অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यशस्वी उद्योजिका

रोपवाटिकेमध्ये रोपांची निगा राखताना रोपांना योग्य पद्धतीने  सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके व पाणी वेळच्यावेळी देऊन चांगल्या पद्धतीने रोपांची निगा राखणे हे माझे सर्वात महत्त्चाचे काम आहे. रोप वाटिकेच्या व्यवस्थापनामध्ये रोपांची निर्मिती करण्यासाठी मी एक स्वतःची पद्धत विकसित केली आहे. त्यामध्ये शैतकरी, घरातील व्यक्ती व कर्मचारी यांचा सहभाग असतो. माझा व्यवसाय यशस्वी होण्यामागे सर्वात जमेची बाजू म्हणजे व्यक्सायासाठी असलेल्या आरती संस्थेमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे तांत्रिक मार्गदर्शन होय.

व्यवसाय वाढीसाठी आरती संस्थेमधून मला पूर्ण सहकार्य वेळोवेळी मिळत असते. माझा दिवस सकाळी ६ वा. सुरू होऊन रात्री १० वा. संपतो. यामध्ये सात तास व्यवसायासाठी व नऊ तास घरगुती कामांसाठी मी खर्च करते. रोपवाटिकेचे काम व्यवस्थित व सुरळीत चालाचे यासाठी आम्ही आमच्या कामाची विभागणी केली असून त्यामध्ये चांगल्या प्रतीचे बियाणे, मातीची उपलब्धता करून देण्याचे काम माझे पती करतात.

मजुरांचे नियोजन करून, मजुरांकडून पिशव्या भरणे, बेणे तयार करणे, बेणे प्रक्रिया व लागवड करणे, औषध फवारणी, खते व पाणी देण्याचे काम मी व माझ्या सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणे इत्यादी कामें मी स्वतः करते. शैतक-यांना विक्री पश्चात सेवा देणे, शेतक-यांच्या शैतात जाऊन मार्गदर्शन करणे ही कामे माझे पती करतात. अशाप्रकारे वेगवेगळया स्तरावर आम्ही कामांची विभागणी करून रोपवाटिकेचे व्यवस्थापन केले आहे.

रोपांची गुणवत्ता राखणे

रोपांची गुणवत्ता राखणेसाठी मी खूप जागृत रहाते. कारण जर मी माझ्या रोपांची गुणवत्ता राखली तरच शेतक-यांना जास्तीतजास्त उत्पादन मिळेल. यासाठी मी चांगल्या प्रतीची माती, खते, बियाणे, बेणे प्रक्रिया तसेच वेळोवेळी औषध फवारणी इत्यादी गोष्टींकडे लक्ष देते.

व्यवसाय विकास

माझ्या व्यक्साय वृद्धीसाठी मी सतत विचार करून, नवनवीन कल्पना विकसित करून त्या सतत राबवीत असते. त्यामुळे मी माझे पैसे, वेळ व श्रम वाचवते. उदा. मी जेव्ह्या माझा व्यवसाय सुरु केला त्यावेळी अगोदर स्वत: रोपे तयार करुन आमच्या शैतात लावली व त्या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केला. त्यामुळे ऊस रोप लागवड तंत्राविषयी शेतक-यांना माहिती होऊन उत्पादन वाढीसाठी शैतक-यांना फायदा झाला व त्यक्साथ वृद्धीसाठी माझाही फायदा झाला.


तंत्रज्ञान

ऊस रोपवाटिका हे तंत्रज्ञान अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूट (आरती) या संस्थेने विकसित केलेले आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये या तंत्रास खूपच कमी प्रतिसाद मिळत होता. या तंत्राचा प्रसार व्ह्याचा यासाठी आरती संस्थेद्वारे सुरुवातीस शेतक-यांना मोफत रोपे वाटप करणे त्याचबरोबर इच्छुक शेतकरी, महिला बचतगट सदस्या व व्यवसाय करू इच्छिणा-या सुशिक्षित बेरोजगार महिला यांना आरती संस्थेने विकसित केलेल्या तंत्रांच्या प्रशिक्षणासंदर्भींची बातमी पेपेरमध्ये वाचून मी आरती संस्थेच्या तंत्रांचे प्रशिक्षण घेतले व त्यामधून ऊस रोपवाटिका या तंत्राची व्यवसायासाठी निवड केली कारण यासाठी आवश्यक असणारी जमीन,पाणी, मजूर, इत्यादी गोष्टी माझ्याकडे उपलब्ध होत्या. तसेच या तंत्रामुळे शेतक-यांचे काबाडकष्ट कमी होऊन वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते व उत्पादनामध्ये ३० ते ४० टक्के वाढही होते.

