Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:23:58.038700 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / फळ प्रक्रिया करताना...
शेअर करा

T3 2019/10/14 23:23:58.043380 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:23:58.071913 GMT+0530

फळ प्रक्रिया करताना...

फळ प्रक्रिया करताना आवश्यक असणाऱ्या बाबींची येथे माहिती देण्यात आलेली आहे.

प्रस्तावना

1) फळांचे काप सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात ठेवून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करता येते.
उदा - सुकेळी, आंबा पोळी, मनुका, सुके अंजीर, फणसपोळी इत्यादी.

2) फळांच्या गरातील किंवा रसातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी मुख्यत्वे साखरेचा उपयोग केला जातो. उदा. ः जॅम, जेली, मार्मालेड, मुरंबा, स्क्वॅश, सिरप इत्यादी.

3) काही फळांच्या बाबतीत मिठाचे द्रावण वापरून पदार्थांचे आयुष्य वाढविले जाते. उदा. : कच्च्या आंब्याच्या फोडी, आवळा मिठाच्या द्रावणात साठविणे, आमसूल.

4) फळे व त्यांपासून बनविण्यात येणारे पदार्थ बाटलीमध्ये अथवा डब्यामध्ये हवाबंद करून त्यांचे पाश्‍चरीकरण केले जाते. पदार्थ ः बाटलीबंद वेगवेगळ्या फळांची पेये, डबाबंद फळांच्या फोडी इत्यादी.

5) लोणच्यामध्ये मोहरी, मसाल्याचे पदार्थ, मीठ, गोडेतेल, व्हिनेगर वापरल्याने फळांचे आयुष्य वाढते.

6) तापमान कमी केल्यानेसुद्धा फळे आणि त्यांचे पदार्थ जास्त काळ टिकविण्यास मदत होते. उदा.ः फ्रोझन डाळिंबाचे दाणे, फ्रोझन आमरस, कमी तापमानाला ताजी फळे साठविणे.

7) अति शीतकरण - फळांचा रस काढून तो निर्जंतुक करून वजा 30 डिग्री ते वजा 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला थंड करून गोठविण्यात येतो. त्यानंतर त्याच तापमानाला साठविला जातो. यामुळे त्या रसांचा स्वाद, रंग उत्तम राहतो.

8) पदार्थ निर्जंतुक डबाबंद करणे - या पद्धतीमध्ये फळांचा रस हवेच्या कमी दाबावर व कमी तापमानावर आटविला जातो. त्यानंतर निर्जंतुक करून प्लॅस्टिक बॅग किंवा टीनच्या डब्यामध्ये हवाबंद केला जातो.

9) नियंत्रित कक्षामध्ये (उदाहरण - हवेतील वायूंच्या प्रमाणाचे नियंत्रण, तापमान नियंत्रण, आर्द्रता नियंत्रण) फळांच्या आवश्‍यकतेनुसार वर दिलेल्या घटकांचे प्रमाण नियंत्रित केल्यास आयुष्यमान जास्त वाढते.

10) बाजारात वेगवेगळ्या वेष्टणांचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमालानुसार करूनसुद्धा फळांचे व त्यांच्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांचे आयुष्य वाढविता येते. उदा. - आंबा पोळी, सुकेळी, केळीचे वेफर्स, फळांपासून बनविण्यात येणाऱ्या पावडर इत्यादी लॅमिनेटेड पाऊचमध्ये सर्व वायू काढून त्यामध्ये नायट्रोजन भरला जातो. नायट्रोजन निष्क्रिय वायू असल्यामुळे त्या पदार्थांवर कुठलीही प्रक्रिया न होता ते जसेच्या तसे जास्त दिवस टिकतात.

 

स्त्रोत: अॅग्रोवन

2.984
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
संजय डिंगणकर गुहागर Sep 15, 2017 05:56 PM

काजू ड्रायमध्ये ठेवल्यावर किती डिग्री सेल्सियस तापमान व किती तास ठेवावे.फॅन सुरवातीपासून सुरू ठेवावा का

सुमित कुंभार Mar 29, 2017 10:47 AM

मला जॅम जेली बदल सविस्तर माहिती मिळेल का

जय कुमार Mar 09, 2017 09:38 AM

मला व्यावसाईक पद्धतीने जेली बनविण्या साठी सविस्तर माहिती मिलेल का...?
मो. 78*****43

सागर कटके Dec 04, 2016 11:14 AM

सर
मला सिताफळाचा गर काढणे आणि तो टिकून ठेवण्याची माहिती मिळेल.
अंजीर सुकवणे प्रक्रिया याची ही माहिती मिळेल

avinash pathare Aug 05, 2016 05:11 PM

सर,
लिंबु रस प्रक्रिया बद्दल सविस्तर माहिती मिळेल का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:23:58.405590 GMT+0530

T24 2019/10/14 23:23:58.411415 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:23:57.961392 GMT+0530

T612019/10/14 23:23:57.977898 GMT+0530

T622019/10/14 23:23:58.028725 GMT+0530

T632019/10/14 23:23:58.029499 GMT+0530