Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/04/22 13:48:52.906248 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / कोरडवाहू शेतीत कापूस
शेअर करा

T3 2018/04/22 13:48:52.913502 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2018/04/22 13:48:52.949180 GMT+0530

कोरडवाहू शेतीत कापूस

रायचूर जिल्ह्यातील गधर गावातील प्रताप रेड्डी या 3५ वर्षीय शेतकर्याने पर्यायी शेती पद्धतीचा वापर करून कशाप्रकारे कोरडवाहू शेतीत किफायतशीर कापसाचे उत्पन्न घेतले याची माहिती दिली आहे.

रायचूर तालुक्यात ४५० घरं असलेल्या गधर या गांवात कापूस हे मुख्य नगदी पिक आहे. या गांवातील बहुतांश शेतकरी त्यांच्या जगण्यासाठी कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत, तर काही शेतक-यांकडे विहीरींच्या पाण्याची सोय आहे. एक पीक पद्धती केवळ याच गांवात नव्हे तर या संपूर्ण प्रदेशातच आहे. काही वर्ष पूर्वीपर्यंत चांगली किंमत येणारं कापूस, हे पीक घेणं हळूहळू कमी फायद्याचं झालं आहे कारण त्यासाठी खरेदी करावी लागणारी साधनसामुग्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी प्रामुख्यानं या साधनांची विक्री करणा-यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचा वापर करतात. तसंच, शेतकरी थेट शेतात पेरण्यासाठी विक्रेत्यांकडून सुटं बियाणं खरेदी करतात. आजवरच्या वर्षांमध्ये, कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे, जमिनींचा पोत घसरला आहे आणि उत्पादन घटू लागले आहे.

बदलाच्या दिशेने

या प्रदेशातील शेतीवर अवलंबून राहण्याशी संबंधित समस्यांची दखल घेऊन, एएमई (AME ) प्रतिष्ठानच्या रायचूर क्षेत्र एककानं, या गांवाची निवड केली आणि बाहेरील साधनसामुग्री कमी करुन, पर्यायी शेती पद्धतींचा स्विकार करण्याद्वारे टिकाऊ पीक उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांना मदत केली.

शेतक-यांसोबत केलेल्या चर्चेतून असं दिसून आलं की कीड, विशेषतः शोष कीडे आणि बोंडअळी, यांच्यामुळे मुख्यतः कापसाच्या उत्पादनात घट होते. कीडीचं व्यवस्थापन करण्यासाठी, सरासरी, या पिकावर त्याच्या एकूण कालावधीत नऊ वेळा फवारणी केली जाते, त्यापैकी पाच फवारण्या हेलिओथिसचं नियंत्रण करण्यासाठी असतात, आणि बाकीच्या फवारण्या शोषकीड्यांच्या विरोधात असतात. सरासरी, कापसाचं उत्पादन ३.५ क्विंटल प्रति एकर आलं, जे की त्याच्या सामान्य ६ क्विंटल प्रति एकर क्षमतेपेक्षा खूपच कमी होतं. उत्पादनावर परिणाम करणारे अन्य घटक देखील होते, जसे बियाणाची निकृष्ट गुणवत्ता, उशीरा पेरणी होणे, माती आणि पाणी व्यवस्थापनाच्या अयोग्य पद्धती आणि सेंद्रीय खतांचा वापर.

शेतक-यांना त्यांच्या पिकांकडे एकेरी दृष्टिकोनाच्या ऐवजी विद्यमान पिक पर्यावरण व्यवस्थेच्या संदर्भातून पाहण्यासाठी, शेतकरी क्षेत्र शाळा (FFS), एक शोध शिक्षण प्रक्रिया, सर्वात योग्य मार्ग असल्याचं मानण्यात आलं. FFS २००५ च्या पीक लागवड हंगामात, जून ते डिसेंबर या काळात घेण्यात आली.

कापूस पिकाच्या बाबतीत AMEF नं सर्वसाधारणतः आणि FFS नं विशेषत्वानं केलेला हस्तक्षेप यांचं एक उदाहरण म्हणून, श्री प्रताप रेड्डी यांच्या कामगिरीचा वृत्तांत इथं देत आहोत. पर्यायी शेती पद्धती स्विकारण्यात आणि समूहासोबत तसंच त्या पलीकडे इतरांसोबत वाटून घेण्यासाठी एका वैयक्तिक शेतक-यानं केलेल्या प्रयत्नांचं ठळक दर्शन या उदाहरणात घडतं.

