Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 02:59:15.227227 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / प्रयोगातही शेतकऱ्यांचा समावेश
शेअर करा

T3 2019/06/17 02:59:15.232904 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 02:59:15.264043 GMT+0530

प्रयोगातही शेतकऱ्यांचा समावेश

अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठामध्ये शाश्वत स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी सातत्याने प्रयोग केले जातात.

आर्कान्सास विद्यापीठामध्ये राबवला जातोय कृषी माहिती विस्तारासाठी अनोखा कार्यक्रम


अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठामध्ये शाश्वत स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी सातत्याने प्रयोग केले जातात. या प्रयोगामध्येही परिसरातील शेतकऱ्यांचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते. प्रत्यक्ष प्रयोगामध्ये शेतकऱ्यांचा समावेश असल्याने, शेतकऱ्यांमध्ये नव्या पद्धतीचा अवलंब वाढत आहे.
आर्कान्सास प्रांतामध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामध्ये लागवडीसह काढणीपर्यंत विविध टप्प्यांवर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि पद्धतीमध्ये अधिक शाश्वत सुधारणा करण्याच्या हेतूने आर्कान्सास विद्यापीठामध्ये स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी विविध लागवड पद्धतींच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी अधिक उंचीचे टनेल, कमी उंचीचे टनेल आणि प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करून हंगाम अधिक काळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या पद्धतीमध्ये स्ट्रॉबेरीची लवकर लागवड करून अधिक व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आर्कान्सास विद्यापीठातील फळबाग व विस्तारतज्ज्ञ लिओनार्ड गिथिन्जी यांनी सांगितले. या प्रयोगातून उपलब्ध होत असलेली माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी आर्कान्सास विद्यापीठ तत्पर असून, अनेक वेळा प्रयोगामध्येही शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, कार्यशाळा यांचा समावेश केला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगातून शिकण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होते.

प्रयोगातून शिक्षण, शिक्षणातून शाश्वत उत्पादनाकडे ...


स्ट्रॉबेरी उत्पादन आणि काढणीपश्चात तंत्रज्ञान यांमधील विविध विषयांवर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर शाश्वत उत्पादनासाठी शेतकरी आणि फळबागकर्त्या उद्योजकांसाठी कार्यशाळा, प्रक्षेत्र भेटी यांचे आयोजन करण्यात आले होते.

  • सोलरायझेशन ः मातीतील सूत्रकृमी आणि तणाच्या नियंत्रणासाठी अति विषारी रसायनाचा वापर कमी करण्यासाठी प्लॅस्टिकच्या साह्याने व सौर ऊर्जेचा वापर करीत सोलरायझेशन प्रक्रिया करण्याविषयी विस्तार करण्यात येत आहे.
  • कीड व रोग नियंत्रण ः एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा उपयोग आणि मित्रकीटकांचा वापर याविषयी प्रशिक्षण घेतली जातात.
  • खते व पाणी यांचा कार्यक्षम वापर ः यामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी विविध जैविक पद्धती, पिकांचे अवशेष यांचा अत्यंत उपयोग होतो.
  • तुलनात्मक अभ्यास ः सध्या शेतकऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धती व अधिक कार्यक्षम शाश्वत पद्धती यांचा तुलनात्मक माहिती पोचविण्यासाठी प्रयत्न केला जातो.
  • या प्रकल्पासाठी वॉलमार्ट फाउंडेशनकडून अनुदान मिळाले होते.

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

2.97297297297
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/17 02:59:16.066010 GMT+0530

T24 2019/06/17 02:59:16.072814 GMT+0530
Back to top

T12019/06/17 02:59:15.062506 GMT+0530

T612019/06/17 02:59:15.080350 GMT+0530

T622019/06/17 02:59:15.216285 GMT+0530

T632019/06/17 02:59:15.217235 GMT+0530