Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:59:55.483885 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / कृषी पर्यावरणीय दृश्य
शेअर करा

T3 2019/10/14 06:59:55.489748 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:59:55.520611 GMT+0530

कृषी पर्यावरणीय दृश्य

रासायनिक पद्धतीवर भर देऊन हायब्रीड भात पिकांचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना अनेक पायाभूत व तांत्रिक समस्या भेडसावतात.

रासायनिक पद्धतीवर भर देऊन हायब्रीड भात पिकांचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना अनेक पायाभूत व तांत्रिक समस्या भेडसावतात. या शेतक-यांनी जर तथाकथित सर्व मान्य सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे ठरवले किंवा शाश्वततेसाठी स्थानिक/ पारंपारिक वाणांला प्रोत्साहन देण्याचे ठरवले तरी या समस्या आड येतातच. विशेषतः सेंद्रिय शेतीबाबातचे ज्ञान व तांत्रिक बाबी सहज मिळवणे आणि ते जसे च्या तसे प्रत्यक्षात आणणे हे तसे खूप अब्घाद आहे. परंतु कमी खर्चाने ,स्थानिक पातळीवर विकसित केलेले एखादे मॉडेल त्यांच्याच भाषेत व पद्धतीने प्रसारित केले तर तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

जगभरात प्रचलित असलेले प्रमाणित सेंद्रिय शेतीचे मॉडेल अमलात आणणे हे विकसनशील दक्षिणेकडील देशातील लहान शेतक-यांसाठी म्हणावे तेवढे सहज व सोपे नाही. त्या मध्ये अनेक अडचणी त आव्हाने आहेत. वर वर  पाहता सुधारित (रासायनिक) शेतीमुळे निर्माण झालेल्या अनेक समस्यां- जसे मातीची सुपीकता कमी होणे, जमिनीखालचा पाणी साठा समाप्त होणे, पिकांतर विविध किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होणे,घटक कीटक नाशकांचा अंश पिकांमध्ये उतरणे आदि . यावर सेंद्रिय शेती  प्रणाली मध्ये चांगली उत्तरे आहेत असे मानले जाते. परंतु रासायनिक शेती पद्धती अगदी उत्तमपणे करण्यामध्ये देखील ब-याच अडचणी आहेत हे सिद्ध झाले आहे. उदाहरणार्थ वीस्तार सेवांची कमतरता, तांत्रिक प्रशिक्षण साहित्याची वानवा  तसेच विविध प्रकारच्या लागतीसाठी लागणा-या पैशाची कमी ई. त्याच प्रकारच्या अडचणी सेंद्रिय शेती प्रसारित करण्यामध्ये येताना दिसतात. परिणामी विकसनशील देशामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रसार हा अत्यंत धिम्या गतीने होताना दिसतो. आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती चळवळ यांच्या आकडेवारी नुसार भारतात सुमारे 150790 हेक्टर शेतीतर सध्या सेंद्रिय शेती होते असे समजते. हे प्रमाण भारतातील एकदर पिकाखालील जमिनीच्या केवळ 0.1% एवढेच आहे. त्यातूनही भारतात पिकणा-या या सेंद्रिय पिकामध्ये निर्यात  भात (तांदूळ) या पिकाला बाजारात खूप मागणी आहे. परंतु त्याच्या उत्पादन वाढीसाठी धोरणात्मक नियोजनाची गरज आहे.

रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळण्यामध्ये भारत त तत्सम विकसनशील देशातील शेतक-यासमोर असलेल्या अडचणी नीटपणे मांडण्यासाठी या ठिकाणी पश्चिम बंगालमधील एक दाखला आपण पाहू या. सुंदरबनच्या किनारपट्टीवर खारपण भागात तग धरून वाढणाच्या स्थानिक भाताच्या वाणाची सेंद्रिय पद्धतीने लागवड  करून रासायनिक शेतीला एक शाश्वत पर्याय  म्हणून हा प्रयोग करण्यात येत आहे. या अभ्यासासाठी पश्चिम बंगालच्या दक्षिण भागातील 24 परगणा जिल्ह्यातील गोसाबा सातजेलीया गातात 2010 ते 2012 या दरम्यान क्षेत्र कार्य केले गेले. यामध्ये वैयक्तिक शेतकरी तसेच शेतकरी गटांसोबत चर्चा केल्या. नाबार्ड मार्फत आर्थिक सहयोग होत असलेली शेतकरी मंडळे, स्थानिक, तालुका व जिल्हा पातळीवरील शासकीय कृषी अधिकारी, आत्मा नावाच्या प्रकल्पातील अधिकारी ई. सर्वांसोबत चर्चा केल्या. त्याच प्रमाणे, राज्य सरकारच्या व कृषी विद्यापिठाच्या संशोधकाशी सल्लामसलत केली. आणि प्रत्यक्ष ग्रामीण विकासाचे कार्य करणा-या संस्थांचे कार्यकर्ते व लाभार्थी शेतकरी यांच्या सोबत लक्ष गट चर्चा व सहभागी विश्लेषण पद्धतीने सर्व माहिती जमविण्याचा प्रयत्न केला

