Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:36:40.157171 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / उसापासून पॅकेजिंग
शेअर करा

T3 2019/10/17 05:36:40.162053 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:36:40.189656 GMT+0530

उसापासून पॅकेजिंग

सर्व प्रकारच्या उत्पादनविक्रीसाठी पॅकेजिंग ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. पॅकेजिंगमधून त्या उत्पादनाच्या वैशिष्ट्याला उठाव आणण्याचे काम केले जाते.

सर्व प्रकारच्या उत्पादनविक्रीसाठी पॅकेजिंग ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. पॅकेजिंगमधून त्या उत्पादनाच्या वैशिष्ट्याला उठाव आणण्याचे काम केले जाते. सेंद्रिय उत्पादनासाठी नैसर्गिक व सेंद्रिय पॅकेजिंग आवश्‍यक मानले जाते. तसा आग्रहही आता जागरूक ग्राहक आणि सुपर मार्केट धरत आहेत. नेदरलॅंड येथील सेंद्रिय उत्पादक कंपनीने आपल्या पुरवठादारासह उसाच्या टाकाऊ घटकापासून पॅकेजिंग विकसित केले आहे.
नेचर अँड मोअर ही कंपनी सेंद्रिय भाजीपाला आणि फळांच्या उत्पादन आणि विक्रीमध्ये प्रसिद्ध आहे. सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीसाठी सेंद्रिय पद्धतीच्या पॅकेजिंगसाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांनी फळांच्या पॅकेजिंगसाठी उसाच्या टाकाऊ घटकापासून बनविलेल्या कार्डबोर्डचा वापर केला आहे. याविषयी माहिती देताना कंपनीचे पॅकेजिंग तज्ज्ञ पॉल हेन्ड्रिक्‍स यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांपासून नवीन प्रकारचे पॅकेजिंग विकसित करण्यासाठी पुरवठादारांसह प्रयत्न केले आहेत. त्यातून उसाच्या टाकाऊ घटकांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात पॅकेजिंगनिर्मिती करण्यात येत आहे. या पॅकेजिंगचा उपयोग सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या वेली टोमॅटो, पिअर विक्रीसाठी केला जातो.

सुपर मार्केटही वळताहेत प्लॅस्टिकमुक्त पॅकेजिंगकडे

विघटन होणारे, पुनर्वापर करणे शक्‍य असलेल्या प्लॅस्टिकमुक्त व पर्यावरणपूरक पॅकेजिंगच्या वापराकडे सुपर मार्केट वळत आहेत. नेचर अँड मोअरच्या सेंद्रिय उत्पादनांचा प्रमुख खरेदीदार असलेल्या फ्रेंच चेन चारेफोर या सुपर मार्केट व्यवस्थापक ज्यूली मेहमोन म्हणाल्या, की आम्ही आमच्या पुरवठादारांकडून पॅकेजिंगसह अनेक बाबींमध्ये पुनर्वापरायोग्य अशा घटकांच्या वापराला प्रोत्साहन देत असतो. त्यातून कचरा विल्हेवाटीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच उसासारख्या घटकापासून पॅकेजिंग ही चांगली कल्पना आहे. त्याचा वापर अन्य पुरवठादारही करतील, अशी आशा आहे.

हे फायदे आहेत

  • प्लॅस्टिकचा वापर टाळला आहे.
  • टाकाऊ घटकांचा पुरेपूर वापर
  • कागदाच्या निर्मितीसाठी झाडांची तोड करावी लागणार नाही.
  • सध्या कंपनी जुन्या पद्धतीच्या ट्रे, टॅग आणि लेबल, स्टिकर यामध्येही बदल करीत आहे. उसापासून पॅकेजिंग हे स्वच्छ, नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनासाठी योग्य आहे. तसेच वापरानंतर विल्हेवाट लावण्यामध्येही सोपे आहे. अगदी ते जाळले तरी पर्यावरणामध्ये प्लॅस्टिकप्रमाणे विषारी वायू निर्माण होत नाहीत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

3.03816793893
विशाल PATIL Oct 24, 2017 01:29 PM

कृपया पूर्ण माहिती सांगा
पाकीट तयार करण्याची पद्धत
मशीन बद्दल माहिती, कुठे आणि कशे

D.t.sonawane Sep 15, 2017 06:51 PM

ऊसाच्या पाचट पासून काय करता येईल.

Amol Gandhale Jan 06, 2017 11:53 PM

How to use sugarcane in packaging?

अंकुश भोर Nov 15, 2016 10:48 AM

माहिती मिळेल का

Anirudha MIRIKAR Aug 01, 2016 11:45 AM

सेंद्रिय खात म्हणून उसाचे पाचट वापरू शकता. बाजारात मल्चिंग पेपर उपलबध असून, त्याचा उपयोग करावा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:36:40.522974 GMT+0530

T24 2019/10/17 05:36:40.528911 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:36:40.040497 GMT+0530

T612019/10/17 05:36:40.060131 GMT+0530

T622019/10/17 05:36:40.144793 GMT+0530

T632019/10/17 05:36:40.146041 GMT+0530