Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:01:0.400239 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / कृषी पर्यटनाचा 'रानवारा'
शेअर करा

T3 2019/10/14 07:01:0.405894 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:01:0.436832 GMT+0530

कृषी पर्यटनाचा 'रानवारा'

धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातून काही प्रमाणात उसंत मिळन्यासाठी खासकरून शहरीं लोक पर्यटनाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.

धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातून काही प्रमाणात उसंत मिळन्यासाठी खासकरून शहरीं लोक पर्यटनाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे अलीकडे ग्रामीण भागातील कृषि पर्यटनालाही सुगीचे  दिवस  आले आहेत. ही संधी ओळखून नगर जिल्ह्यातील डॉ. देशमुख ट्राम्पत्याने बावीस  एकर खड्काळ जमिनीवर कृषि पर्यटन केंद्र उभारून नंदनवन फुलविले आहे. पुणे-नाशिक महामार्गावर  असलेले रानवारा है कृषि पर्यटन केंद्र आता पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

संगमनेर (जि. अहमदनगर) तालुक्यातील जवळं बाळेश्वर येथील अनिल व शुभदा देशमुख हे डॉक्टर दांपत्य गेली वीस ते पंचवीस वर्षापासून  रुग्णांची  सेवा करीत आहेत. ग्रंथील अनिल व शुभद्रा ट्रेशपुछ हैं डॉक्टर दांपत्य गल वीम र्त पंचवींस वर्षांपासून रुग्णांची संवा करीत आईत. डॉ. अनिल हे  शल्यविशारद तर डॉ. शुभदा स्त्रीरोगतज्ञ आहेत. परंतु डॉ.देशमुख हे शेतकरी कुटुंबात जन्मले असल्याने व निसर्गाची तशीच गिर्यारोहणाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती डॉ. देशमुख यांच्याकडे वडीलोपर्जीत बावीस एकर खडकाळ, माळरान जमीन होती. त्यामध्ये शेती करणे खूप अडचणीचे आणि खर्चाचे होते. या ठिकाणी पिके घेतलेली असती तरी त्यातून हाती फार उत्पन्न लागण्याची शक्यता नव्हती.

पर्यटन केंद्राचा स्वप्न साकार

सन २००५ मध्ये डॉ.देशमुख गोवा   येथे भारतीय   कृषि संशोधन परिषद (आय.सी.ए.आर.) व 'मॅनेज  यांच्यावतीने  अॅग्रो टुरिझम  या विषयावर पाच दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांच्या कृषि पर्यटन या विषयाला चालना मिळाली. डॉ. देशमुख  यांनी वीस ते पंचवीस वर्ष पडीक असलेल्या खडकाळ डोंगर दरयानमध्ये प्रयत्नपूर्वक व कठोर परिश्रमाने 'रानवारा 'उभा करण्याचे ठरवले . सुरुवातीस गीयारोहण व नंतर लोकग्रहास्तव इतर पर्यटकाना सुखशांती ,मनःशांती ,निसर्ग पर्यटन व कृषि पर्यटन अनुभवास मिळावे म्हणून सन २००६ पासून त्यांनी कृषि व निसर्ग पर्यटन हा शेतीपूरक व्यवसाय सुरू कैला. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी व्यवसाय सुरु केला . या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी  आपल्या घरी  आलेल्या शहरी पाहुण्यांना आपली  शेती, संस्कृती, साधी राहणी निर्मळ विचारसरणी आणि आदरातिथ्य या गोष्टींद्वारे कृषी पर्यट्नातून आनंद देऊन त्या मोबदल्यात अर्थाजनही  होऊ लागले.

उजाड़ डोंगर झाला हिरवागार

डॉ. देशमुख यांनी पहिल्यांदा उजाड , खडकाळ डोंगर हा हिरव्यागार झाडांनी  झाकोळून  स्क्न प्रत्यक्षत आणण्यासाठी डॉ. अनिल, डॉ. शुभदा, आणि मातोश्री सुलोचना देशमुख हे सर्व करीत असताना त्यांना अनेक मान्यवरांच्या सुचनेपोटी  निसर्गप्रेमींच्या निवासाची व्यवस्था करावी लागली. त्या अनुशंघाने सन २००३ पासूनच आराखड्यानुसार निवासाच्या ठिकाणची आजूबाजूला दाट सावलीच्या झाडांची लागवड केली . या पर्यटन केंद्रासाठी करण्यात आलेल्या बांधकामासाठी साहित्य तेथेवर नेणेही कठीण होते. दीड किलोमीटर पायी चालत डोक्यावर सर्व बांधकाम साहित्य वाहून न्यावे लागले. क्वचित प्रसंगी धाडसाने व इतर शेतकर्यांना विनवण्या करून ट्रॅक्टरसारख्या वाहनाने सामानांची वाहतूक केली आणि ऑगस्ट २००६ मध्ये रानवारा कृषी व निसर्ग पर्यटन केंद्र पर्यटकांच्या स्वगातासाठी सज्ज झाले.

गिर्यारोहनासाठी जमीन खरेदी

गिर्यारोहनासाठी वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या निसर्ग शिबिराच्या दृष्टीकोनातून डॉ. देशमुख यांनी २००२ मध्ये नवीन जमीन खरेदी केली.मुळातच इंग्रजीतील 'यु' आकाराची जमीन , जमिनीपर्यंत पोहोचवण्यासाठी दीड किलोमीटर पदभ्रमण करावे लागते. पूर्वेकडून उथळ दरीत प्रवेश केला कि, मधला छोटासा सपाट भाग ज्यामध्ये त्यांची छोटी-छोटी भातखाचरे आहेत. त्याच्या पश्चिमेस मध्यम उंचीची टेकडी असून त्यास ब्यू-ज्ये 'या पक्षाचे नाव दिलेले आहे. टेकडीच्या माथ्यावर मोठे पठार व त्याच्या पश्चिमेस दरी , उत्तरेस जेथे जमीन संपते तेथे पुन्हा अडीचशे फुट खोल  दरी आहे .त्यामुळे हे गिर्यारोहन प्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.

पर्यटन केंद्राची वैशिष्ट्ये

रानवारा कृषी व निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये ' वॉटर शेड ' प्रकल्प आहे. पाणी साठवण्यासाठी तसेच बोटिंग साठी मोठा तलाव आहे. येथे सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते . पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांसाठी वॉटर फॉल' ' स्विमिंग ' , बोटिंग ' साठी सुविधा दिल्या जातात.

पुणे - नाशिक महाम्र्ग हा सतत वर्दळीचा महामार्ग आहे . या रस्त्यावर चांगल्या निसर्ग पर्यटन केंद्राची कमतरता होती. रानवारा निसर्ग पर्यटन केंद्राची कमतरता होती . रानवारा निसर्ग पर्यटन केंद्रामुळे हि कमतरता भरून निघाली आहे. या ठिकाणी एकदा भेट देऊन गेलेल्या पर्यटकांच्या मार्फतच या केंद्राचा तोंडी प्रचार-प्रसार केला जातो. त्यामुळे पर्यटकांचा दरवर्षी वाढता ओघ आहे.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

3.02173913043
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:01:1.075636 GMT+0530

T24 2019/10/14 07:01:1.082065 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:01:0.213957 GMT+0530

T612019/10/14 07:01:0.231208 GMT+0530

T622019/10/14 07:01:0.389370 GMT+0530

T632019/10/14 07:01:0.390339 GMT+0530