पुढाकार

सातजेलीया या गावाची लोकसंख्या प्रती चौरस मीटर 3034 इतकी आहे. साधारणताः जमीनधारकांपैकी 75% कुटुंबाकडे 1 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. पिका खाली असलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे 60 टक्के जमीन सिंचनाखाली आहे आणि जवळ जवळ सर्वच जमिनी मध्ये वर्षाकाठी एकच पीक घेतले जाते.  2011  व 2012 मध्ये शासनातर्फे उन्हाळी भातपिक घेण्यासाठी येथील लोकांना पहिल्यांदाच उद्युत केले. त्यासाठी बियाणे, खते त कीटकनाशके इ. चा पुरवठा सुद्धा केला. बीज गाव कार्यक्रमांतर्गत स्थानिक भाताच्या बियाणाला जास्त प्रोत्साहित केले. खार जमिनीमध्ये तग धरून वाढू शकतात. अशा 7 स्थानिक ताणाची खतासारख्या जैविक लागतीचा वापर केला. चिनसुराह राज्य भात संशोधन संस्था यांचे कडून फाऊंडेशन बियाणे उपलब्ध करण्यात आले. नियंत्रित शास्त्रीय पद्धतीने पिकाची वाढ व प्रती एकरी अपेक्षित उत्पादन या बाबींचे  बारीक निरीक्षण केले गेले. सर्व नोंदी नीट पणे ठेवल्या गेल्या आणि त्याच परिसरातील दोन हायब्रीड वाणाच्या उत्पादन व वाढीशी तुलना केली गेली. विकसनशील देशांच्या परिस्थितीमध्ये जागतिक पातळीवर मान्यता पावलेल्या अति खर्चिक, विशिष्ट आणि भरपूर ज्ञानावर आधारलेल्या तंत्राचा वापर अशा सेंद्रिय शेती पद्धती मध्ये लोकांना खरे पर्याय देण्याची क्षमता नाही

परिणाम

पुढील तक्त्यावरून असे आढळले की हायब्रीड वाणाच्या तुलनेत स्थानिक बियाणे कमी पाण्यावर वाढणारी आणि खार जमिनीत (सामान्य खारपण पातळी 8.6 चांगला टिकाव धरून वाढणारी आहेत. जमिनाडू आणि गोविन्दोभोग या स्थानिक प्रजाती उत्पादनाच्या बाबतीत हायब्रीड जातीशी अगदी बरोबरी करतात. हायब्रीड जातीच्या भाताचे उत्पादन अगदी सुरुवातीला, पहिल्या 7-8 वर्षीपर्यंत थोडेसे वाढून होतेच पण या अभ्यासा दरम्यान शेतक-यांनी कबूल केले की अलीकडे सुमारे 35% ते 70% टक्के हायब्रीड भाताचे उत्पादन घसरले. युरिया फॉस्फेट सारख्या खतांचा

भरपूर वापर केल्याने जमिनीत झिंक व लोहाची पातळी अत्यंत कमी झाल्याचे स्पष्ट्र होत आहे. या खेरीज शेतक-यांना कीड नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो विशेषतः भाज्यांची पिके घेताना , अनेक ठिकाणी हायब्रीड भाताच्या लागवडीमुळे येणा-या वाढत्या खर्चामुळे व किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे कठीण झाल्यामुळे वांग्याची लागवड झपाट्याने कमी होताना दिसते. वास्तविक हे एक नगदी पीक म्हणून पहिले जाते.

टेबल 1. सुंदरबन येथील हायब्रीड व स्थानिक प्रजातीच्या भात पिकाच्या

ताढीची व उत्पादनाची तुलना दाखविणारा तक्ता

प्रजातीचे नाव

पिक तयार उत्पादकांचा

होण्याचा कालावधी

(दिवस )

उत्पादन

(किलो / एकर )

सरासरी संख्या
जमाइनाडू 107 2000 24.7 15
नोनोबोकरा 115 425 6.6 10
हमिलटन 107 1670 22.8 12
माटला 110 1830 37.2 18
तालसारी 115 675 14.2 8
गोविन्दोभोग 100 2400 25.5 22
गेटू 110 1189 18.8 18
हायब्रीड -१ 95 146 5.8 10
हायब्रीड - २ 100 2350 18.4 15

हा सतत निरीक्षणाखाली असलेला प्रयोग आपल्याला हेच सांगतो की, रासायनिक खते व कीटकनाशकांचा उपयोग करून वाढतलेल्या हायब्रीड भात पिकाच्या तुलनेत सेंद्रिय पद्धतीने घेतलेली निवडक स्थानिक प्रजातीचे भात पिके देखील उत्पादनाच्या बाबतीत बरोबरी  करू शकतात.

