Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 15:15:19.611486 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / प्लास्टिक बाटल्यांतून रोपवाटिका
शेअर करा

T3 2019/06/26 15:15:19.617198 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 15:15:19.648805 GMT+0530

प्लास्टिक बाटल्यांतून रोपवाटिका

२ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या वाया गेलेल्या बाटल्या आडव्या म्हणजे लांबीच्या दिशेत कापून रोपवाटिकेत भाताची रोपं करण्यासाठी वाफा म्हणून वापरल्या जातात.

प्लास्टिकच्या वाया गेलेल्या बाटल्यांमधून रोपवाटिकेची निर्मिती


१) २ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या वाया गेलेल्या बाटल्या आडव्या म्हणजे लांबीच्या दिशेत कापून रोपवाटिकेत भाताची रोपं करण्यासाठी वाफा म्हणून वापरल्या जातात.
२) ह्या अर्ध्या कापलेल्या बाटल्यांमध्ये गाळ, गांडूळखत आणि खाचरामधलं तूस ३:२:१ ह्या प्रमाणात भरलं जातं. अशा एका (म्हणजे अर्ध्या) बाटलीसाठी हे साहित्य सुमारे ३०० ग्रॅम लागतं.
३) अमृतपाणी किंवा बीजामृताची प्रक्रिया केलेले बियाणे ह्या बाटलीत बनवलेल्या वाफ्यात लावले जाते. अशा प्रत्येक वाफ्यात १० ग्रॅम बिया पेरल्या जातात.
४) दर दोन दिवसांने पाणी देऊन ह्या वाफ्यांमध्ये ओलावा कायम ठेवला जातो.
५) शेतामध्ये पुर्नपेरणी करण्यासाठी १० दिवसांत ही रोपटी पेरणी योग्य बनतात.

एक हेक्टर जमिनीवर पुर्नपेरणी करण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य लागेल

अर्ध्या कापलेल्या रिकाम्या बाटल्या   =      ६२५
बियाणं                        =      ६.३ किलो
गाळ                          =      ९३.८ किलो
गांडूळखत                      =      ६२.५ किलो
राख                          =       ३१ किलो
तयार होणार्‍या रोपट्यांची संख्या     =     २,००,०००    

मोठ्या शहरांच्या आसपास वसलेल्या खेड्यांमध्ये ही पद्धत उपयोगी आहे कारण तिथे जागा कमी आणि मजूरीचे दर जास्त असतात.
चित्र - बाटलीमध्ये वाढवलेली रोपे

स्रोत: लागवडीच्या सेंद्रीय पद्धती
फूड अ‍ॅँड अ‍ॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, नवी दिल्ली आणि
नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, गाझियाबाद
ह्यांचा तांत्रिक सहकार्यात्मक प्रकल्प

निर्मिती - महाराष्ट्र ऑर्गॅनिक फार्मिंग फेडरेशन (मॉफ), श्री. संजय पाटील, जव्हार तालुका, ठाणे

3.03947368421
प्रकाश नामदेव भरसट मु,शृंगारपाडा Feb 04, 2014 09:31 PM

1) शेतकी विषयक संघटना
शेतकी विषयक संघटना

भारतासारख्या कृषीप्रधान देशात येथील शेतकऱ्याला अजूनही आपल्या शेतीविषयक प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्याला पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव, मोबदला मिळेलच याची हमी निश्चितपणे आपल्याकडे देता येत नाही. त्यामुळेच शेतीविषयक संघटना या नेहमी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दिसून येतात.
शेतीविषयक संघटनेची उद्दिष्ट्ये
• शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळून देणे.
• कांदा, कापूस व ऊस या महत्त्वाच्या पिकांना हमी भाव मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणे.
• शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शेती-विषयक संघटना करताना दिसून येतात.
• शेतकऱ्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक स्थितीचा विकास व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्नशील राहणे.
• शेतीविषयक बी-बियाणे, खते, कीटक नाशके शेतकऱ्याला योग्य दरात मिळविण्यासाठी प्रयत्न करणे.
• नैसर्गिक आपत्तीच्यावेळी (पाऊस न पडल्यास) शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहासाठी शेतकऱ्याला रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरवठा करणे.
• शेतकऱ्यांच्या मालाला परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणे.
• शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजारपेठेपर्यंत योग्य पद्धतीने पोहचण्यासाठी दळण-वळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न करणे.
आज आपल्याकडे शेतीविषयक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या काही संघटना दिसून येतात. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षापासून ते आज शेतकरी स्वाभिमानी संघटनेपर्यंतचा प्रवास पहिला तर शेतकऱ्याला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी या संघटनांनी सातत्याने संघर्ष केलेला आहे व आजही या संघटना शेतकऱ्यांसाठी मोठया प्रमाणावर लढा देताना दिसून येतात. २०२० साली बलशाही भारत आपल्याला घडवायचा असेल तर शेतकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक स्थितीत परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांच्या मालाला हमी भाव मिळवून देणे ही काळाची गरज आहे.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 15:15:20.295859 GMT+0530

T24 2019/06/26 15:15:20.301854 GMT+0530
Back to top

T12019/06/26 15:15:19.439902 GMT+0530

T612019/06/26 15:15:19.461449 GMT+0530

T622019/06/26 15:15:19.600153 GMT+0530

T632019/06/26 15:15:19.601192 GMT+0530