प्रताप रेड्डी, अंदाजे ३५ वर्षांचे आहेत, आणि त्यांचं औपचारिक शिक्षण दहावीपर्यंत झालेलं आहे. ते लिंगायत समाजाचे आहेत, विवाहीत आहेत आणि त्यांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्या मालकीची १६ एकर शेती आहे आणि कंत्राटी मजुरांच्या मदतीनं ते ही शेती बघतात. प्रताप रेड्डी गेल्या काही वर्षांपासून कापूस पिक घेत आहेत. त्यांच्यासाठी, कापसाची शेती करण्यात अनेक नियमित कार्यांचा समावेश असतो जसे बियाणे विक्रेत्याकडून थेट खरेदी केलेलं बियाणं पेरणं, पिकावर कीड दिसताच क्षणी कीटकनाशकांची फवारणी करणं, आणि नेहमीच्या प्रथेनुसार खत देणं. या समूहाचा एक सदस्य म्हणून, प्रताप रेड्डी कापूस FFS मधील एक कृतीशील सहभागी होते. FFS च्या विधींसाठी त्यांनी ०.७५ एकराचा एक प्लॉट वापरला. यापैकी ०.५० एकरात, लागवडीच्या पद्धती, FFS समूहातील निर्णयांच्या अनुसार लागवडीची पद्धत वापरण्यात आली तर ०.२५ एकरात, लागवड ही एक नियंत्रण म्हणून नेहमीच्या शेती पद्धतीनुसार करण्यात आली.  FFS चा एक भाग म्हणून, नेमून देण्यात आलेल्या प्रयोगांमधून, त्यांना कापसामधील पर्यायी शेती पद्धतींबाबत बरंच काही शिकायला मिळालं.

पर्यायी शेती पद्धतींचा स्विकार

हद्दीवरील पिक म्हणून हरभरा पेरण्यात आला, झेंडूचे बी पसरुन टाकण्यात आले आणि भेंडीचे बी शेतात १:१० या प्रमाणात पेरण्यात आले.  या सर्व बियाणांना पेरण्यापूर्वी जैविक घटकांचा उपचार देण्यात आला.

बियाणे संस्कार

बियाणे पेरण्यापूर्वी त्यांच्यावर फॉस्फोबॅक्टेरीया आणि अझोस्पिरीलम यांचा उपचार खालीलप्रमाणे करण्यात आलाः
७५० ग्रॅम कापूस बियाणासाठीः
  • २० ग्रॅम गूळ
  • ५० ग्रॅम फॉस्फो जिवाणू
  • ५० ग्रॅम अझोस्पिरीलम

बियाणे एका चादरीवर किंवा पोत्यावर पसरावे; बियाणावर गुळाचे सिरप ओतावे आणि जैवघटक चोळावेत.  त्यांना अर्धा तास सावलीत वाळू द्यावे आणि थेट पेरणी करावी.
(जैव-खतांची शिफारसकृत मात्रा प्रति एकर २०० ग्रॅम बियाणासाठी असली तरी, उपचार करताना, शेतक-यांना प्रति एक कापूस बियाणाला उपचार देण्यासाठी ५० ग्रॅम पुरेसे आहे असे वाटले).

कीड व्यवस्थापन

हरभरा, झेंडू आणि भेंडीसारखी पिंजरा पिके हेलीओथिस आणि ठिपकेदार बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी उगविण्यात आली. हेलीओथिसवरील एक अंडी परजीवी असलेल्या ट्रायकोग्रामासारख्या उपयुक्त कीटकांच्या भूमिकेबाबत त्यांना शिकायला मिळालं. त्यांना याची कल्पना नव्हती की असे देखील काही कीडे आहेत, जे त्यांच्या पिकासाठी उपयुक्त ठरतील. NPV, हा एक जैव घटक आणि एक रासायनिक कीटनाशक खबरदारीचा उपाय म्हणून एकदा फवारण्यात आले. यापूर्वी शेतात जेव्हा अळी किंवा एखादा कीटक नजरेस पडला की कीटनाशक फवारण्याची पद्धत होती. या नवीन उपायांमुळे कीटनाशकांच्या फवारण्या पहिल्या वर्षादरम्यान ९ वरुन ४ आणि दुस-या वर्षादरम्यान ४ वरुन १ अशा कमी करण्यात मदत झाली. कीटनाशकांचा वापर ७५ टक्क्यांनी कमी झाला जो यापूर्वी मोठा खर्च होत असे.