क्षेत्राकडून शेती लागतीसाठी निर्माण केलेल्या वस्तू बाबत शेतक-यांचे योग्य त पुरेसे शिक्षण करण्यामध्ये असलेली प्रचंड दरी लक्षात घेता हे मान्य करावे लागते कि रासायनिक शेती पासून सेंद्रिय शेती कडे वळण्याच्या प्रक्रियेत असलेल्या शेतक-यांना सेंद्रिय शेती बाबतचे ज्ञान व माहिती देखील अशीच अपुरी मिळेल. उदाहरणार्थ गेल्या दशकामध्ये रासायनिक कीटकनाशकावर अतलंबून असलेल्या शेतक-यांना आपल्या पिकांवर पडणा-या किडी बाबत व  बदलत्या हवामानाबाबत अत्यंत प्रारंभिक/ जुजबी ज्ञान आहे. त्यातून मित्र किडी त घातक किडीबाबतही कमी ज्ञान आहे . एक्त्मिक कीड नियंत्रण संदर्भात काम करणाऱ्या अनेक  संस्थांकडेही मित्र किडी बाबत त घातक किडी बाबत शेतक-यांना ज्ञान देण्यासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नाही. शासनामार्फत चालवलेल्या एकात्मिक किंड नियंत्रण कार्यक्रमातील अधिकारयांनी देखील हे मान्य केले की शेतीशाळाच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण करताना त्यांना ही अशा स्थानिक भाषेतील साहित्याची वानवा  जाणवते.

अशा प्रकारे शासकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थाना सुद्धा सेंद्रिय/ शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी स्थानिक परिस्थितीमध्ये उपयुक्त होईल असे आवश्यक ज्ञान, माहिती, साहित्य मिळवण्यास कठीण जात आहे. म्हणून उपयुक्त जीवाणू पुरवठा करण्याची यंत्रणा अस्तित्वात नसणे, जैविक खतांची मात्रा किती वा केव्हा  या बाबत  माहितीची उणीव  आणि जैविक किटकनाशकांची उपलब्धता नसणे हे सेंद्रिय, शाश्वत शेती पद्धती मधील मोठे अडसर आहे..

याही पेक्षा पुढे जाऊन अशी परिस्थिती आहे की नवीन तयार होणारे सिंथेटिक रासायनिक कीटकनाशक या शेतक-यांना सहज मिळणे दुरापास्त आहे. तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ठ असणारी , सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारी व प्रगत राष्ट्रात वापरली जाणारी उत्पादने देखील या शेतक-यांपासून कोसो दूर आहेत. उदाहरणार्थ कोलकत्ता येथील सरकारी एकात्मिक कीड नियंत्रण केंद्रामार्फत घेतलेल्या शेती शाळा प्रशिक्षणात फेरामोन सापळ्याबद्दल, तो कसा काम करतो व किडींची संख्या वाढू देत नाही याबद्दल माहिती दिली गेली. परंतु हि 'नैसर्गिक' कीटकनाशके कित्येक पटीने महाग असतात.बेसिलिस थिरेन्जीयासीसयुक्त एक लिटर जैविक कीटकनाशकाची किमत १००० रुपयापेक्षा जास्त असते. याशिवाय अशा कीटक नाशकाची गुणवत्ता विशेषतः उष्ण प्रदेशात लवकर संपते  ग्रामीण परिसरात त्याचे वाटप व वाहतूक करेपर्यंत त्यातील परिणामकारक करता पूर्ण संपून जाते. याशिवाय भारतातील जैविक खाते व जैविक कीटक नाशके बनविनाऱ्या कंपन्यामध्ये गुणवत्ता नियंत्रणाची खास व्यवस्था नाही, ज्याच्यामुळे या उत्पादनाची परिणामकारकता खात्रीची नसते.तसेच पश्चिम बंगाल मध्ये सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थाची फी सुधा जास्त आहे. सध्याच्या नियमानुसार  सेंद्रिय प्रमाणीकरणाचा कालावधी किमान तीन वर्षे ठरला आहे. लहान शेतक-यांसाठी तपासणी त प्रमाणीकरणाची एका दिवसाची फी, प्रवास खर्च व इतर खर्च सोडून 5000 रुपये एवढी आहे. हा सर्व खर्च आणि सुरुवातीला शेतक-यांचे गट बनविणे, प्रशिक्षण देणे इ. तर येणारा खर्च पाहिल्यास सेंद्रिय शेती करणे कोणत्याही अंगाने लहान शेतक-यास परवडत नाही.

