Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/18 11:23:7.861428 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / पिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे
शेअर करा

T3 2019/06/18 11:23:7.867155 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/18 11:23:7.897415 GMT+0530

पिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे

पारंपारिक शेतीच्या अनुभवातून नाविन्याची जोड देत सातत्याने नवे मार्ग शोधून कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे ब्रु. येथील शेतकरी रामराव जाधव या शेतकऱ्याने 20 एकरावर गट शेतीच्या माध्यमातून कांद्याचे बियाणे तयार केले आहे.

पारंपारिक शेतीच्या अनुभवातून नाविन्याची जोड देत सातत्याने नवे मार्ग शोधून कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे ब्रु. येथील शेतकरी रामराव जाधव या शेतकऱ्याने 20 एकरावर गट शेतीच्या माध्यमातून कांद्याचे बियाणे तयार केले आहे. पुना-फुरसुंगी जातीचे कांद्याचे हे बियाणे श्री.जाधव हे महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी देत आहेत.

श्री.जाधव हे शेतीमध्ये सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. 1992 पासून त्यांनी एक एकर, दोन एकर अशा क्षेत्रात शेतामध्ये पुना-फुरसुंगी जातीच्या काद्यांचे बियाणे तयार करत. या माध्यमातून उच्च प्रतिचे बियाणे तयार करुन ते शेतकऱ्यांना विकत होते. त्यांच्या बियाणांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी वाढल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करुन त्यांच्या माध्यमातून गट शेतीचा प्रयोग सुरु केला आहे. पिंपोडे सारख्या भागात सध्या 20 एकर क्षेत्रावर कांद्याचे बियाणे तयार करण्यात येत आहे.

हे बियाणे जुन्नर, कर्नाटकातील चित्रदूर्ग या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जाते. शेतऱ्यांने एकदा बियाणे खरेदी केल्यावर त्या भागातील अन्य शेतकरीही आमच्याकडून बियाणे खरेदी करतात, असे श्री.जाधव अभिामानाने सांगतात. शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे बियाणे तयार करुन विकण्याचा व्यवसाय जरी केला तरी त्यात शेतकऱ्याला चांगला फायदा होईल. बियाणे चांगले तयार केल्यास शेतकऱ्याला चांगला नफा मिळू शकतो. सर्वसाधारपणे एकरी साडेतीन ते चार क्विंटल बी निघते. तर काद्यांच्या लागवडीसाठी एकारी तीन किलो बी लागते. अशा गट शेतीच्या माध्यमातून सध्या वर्षाला 70 क्विंटल बी आम्ही विकतो. एकदा आमच्याकडून बी घेणारा शेतकरी दुसरीकडून कोठेही खरेदी करत नाही. तो आमच्याकडूनच घेतो. हा विश्वास आणि दर्जा 1992 पासून आम्ही टिकवून ठेवला आहे, अशी माहितीही श्री.जाधव यांनी यावेळी दिली.

नेहमीच्या पठडीतील शेती न करता सातत्याने संशोधन करुन नवे प्रयोग करण्यात रामराव जाधव हे पुढे असतात. शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून बियाणे उत्पादनासारखा नवा प्रयोग केल्यास शेकऱ्याला लाखो रुपये उत्पन्न मिळू शकते, त्यासाठी प्रामाणिकपणा हवा, असा संदेशही श्री.जाधव हे देत आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहिती आणि बियाणांसाठी रामराव जाधव, पिंपोडे ब्रु. ता.कोरेगाव भ्रमणध्वनी 9049439093 यावर संपर्क करावा.

लेखक - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

स्त्रोत - महान्युज

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/18 11:23:8.579934 GMT+0530

T24 2019/06/18 11:23:8.587044 GMT+0530
Back to top

T12019/06/18 11:23:7.666814 GMT+0530

T612019/06/18 11:23:7.686169 GMT+0530

T622019/06/18 11:23:7.850275 GMT+0530

T632019/06/18 11:23:7.851286 GMT+0530