Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:06:48.461576 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / स्पिरुलीना (शेवाळ) प्रकल्प
शेअर करा

T3 2019/10/17 06:06:48.470242 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:06:48.505764 GMT+0530

स्पिरुलीना (शेवाळ) प्रकल्प

ज्यामध्ये स्व:स्तातले बियाणे,खते कमी, कमी मजूर, किडीचा कमी प्रादुर्भाव आणि भरपूर उत्पादन आणि मुळात बाजारभाव चांगला मिळेल अणि मार्केट मिळणे सोपे

महिला बचत गटांसाठी एक सोपा उदयोग

स्पिरुलीना (शेवाळ ) प्रकल्प

महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात चावडीच्या माध्यमातून शेतकरयांशी ; महिला बचत गटांसोबत तसेच तरूणांबरोबर संवाद साधताना अशी मागणी आली की,एखादा असा व्यवसाय सुचवा ज्यामध्ये स्व:स्तातले बियाणे,खते कमी, कमी मजूर, किडीचा कमी प्रादुर्भाव आणि भरपूर उत्पादन आणि मुळात बाजारभाव चांगला मिळेल अणि मार्केट मिळणे सोपे असा प्रकल्प सांगा. जेव्हा या प्रश्नावर अभ्यास केला तेंव्हा एका आगळ्यावेगळ्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती मिळाली. या व्यवसायाचे नाव आहे “ स्पिरुलीना प्रकल्प (हिरवे-निळे शेवाळ निर्मिती) “ हे शेवाळ हौदामध्ये तयार केले जाते.

१. जागा - १ ते २ गुंठे (हा प्रकल्प फक्त शेतावर करावा असे बंधन नाही अगदी शहरी भागात मोकळ्या प्लॉट मध्ये ; घराजवळील मोकळ्या जागेत हा प्रकल्प सूरू करता येईल)

२. उत्पादन खर्च – प्रति किलो १०००-१५०० रुपये

३. शेवाळाचा नक्की उपयोग – विविध आजारांवर प्रभावी औषध म्हणून वापरले जाते.शक्तिवर्धक आहे.नासाने यास सर्वोत्तम अन्न म्हणून घोषित केले आहे.

४. प्रकल्प उभारणीचा खर्च – १ ते १.५ लाख

५. मजूर,पाणी लागते का ? – पाणी सारखे लागत नाही. घरातील प्रशिक्षित व्यक्ती हे काम एकटेसुद्धा करू शकते

६. बाजारभाव - थेट स्वत विक्री केल्यास अंदाजे ५००० ते ६०००/- किलो

७. बाजारात कुठे विकले जाते?
कंपन्या मार्केटमध्ये विकत घेण्यास तयार आहेत तसेच लोकल मार्केट मध्ये विक्री करणे शक्य आहे.

८. बँक कर्ज व शासकीय योजना – यास शासनातर्फे प्रयत्न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकते तसेच पत पाहून बँक कर्ज उपलब्ध होऊ शकेल.

सुरवातीस ५० हजार ते १ लाख खर्च करून उद्योग सुरु केल्यास जास्त फायदा होईल.

महिला बचत गटाने एकञ येऊन आपल्या राहत्या घराच्या शेजारच्या मोकळ्या जागेत सुध्दा छोटा प्रकल्प सुरू करता येईल.
सुशिषित बेरोजगार तरूणांसाठी हा उदयोग म्हणजे एक सर्वात मोठी संधी म्हणायला हरकत नाही.

हा व्यवसाय सुरू केल्यास


कमी भांडवल,कमी मनुष्यबळ,सोपे तंत्र,आणि भरपूर नफा असे या व्यवसायाचे सूत्र आहे.
अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र , (पायरेन्स ) बाभळेश्वर, ता राहता जि अहमदनगर येथे संपर्क करावा

 

लेखक : अनिरुद्ध मिरीकर

3.02941176471
शेखर Salunke Mar 04, 2018 08:17 PM

मला पण आवड आहे आणि हा व्यवसाय करायचा आहे

अशोक म्हात्रे Jan 04, 2018 02:47 PM

खाऱ्या पाण्यातील शेवाळ शेती प्रशिक्षण घेण्यासाठी

सोपान बिन्नर Jul 18, 2017 06:35 PM

मला याचाविषय पूर्ण माहिती हवी आहे 77*****37

विजय patil Jun 20, 2017 02:55 PM

सर मला याची पूर्ण माहिती पाहिजे आहे 777888517

विनय पाटील May 24, 2017 05:17 PM

सर मला यांच्याविषयी थोडी माहिती हवी आहे हि शेती कश्या पध्यतीने करतात
86*****37

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:06:49.290655 GMT+0530

T24 2019/10/17 06:06:49.298324 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:06:48.339860 GMT+0530

T612019/10/17 06:06:48.391954 GMT+0530

T622019/10/17 06:06:48.450160 GMT+0530

T632019/10/17 06:06:48.451023 GMT+0530