पोषक घटकांचे व्यवस्थापन

यापूर्वी, खतं आणि कीटनाशकांचा वापर करणं म्हणजे शेतक-यांच्या दरम्यान जणू स्पर्धाच असायची. एका शेतक-याने खताच्या १० पिशव्या वापरल्या तर त्याचा शेजारी १२ पिशव्या टाकीत असे. पहिल्या हंगामासाठी,प्रताप रेड्डींनी खताचा वापर कमी केला नाही, परंतु शेणखताचं प्रमाण २ टन /एकरवरुन ३ टन/एकर असं वाढवलं आणि गांडूळ खत टाकलं (२ क्विंटल/एकर). सद्यस्थितीत, ते खताला कुजखताचीही जोड देतात, जे स्वतःच्या शेतावरच तयार करण्याची पद्धत ते शिकले आहेत. कापूस पुन्हा किंमती होऊ लागला आहे.  रासायनिक शेतीऐवजी पर्यायी पद्धती, पर्यावरणाला अनुकूल पद्धतींचा स्विकार केल्यामुळे   कापसाच्या उत्पादनात स्थित्यंतराच्या पहिल्याच वर्षात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि निव्वळ उत्पन्नात ४४ टक्क्यांनी वाढ झाली. सेंद्रीय खत विकत आणल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली.  प्रताप रेड्डींनी सेंद्रीय खताचं उत्पादन आपल्या शेतावरच सुरु केलेलं असल्यामुळं, उत्पादन खर्चात आगामी वर्षांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

रुपये एकरामध्ये खर्च आणि उत्पन्न

अनुक्रम

घटक

शेतकरी प्लॉट

FFS प्लॉट

% फरक

भांडवली खर्च

1

बियाणे आणि बी उपचार

280

290

-

2

सेंद्रीय खते

1500

2650

76.6%

3

खते

555

555

-

4

कीटनाशके

1030

240

- 75.2%

5

जैविक घटक

-

304

एकूण

2365

4039

70.7%

मजुरी

2475

2250

- 9.0%

उत्पादन खर्च

5840

6289

7.6%

उत्पन्न (किलो)

500

600

20.0%

एकूण उत्पन्न

9800

12000

22.4%

निव्वळ उत्पन्न

3960

5711

44.2%

साकल्यपूर्ण शेती व्यवस्थेच्या दिशेने

AMEF सोबत सातत्यानं केलेली चर्चा आणि समूहाच्या अंतर्गत झालेल्या चर्चा, यांच्यामुळे प्रताप रेड्डी यांना नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन आणि त्यांच्या शेतातील टाकाऊ पदार्थांचा पुन्हा वापर करण्याबाबत खात्री पटली. LEISA शेतांना दिलेल्या त्यांच्या एका भेटी दरम्यान, रेड्डींची खात्री पटली की शेतावर अधिक सेंद्रीय खत निर्माण करण्यासाठी अतिरीक्त वनस्पती जैवभार महत्वाचा आहे. त्यानंतर, वनस्पती जैवभार निर्माण करण्यासाठी त्यांनी १०००० बहुउद्देशीय रोपं तयार केली. त्यांची लागवड त्यांनी शेतांच्या बांधांवर आणि तळ्याच्या कडेला केली. त्यांनी आंबा, चिंच आणि सपोतासारख्या काही फळवृक्षांची देखील लागवड केली आहे. वनस्पती जैवभाराचं महत्व पटल्यामुळं, रेड्डी यांनी सूर्यफुलाचे दांडे आणि अन्य पिकांचे उर्वरीत अवशेष जाळण्याची पद्धत बंद केली. त्याऐवजी, ते त्यांना मातीमध्ये मिसळतात.

प्रताप रेड्डी यांनी गांडूळखत निर्मिती आणि परसबाग यांच्यासारख्या ठराविक सहाय्यकारी उपक्रम देखील हाती घेतले आहेत. त्यांनी आपल्या घराजवळ वांगे, काकडी, टोमॅटो, भोपळा लावले आहेत आणि कापसाच्या शेतात भेंडी लावली आहे. आपल्या घराच्या वापरासाठी पुरेशा भाज्या उपलब्ध असल्याचं त्यांना वाटतं. पाणी साठवण्यासाठी त्यांनी १२ फूट खोलीचं शेततळं खोदलं आहे. त्या तळ्यातील पाण्याच्या उपलब्धतेवर भविष्यात, मासेपालन करण्याचा त्यांचा विचार आहे.

स्रोतः AME प्रतिष्ठान

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2018/04/22 13:48:53.566928 GMT+0530

T24 2018/04/22 13:48:53.574565 GMT+0530
Back to top

T12018/04/22 13:48:52.685648 GMT+0530

T612018/04/22 13:48:52.712637 GMT+0530

T622018/04/22 13:48:52.877410 GMT+0530

T632018/04/22 13:48:52.878430 GMT+0530