Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/01/22 17:28:59.108544 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / पर्यायी शेती पद्धती
शेअर करा

T3 2018/01/22 17:28:59.113791 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2018/01/22 17:28:59.142351 GMT+0530

पर्यायी शेती पद्धती

रायचूर जिल्ह्यातील नागलापूर गावातील बसवराजप्पा या 38 वर्षीय शेतकर्याने पर्यायी शेती पद्धतीचा वापर करून कशाप्रकारे किफायतशीर उत्पन्न घेतले याची माहिती दिली आहे.

रायचूर जिल्ह्यातील नागलापूर हे 140 घरे असलेले लहानसे गांव आहे. त्यांच्यापैकी बहुतांश जण लिंगायत, अनुसूचित जाती आणि माडीवाला समुदायाचे शेतकरी आहेत. तुंगभद्रा कालवा प्रकल्पाच्या टोकाच्या क्षेत्रात वसलेल्या या शेतक-यांपैकी काहींना जलसिंचनाची सुविधा उपलब्‍ध आहे. तथापि, गेल्या पांच वर्षांत, ह्या गांवाला या स्रोतापासून अजिबात पाणी मिळालेले नाही, त्यामुळे हे शेतकरी पूर्णतः पावसावर अवलंबून आहेत. ज्वारी, कापूस आणि सूर्यफूल ही इथली मुख्य पिके आहेत. या गांवात काळी जमीन असलेली क्षेत्रे, मात्र, तिथे कापूस पिकविण्यासाठी उपयुक्‍त आहेत. कापूस पीक एकपीक व्यवस्थेखाली घेतले जाते. खरेदी केलेल्या घटकांच्या वाढत्या वापरामुळे कापूस पीक कमी नगदी बनले आहे.

बसवराजप्पा हा लिंगायत समुदायाचा  38 वर्षांचा शेतकरी आहे आणि तो चौथ्या इयत्तेपर्यंत शिकलेला आहे. तो 12 जणांच्या संयुक्त कुटुंबात वाढलेला आहे. त्याशिवाय, त्यांच्या स्‍वत:च्‍या शेतावरील कामाबरोबरच, कुटुंबातील सदस्य घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रोजंदारीवर देखील काम करतात. मंदीच्या दिवसांमध्ये, घरातील पुरुष मंडळी कामाच्या शोधात शेजारच्या शहरांमध्ये स्थलांतर करतात. बसवराजप्पाच्या मालकीची 4 एकर कोरडवाहू जमीन आहे. त्‍यामध्‍ये तो कापूस, ज्वारी आणि सूर्यफुलाची पिके घेतो. या भागातील सर्वसामान्य पद्धतीनुसार तो कापूस हे एकल पीक म्हणून घेतो. शेणखत तीन वर्षांतून एकदा तर यूरिया, डीएपी आणि संयुक्त उर्वरके प्रत्येक हंगामात दर एकर 50 किलो या दराने वापरण्याची इथे सर्रास पद्धत आहे. बियाणे स्थानिक किरकोळ दुकानातून आणून थेट जमिनीत पेरतात. साधारणपणे, मोनोक्रोटोफॉस, एंडोसल्‍फन, क्विनॉलफॉस यांसारख्या रसायनांसह 5-6 कीटकनाशकांच्या फवारण्या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय म्हणून करतात. या सर्व पद्धतींचा अवलंब करुन तो दर एकर सरासरी 5 क्विंटल कापसाचे पीक घेत असे.

पर्यायी शेती पद्धतींच्या दिशेने वाटचाल

बसवराजप्पा हा या समूहातील एक क्रियाशील सदस्य आहे. AME प्रतिष्ठानाद्वारे आयोजित करण्‍यात आलेल्या फार्मर्स् फील्‍ड स्‍कूल (शेतकरी क्षेत्र शाळा) मध्‍ये तो सहभागी झाला. विविध पर्यायी शेती पद्धती वापरण्यासाठी त्याने आपली एक एकर जमीन राखून ठेवली.

