Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 21:27:16.424949 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / मशरूमचे औषधी गुणधर्म
शेअर करा

T3 2019/05/24 21:27:16.429608 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 21:27:16.453038 GMT+0530

मशरूमचे औषधी गुणधर्म

मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे.

मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. आपल्या शरीराच्या वाढी साठी व सुस्थितीत राहण्याकरिता १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहा अमिनो आम्ले मशरूम मध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत.

 • मधुमेही व्यक्तींकरिता उपयुक्त
 • मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व्यक्तींना असते. मशरूममध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत.
 • मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यास उपयुक्त
 • लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम अन्न
 • कमी उर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूम मध्ये कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे.
 • स्कर्व्ही रोगापासून बचाव
 • मशरूममध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मशरूमचे नियमित सेवन केल्यास स्कर्व्ही रोगापासून बचाव होऊ शकतो.
 • पचनक्रिया सुरळीत ठेवण्य करिता मदत करणारे अन्न
 • मशरूममध्ये तंतुमय पदार्थ अधिक आहेत. तसेच फॉलिक अॅसिड आहे. हे दोन्ही घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरिता मदत करतात.

मशरूमची विक्री व्यवस्था

 

मशरूमची विक्री दोन प्रमुख घटकांत मोडते.

ताज्या मालाची विक्री

वाळविलेल्या मालाची विक्री

१) ताजे मशरूम २५ ते ३० रुपये प्रति किलो घाऊक दराने विकले जातात. पुणे- मुंबईत भाजी मंडईत सहज विक्री होत आहे.

२) वाळवलेले मशरूम विक्री हा ताज्या मशरूम पेक्षा विक्रीस सोपा प्रकार आहे. ताजे मशरूम वाळवून (सूर्यप्रकाशात/ड्रायर मध्ये) सीलबंद केल्यास ३ वर्षे टिकतात. त्यामुळे खराब होण्याची भीती नाही. वाळविलेले मशरूम २५० ते ३०० रुपये प्रति किलो दराने खरेदी केले जातात.

मशरूम हा पदार्थ एक वरदानच आहे !

 • हजारो वर्षांपासून मशरूमचा खाद्यपदार्थांमध्ये वापर होतो. सुमारे ४०० बी.सी. काळामध्ये ग्रीक लोकांनी प्रथम मशरूमचा खाण्यासाठी वापर सुरु केला.
 • इजिप्तमध्ये मात्र ‘फराहों’साठी मशरूम वाढविले गेले. सामान्य माणसासाठी ते फार ‘नाजूक’ समजले जात असत.
 • रोमन लोक मशरूम म्हणजे ‘देवाचे खाणे’ समजत आणि त्यांचा पूर्ण विश्वास होता की, मशरूममुळे अधिक ताकद, उत्साह वाढवण्यास मदत होते.
 • फ्रान्समध्ये १७ व १८ शतकांमध्ये मोठ्या प्रमाणात मशरूमचे उत्पादन घेणे सुरु झाले.
 • स्वीडनमध्ये प्रथम ‘ग्रीनहाऊस’ मध्ये मशरूम उत्पादन घेणे सुरू झाले व १९व्या शतकांमध्ये इंग्लंडमध्येही ते सुरु झाले.
 • अमेरिकेमध्ये १८९० पासून व्यावसायिकदृष्ट्या प्रथमच मशरूम उत्पादन सुरु झाले.
 • पोलंड, रशिया, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, चीन, जपान व आता जगभर सर्वत्र स्वादिष्ट अन्न म्हणून मशरूम आवडीने खाल्ले जातात.
 • भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे व जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
 • मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण ते संपूर्णतः शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरूम वरील संशोधनानंतर मशरूम मध्ये ‘अॅन्टी व्हायरल’ व ‘अॅन्टी कॅन्सर’चे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत.

 

स्त्रोत : वनराई संस्था

3.08695652174
रणधीर तांबे Nov 04, 2016 05:52 PM

मला मशरूमची शेती करायची आहे कृपया त्या बाबत सर्व माहिती पाहिजे आहे.

रणधीर तांबे Nov 04, 2016 05:51 PM

मला मशरूमची शेती करायची आहे कृपया त्या बाबत सर्व माहिती पाहिजे आहे.

रणधीर तांबे Nov 04, 2016 05:49 PM

मशरुम ची शेती कशी करावी. त्यासाठी कोणते प्रशिक्षण घ्यावे लागेल का प्रशिक्षण असेल तर किती दिवसाचे आणि त्याची फी किती आणि मशरुम ला बाजारपेठ कोठे आहे.मशरुमची शेती केली तर त्याला योग्य बाजारपेठ मिळेल का

घोरपडे विरेश Oct 19, 2015 10:11 PM

मशरुम विक्रि संबन्धित महिति हवि

प्रविण शंकर रोकडे Aug 30, 2015 06:54 AM

नमस्कार,
बटाटा वेफर्स व त्याचे विविध फ्लेवर्स
निर्मिती कशि करावी व त्या साठी लागनारे
"सेमी ऑटोमॅटीक मशिन" वाजवी किंमती मधे
कुठे व कसे मिळवावे आणि त्या साठी
शासकिय सबसिडीज आहे का ? असल्याच त्याचा कसा लाभ घ्यावा?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/24 21:27:16.752037 GMT+0530

T24 2019/05/24 21:27:16.759409 GMT+0530
Back to top

T12019/05/24 21:27:16.345967 GMT+0530

T612019/05/24 21:27:16.362500 GMT+0530

T622019/05/24 21:27:16.414434 GMT+0530

T632019/05/24 21:27:16.415184 GMT+0530