पर्यावरणीय शेती पद्धतीकडे

काही स्थानिक शेतकरी जे उत्तम व  यशस्वी  सेंद्रिय शेती करतात ते वास्तविक खरे प्रगतशील किंवा प्रयोगशील शेतकरी आहेत. ते या पैकी  कोणतीही बाहेरची लागत लावत नाहीत. याउलट ते आपल्या लहान शेती धोरणाचेच भांडवल करतात आणि बहु आयामी पद्धतीने शेती करतात. गाईचे शेन , गोमुत्र , घरच्या घरी तयार केलेले नीमपत्याचे अर्क , खत इत्यादिचा तापर सतत प्रयोग म्हणून करतात. स्थानिक स्वयंसेवी  संस्थाना अशा प्रयोगातून मिळणाच्या शिकवणीतून सेंद्रिय शेतीपद्धतीची बांधणी करणे सोपे जाते. याद्वारे टप्प्या टप्प्याने म्हणजेच प्रथम रासायनिक कीड नाशकाचा तापर कमी करणे, गाईचे शेण, गोमुत्र, पिकांचा पालापाचोळा इत्यादीचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवणे त सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून हळूहळू संपूर्ण अरासायनिक पद्धतीने पीक घेणे हे शक्य होते. देशी बियाणांचा झालेला -हास, नाहीसे झालेले पारंपारिक शेती पद्धतीबाबतचे ज्ञान या पाश्र्वभूमीवर स्थानिक पातळीतर केलेल्या प्रयोगातून व यशस्वी  तंत्राचा वापर करून हळूहळू सेंद्रिय शेती अमलात आणता येईल असा स्वयंसेवी संस्थांचा विश्वास आहे. या धोरणाचे विशेषतः उन्हाळी भात पिकामध्ये कीटक नाशकांचा वापर कमी होतो, घटणा-या उत्पादन प्रमाणावर मात करता येते, तुलनेने उत्पन्न वाढ शक्य होते, शिवाय सुरक्षितता वाढते. हे परिणाम इतर ठिकाणच्या संशोधनानुसार देखील सिद्ध झाले आहे. याचा वापर करून, बाहेरील लागत न लावता पर्यावरनीय  शेती ही फायद्याची आहे. व या मध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे.

या पद्धतीमुळे स्थानिक भात बियाणाचे संवर्धन करणे की ज्याच्यावर बदलत्या हवामानाचा काही परिणाम होत नाही हे शक्य आहे. परिणामी स्थानिक लोकांच्या अन्न सुरक्षेची खात्री निर्माण होते. आणि एका बाजूने बदलत्या हवामानाला सामावून घेणे व त्याची तीव्रता कमी करण्याचे काम देखील या सुंदरबन च्या प्रयोगामधून न कळत होते हे समजून घेणे महत्वाचे आहे.

कृषिविस्तारच्या भूमिकाची पोकळी स्थानिक स्वयंसेवी संस्था वेगळ्या प्रकारे भरून काढतात. जसे की, शेतक-यांचे गट करून वारंवार त्यांच्या बैठका घेणे, एकमेकां कडून शिकणे, शेती शाळामधून अनुभत एकमेकाला देणे त हळूहळू की पद्धत समृद्ध करणे आणि त्यांच्या मधीलच काही स्वयंसेवक तयार करणे कि जे इतर शेतक-यांपर्यंत ही पद्धत पोहोचवतील. या साठी शेतीशाळा हि संकल्पना खूप उपयुक्त ठरली आहे. शेती शाळेच्या माध्यमातूनच संस्थेने शेतक-यांना बियाणे निवडीची साधी तंत्रे शिकवली,मातीमध्ये सूक्ष्मजीवाणू मिसळणे , रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन रोपांमधील अंतर वाढवणे, आणि स्थानिक व नैसर्गिक साधनांचा कीड नियंत्रणासाठी उपयोग करणे अशा कित्येक प्रणाली यातून शिकतात शिकवता आल्या.

 

स्रोत - लीजा इंडिया

3.02631578947
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:59:56.169985 GMT+0530

T24 2019/10/14 06:59:56.176320 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:59:55.249283 GMT+0530

T612019/10/14 06:59:55.288821 GMT+0530

T622019/10/14 06:59:55.473004 GMT+0530

T632019/10/14 06:59:55.473995 GMT+0530