FFS ला देण्यात आलेल्‍या जमिनीच्‍या तुकड्याची आधीचा पाऊस धरण्यासाठी उन्हाळ्यात नांगरणी करण्‍यात आली. त्यानंतर पेरणीपूर्वी जमीन तीनदा नांगरली. शेतीच्या बांधांची दुरुस्ती करण्यात आली आणि जमिनीतील ओलावा चांगला टिकवून ठेवण्यासाठी अंतर्बांध तयार करण्यात आले. बांधांवर जेट्रोफा आणि ग्लिरीसेडीयाची लागवड करण्यामागे दोन कारणे होती. एकाचा वापर बांधांच्या संरक्षणासाठी आणि दुसरे पिकाचे रुपांतर सेंद्रीय खतामध्ये करण्यासाठी अतिरिक्‍त वनस्पती जैवभार निर्माण करण्याकरीता वापरण्‍यात  येणार होते. माती समृद्ध करण्यासाठी शेतात मेंढ्या बसविण्यात आल्या.

एकपीक पद्धतीचा भेद करुन, अन्य पिकांचा समावेश जसे हरभरा, भेंडी आणि वाटाणा पकड पिके म्हणून मुख्य पिकात कापसाबरोबर करण्यात आला. कीड व्यवस्थापनाचे काम बियाण्‍याच्‍या उपचारापासूनच सुरु करण्यात आले. पेरणीपूर्वी बियाणांना ट्रायकोडर्मा आणि PSB लावण्यात आले. कडूनिंबाच्या पानाचा अर्क, ज्यामध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात, त्याची फवारणी 15-20 दिवसांच्या अंतराने करण्यात आली. रासायनिक फवारणी आता दोन वेळाच ठेवण्यात आली, ती देखील सप्टेंबरच्या महिन्यात बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याच्या काळात.

पर्यावरणाला अनुकूल पर्यायी पद्धतींमुळे, बसवराजप्पा कापसाचे 8 क्विंटल उत्पादन घेऊ शकला, त्याच्या नेहमीच्या जमिनीच्या तुकड्याच्या तुलनेत 6.25 टक्क्यांनी ही वाढ झाली. तथापि, त्याचा सर्वात मोठा लाभ झाला तो उत्पादन खर्चातील मोठ्या कपातीमुळे, कारण रसायनांचा वापर कमी झाला होता. खतांचा वापर 60 टक्क्यांनी कमी झाला (तो सर्व प्रकारची 150 किलो खते वापरत असे तेथे त्याने केवळ 50 किलो संयुक्त खतांचा वापर केला) आणि कीटकनाशकांचा वापर 6 फवारण्यांवरुन 2 फवारण्यांवर आला. रसायनांच्या वापरात कपात झाल्यामुळे, लागवडीच्या खर्चात देखील लक्षणीय कपात झाली – खताचा खर्च 39 टक्क्यांनी, कीटकनाशकाचा खर्च 77 टक्क्यांनी कमी झाला; एकूण खर्चात 38 टक्के कपात झाली.

कापसाव्यतिरिक्त अन्य पिके त्याच्या कुटुंबासाठी अन्नाचा स्रोत बनली – भेंडी बरोबर एक क्विंटल हरभरा, आणि 30-35 किलो वाटाणा निघाला, जो घरगुती वापरासाठी कामी आला. अन्य लक्षणीय फायदे जे बसवराजप्पाला मिळाले ते म्हणजे कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत त्याच्या ज्ञानाची पातळी वाढली. FFS च्या प्रशिक्षणामुळे, तो आता लेडीबर्ड बीटल आणि क्रायसोपा यांसारख्या उपयुक्त कीटकांना ओळखू शकतो आणि त्यांची नांवे त्याला समजली.

कापसावरील खर्च आणि उत्पन्न ( रु / एकर) – 2005

अनुक्रमांक

कार्य

नियंत्रण प्लॉट

चाचणी प्लॉट

फरक (%)

1

उत्पादन खर्च

 

जमिनीची तयारी

600

600

 

खते व उर्वरके

1650

1000

- 39.4%

 

बियाणे आणि बियाणे उपचार

700

715

 

 

कीड व रोग व्यवस्थापन

2380

550

- 76.9%

 

मजुरी

1050

1050

 

 

एकूण

6380

3915

-38.6%

2

उत्पन्न (किलो)

750

800

6.25%

3

एकूण उत्पन्न (रु.)