व्यवसायामुळे झालेले फायदे


  1. सुरुवातीच्या काळात जे तंत्रज्ञान शेतक-यांनी स्वीकारले नाही, त्या तंत्रावर आधारित व्यवसायच मी सुरू केला व पुढील काळात ह्य व्यक्साय यशस्वी झाल्यामुळे माझ्यामध्ये एक प्रकारचे धाडस निर्माण झाले.
  2. या व्यवसायामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींचा सहभाग असतो.
  3. या व्यवसायामुळे गोर-गरीब मजुरांना कायमस्वरूपी काम मिळाले आहे.
  4. हजारो शेतक-यांच्या ऊस उत्पादनामध्ये ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे.
  5. या व्यवसायामुळे मला एक प्रकारचे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले असून समाजामध्ये नाव, प्रसिद्धी व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
  6. या तंत्रामुळे शेतक-यांना दीड ते दोन महिने वयाची तयार ऊस रोपे
  7. मिळत असल्यामुळे त्यांचे शेतातील खत, पाणी, खूपण याची वेळ व त्यासाठी होणा-या खर्चामध्ये बचत होत आहे.
  8. सदर व्यवसायामुळे मला घरच्या घरी पूर्णवेळ काम मिळाले आहे. त्यामुळे मला माझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेऊन व्यवसाय संभाळता येतो.
  9. सदर व्यवसायामुळे माझ्या कुटुंबाचे राहणीमान उंचावले असून माझ्या मुलांना चांगले शिक्षण मी देऊ शकते.
  10. माझ्या नर्सरीला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बचत गटाच्या महिला, साखर कारखान्यांचे पदाधिकारी, परराज्यातील शेतकरी येतात व व्यवसायासंबंधित माहिती घेतात. त्यामुळे मला त्यातून प्रोत्साहन व स्फूर्ती मिळते. तसेच संपूर्ण राज्यामध्ये एक यशस्वी स्त्री उद्योजिका म्हणून मला नावलौकिक प्राप्त झाले.

इतर माहिती

सध्याच्या काळात शेती मधील नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही परंतु शेतातील हे आव्हान समस्त शेतकरीबंधू व भगिनींच्या विकासासाठी मी स्वीकारले.

यासाठी मी आरती संस्थेशी संपर्क साधला व आरती संस्थेने विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रांचे १० दिवसाचे प्रशिक्षण मी १० वर्षांपूर्वी घेतले व ऊस रोपवाटिका या तंत्राची व्यवसायासाठी निवड केली कारण या तंत्रामुळे शेतक-यांच्या ऊस उत्पादनात वाढ होऊन त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त होण्यासाठी मदत मिळते, मी स्वतः एका शेतक-याची मुलगी असून मला शेतक-यांच्या व्यथा माहिती आहेत.

दिवसेंदिवस माझा व्यवसाय वाढत असून या व्यवसायामुळे १५ ते २० गरीब लोकांना रोजगार निर्माण झाला आहे. १० वर्षांपासून मी हा व्यवसाय करत असल्यामुळे अनेक शेतक-यांनी (२५00 ते ३ooo) माझ्या रोपवाटिकेमधून रोपे विकत घेतली आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पादन ३० ते ४० टक्के वाढली आहे. अशा पद्धतीने माझ्या व्यवसायामुळे शेतक-यांचे उत्पादन वाढून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. उद्योजक म्हणून माझे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यांमध्ये तीन ते चार हजार शेतक-यांशी संपर्क झाला आहे. मी माझा व्यवसाय फलटण तालुक्यातील विडणी या गावामध्ये सुरू केला असून माझी रोपवाटिका मुख्य रस्त्यापासून १ कि.मी. आत आहे.

रोपवाटिकेपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ताही नाही. अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी शेकडो शेतकरी माझ्या नर्सरीमध्ये येऊन रोपे खरेदी करत असतात. मी माझा व्यवसाय विकसित करण्यासाठी खूप मेहनत घेतली असून व्यवसायामध्ये सातत्य व चिकाटी ठेवून शेतक-यांबरोबर संपर्क विकसित केले आहेत. शेतकरीबंधू व भगिनींशी प्रामाणिक राहून त्यांचा विश्वास संपादन केला आहे. आरती संस्थेला सुध्दा मी करीत असलेल्या व्यवसायाबद्दल अभिमान वाटतो.

ते अनेक स्वयंसेवी संस्था, शेतकरी, बचत गट, परराज्यातील व परदेशातून आलेल्या पाहुण्यांना ऊस रोपांबाबत माहिती घेण्यासाठी माझ्या रोपवाटिकेमध्ये पाठवीत असतात. त्यामुळे मला आणखी स्फूर्ती व प्रोत्साहन मिळते.

'शेतक-यांचा विकास हाच आमचा ध्यास' या आमच्या चैतन्य ऊस रोपवाटिकेच्या ब्रीद वाक्यानुसार आता पर्यंत २५oo ते ३ooo पेक्षा जास्त शेतकरीबंधू व भगिनींनी आपल्या शेतामध्ये उसाची रोपे लावून भरघोस उत्पादन घ्यावे व आपले व आपल्या राज्याचे नाव देशपातळीवर मोठे करावे, अशी माझी विनंती आहे.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate