Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia

मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / शेतीमाल ऑनलाइन खरेदी-विक्री
शेअर करा
Views
  • स्थिती: परीक्षण प्रक्रिया चालू

शेतीमाल ऑनलाइन खरेदी-विक्री

एकात्मिक दृष्य ऑनलाइन विक्री बाजारपेठेद्वारा शेतकरी ऑनलाइन माल विकू शकतात, तसेच त्यांना पेमेंटही ऑनलाइन मिळणार आहे.

कर्नाटक

बंगळूर - ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांना कोठूनही शेतीमालाची खरेदी-विक्री करता येणार असून, अॉनलाइन सुविधा पुरविणारे कर्नाटक हे पहिलेच राज्य आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. येथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या अॉनलाइन खरेदी-विक्री सेवेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, "आमचे सरकार शेतकऱ्यांना सक्षम करू इच्छीते ज्यामुळे ते आपल्या मालाच्या किमती ठरवू शकतील.

ऑनलाइन मार्केट हे या दृष्टीनेच उचललेले एक पाऊल आहे. परवानाधारक व्यापारी कृषी मालाची कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन बोली लावू शकतात. समाधानकारक दर न मिळाल्यास नकार देण्याचा अधिकार या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना आहे. अशा प्रकारची व्यवस्था सुरू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य आहे. कृषी उत्पादनांची किंमत शास्त्रीय पद्धतीने निश्‍चित करण्यासाठी नुकत्याच सुरू केलेल्या कृषी विपणन योजनेशी संलग्न अशी ही ऑनलाइन विक्री व्यवस्था आहे. त्याचबरोबर राज्याचा कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.

ऑनलाइन विक्री बाजारपेठेच्या उद्घाटनानंतर दहा मिनिटांतच 10 व्यापाऱ्यांनी सुक्‍या खोबऱ्यासाठी, तर 53 व्यापाऱ्यांनी हळदीसाठी बोली लावली. ही कृषी मालाच्या विक्रीतील क्रांतीची नुसती सुरवात आहे. या व्यवस्थेमधून शेतकऱ्यांना कृषी मालाची योग्य किंमत मिळेल, असे जाणकारांनी सांगितले. या एकात्मिक दृष्य ऑनलाइन विक्री बाजारपेठेद्वारा शेतकरी ऑनलाइन माल विकू शकतात, तसेच त्यांना पेमेंटही ऑनलाइन मिळणार आहे. सहकार मंत्री एच. एस. महादेव प्रसाद आणि कृषी विपणन मंत्री शामानुर शिवशंकराप्पा, मुख्य सचिव कौशिक मुखर्जी या वेळी उपस्थित होते.

या विनियमित बाजारपेठेत शेतकऱ्यांनी प्रवेश करताच कृषी मालाचे तपशील घेऊन त्यांना युनिक आयडेंटीफिकेशन नंबर दिला जाईल. आडत्यांचे वाटा आणि बाजारपेठ शुल्कदेखील व्यापाऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीनेच भरले जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाइन विक्री झालेल्या मालाचे सर्व तपशील त्यांच्या मोबाईलवर कळवले जातील.

 

स्त्रोत: अग्रोवन

2.96551724138
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Back to top