16500

17600

6.66%

4

निव्वळ उत्पन्न

10120

13685

35.22%

कापूस ते ज्वारी यापासून मिळालेल्या शिकवणीच्या लाभांचा विस्तार

कापसाच्या लागवडीतून मिळालेल्या लाभांमुळे या समूहाच्या सदस्यांना ज्वारीसारख्या अन्न पिकांसाठी पर्यायी शेती पद्धती वापरुन पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. ज्वारी हे पीक जगण्यासाठी आवश्यक पीक म्हणून घेतले जात असे, घरामध्ये प्रामुख्याने त्याचा वापर होत असे. ज्वारी पिकाकडे जमिनीचा कस वाढविणे किंवा कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने फारसे लक्ष कधी ही देण्यात आलेले नव्हते. AMEF च्या मार्गदर्शनामुळे, बसवराजप्पाने ठराविक पर्यायी शेती पद्धतींचा अंगीकार केला. मातीतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी जमीन उताराला आडवी नांगरण्यात आली. अंदाजे 20 बैलगाड्या कुजलेले शेणखत टाकण्यात आले. ज्वारीच्‍या पिकाला जनावरांपासून वाचविण्यासाठी हद्दीवर करडई लावण्यात आली आणि हरभरा आंतर-पीक म्हणून लावण्यात आला. ज्वारी आणि हरभ-याच्या बियाण्‍यांना पेरणीपूर्वी PSB लावण्यात आले. ज्वारीच्या बियाण्‍याचे प्रमाण नेहमीच्या 3 किलो ऐवजी 2 किलो असे कमी करण्यात आले. शक्य तितके अंतर ठेवल्याने, बसवराजप्पाला दिसून आले की, बियाण्‍याचे प्रमाण कमी ठेवल्याने रोपट्यांची संख्या चांगली राखण्यात मदत झाली. त्यामुळे रोपट्यांची वाढ जोमाने झाली आणि कणसांचा आकार ही मोठा झाला. रोपाचा दांडा आणि पानांचा आकार नियंत्रण प्लॉटमधील रोपट्यांच्या आकाराच्या दुप्पट होता. रोप संरक्षण उपाय म्हणून कडूनिंबाचा अर्क तुडतुड्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी दोनदा फवारण्यात आला. पर्यायी पद्धतींचा अवलंब केल्यामुळे, लागवडीचा खर्च वाढला, याचे कारण प्रामुख्यानं जमिनीची अतिरीक्त नांगरणी आणि शेणखताचा वापर होय. तथापि, बसवराजप्पानं सेंद्रीय खत आपल्याच शेतावर निर्माण केल्यामुळे, हा खर्च कालांतराने कमी होईल अशी अपेक्षा आहे. उत्पादनाचा खर्च उच्च असला तरी, बसवराजप्पाला उच्च निव्वळ उत्पन्न घेणे शक्य झाले. त्यानं 9 क्विंटल ज्वारीचे उत्पादन घेतले, हे त्याला याआधी मिळणा-या उत्पादनाच्या दुप्पट होते. चा-याचे उत्पादन देखील दुप्पट झाले, आधी 2 टन दर एकर चारा मिळायचा तो 4 टन दर एकर मिळाला. त्याशिवाय, त्याला 60 किलो हरभरा आणि 60 किलो करडई मिळाली, ज्यातून 9 किलो तेल निघाले.

ज्वारीमधील खर्च आणि उत्पन्न (रु. /एकर) – 2005

अनुक्रमांक

कार्य

नियंत्रित प्लॉट

चाचणी प्लॉट

फरक (%)

1

नांगरणी

400

2000

400%

2

शेणखत (एफवायएम)

-

900

3

बियाणे आणि बियाणे उपचार

94

65

-30%

4

मजुरी

880

880

 

5

उत्पादन खर्च

1374

3845

179%

6

उत्पन्न-किलो

400

2900

125%

7

एकूण उत्पन्न

2400

7410

208%

8

निव्वळ उत्पन्न

1026

3565

247%

स्रोतः AME प्रतिष्ठान

3.05084745763
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2018/01/22 17:28:59.752412 GMT+0530

T24 2018/01/22 17:28:59.758788 GMT+0530
Back to top

T12018/01/22 17:28:58.962987 GMT+0530

T612018/01/22 17:28:58.981342 GMT+0530

T622018/01/22 17:28:59.098526 GMT+0530

T632018/01/22 17:28:59.099311 GMT+0530