 
3) स्वस्त, सोपे आणि पर्यावरणासाठी हानिकारक नसलेले जैविक इंधन ग्रामीण भागात सहज तयार करता येते. 
4) ग्रामीण भागात रोजगाराची संधी. 
---------------------

काडीकचऱ्याची प्रतिवर्षी मोसमी उपलब्धता :


पीक +जानेवारी +फेब्रुवारी +मार्च +एप्रिल +मे +जून +जुलै +ऑगस्ट +सप्टेंबर +ऑक्‍टोबर +नोव्हेंबर +डिसेंबर 
मका 
कापूस 
भात 
भुईमुगाची टरफले 
तूर 
तीळ

 

स्त्रोत : अग्रोवोन

3.09489051095
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
लोकडे रवि Sep 05, 2017 01:58 PM

या प्रयोगाचा खर्च सांगा परभानी मो.नं. 70*****38

योगेश शिवाजी बनकर Jul 28, 2017 06:26 PM

प्रकल्प खर्च सांगा

सुधीर आठवले Feb 23, 2017 03:23 PM

औद्योगिक क्षेत्रा त याचा फायदा हो तो का? याचि माहिती सांगा ९७६५२९१७८५

रामेश्वर जगन्नाथ शिंदे जोगेश्वरी मो. नंबर 9921869932 Feb 02, 2017 08:22 AM

प्रकल्प खर्च सादर करवा

रामेश्वर जगन्नाथ शिंदे जोगेश्वरी मो. नंबर 9921869932 Feb 02, 2017 08:17 AM

प्रकल्प खर्च सादर करवा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:38:15.950501 GMT+0530

T24 2019/10/17 05:38:15.956772 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:38:15.422382 GMT+0530

T612019/10/17 05:38:15.439263 GMT+0530

T622019/10/17 05:38:15.514043 GMT+0530

T632019/10/17 05:38:15.514951 GMT+0530