Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 18:32:20.663867 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / चार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न
शेअर करा

T3 2019/06/17 18:32:20.669515 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 18:32:20.701580 GMT+0530

चार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न

हिंगोली जिल्ह्यातील काही भागात इतर उत्पादनांबरोबरच केळीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

हिंगोली जिल्ह्यातील काही भागात इतर उत्पादनांबरोबरच केळीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याच परिसरातील डोंगरकडा येथील शेतकरी भुजंगराव अडकिणे यांनी चार एकरात साडेपाच हजार केळीच्या पिकांतून तब्बल 18 लाखांचे उत्पन्न मिळविले. अतिशय उत्तम दर्जाची, निर्यातक्षम केळी पिकविल्याबद्दल त्यांचा डोंगरकडा येथे झालेल्या केळी परिषदेत नुकताच सत्कार करण्यात आला.

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील प्रगतशील शेतकरी भुजंगराव अडकिणे यांच्याकडे 40 एकर जमीन आहे. ते पारंपरिक पिकांबरोबर ऊस, केळी, हळदीची पिके घेतात. यापुर्वी त्यांनी 15 ते 16 हजार केळी घेतल्या आहेत. मागच्या वर्षी पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांनी यावर्षी चार एकरात साडेपाच हजार केळी घेतल्या. त्यासाठी उपलब्ध पाण्याचा अतिशय काटकसरीने उपयोग केला. मागच्या वर्षी पाण्याचे आणि चाऱ्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या कंदांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग केला.

श्री.अडकिणे हे अनेक वर्षांपासून केळीची लागवड करतात. दरवर्षी त्यांच्या शेतात सुमारे 15 ते 16 हजार केळी असतात. मात्र मागच्या वर्षीची परिस्थिती वेगळी होती. राज्यात आणि विशेषत: मराठवाड्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्याबरोबरच शेतीसाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नव्हता. अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी चार एकरात साडेपाच हजार केळी घेतल्या व नियोजन करून त्याची योग्य निगा राखली, म्हणून चांगले उत्पादन मिळाले.

भुजंगराव अडकिणे यांचे बिकट परिस्थितीत मिळविलेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. याविषयी बोलताना, शेतकऱ्यांनी नेहमीच प्रयत्नशील असावे. एका पिकाचे उत्पन्न घटले तर दुसऱ्या पिकात ते निश्चितच मिळू शकते, मात्र त्यासाठी कठोर मेहनतीची जोड आवश्यक असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

लेखक -  जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

स्त्रोत - महान्युज

2.90243902439
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/17 18:32:21.689041 GMT+0530

T24 2019/06/17 18:32:21.695630 GMT+0530
Back to top

T12019/06/17 18:32:20.494754 GMT+0530

T612019/06/17 18:32:20.514127 GMT+0530

T622019/06/17 18:32:20.652906 GMT+0530

T632019/06/17 18:32:20.653946 GMT+0530