Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/19 08:42:53.854286 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / तणांचे गुणधर्म नव्या सहनशील भातजाती निर्मितीमध्ये मोलाचे
शेअर करा

T3 2019/06/19 08:42:53.859870 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/19 08:42:53.889581 GMT+0530

तणांचे गुणधर्म नव्या सहनशील भातजाती निर्मितीमध्ये मोलाचे

जंगली भातवर्गीय तणांतील काही जनुकीय गुणधर्म अधिक सहनशील, ताकदवान आणि अधिक उत्पादनक्षम भातजाती विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे दिसून आले आहे.

सर्वसाधारणपणे पिकामध्ये येणारे तण हे उत्पादन कमी करत असल्याचे मानले जाते. मात्र जंगली भातवर्गीय तणांतील काही जनुकीय गुणधर्म अधिक सहनशील, ताकदवान आणि अधिक उत्पादनक्षम भातजाती विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे दिसून आले आहे. त्या संदर्भात अमेरिकी कृषी विभागातील वनस्पती शरीरशास्त्रज्ञ लेविस झिस्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष "फंक्‍शनल प्लॅंट बायोलॉजी'मध्ये प्रकाशित झाली आहेत.

भातामध्ये भातवर्गीय जंगली जाती उगवून येतात. त्यामुळे भात उत्पादनामध्ये मोठी घट येते. मात्र अनेक वेळा लागवडीच्या भातापेक्षा या तणांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे झाल्याचे दिसून येते.

तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असून, 2050 या वर्षामध्ये अनेक भात उत्पादक देशांमध्ये भाताचे उत्पादन घटण्याचा शक्‍यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी कृषी संशोधन सेवा विभागातील शास्त्रज्ञ लेविस झिस्का यांनी मेरीलॅंड येथील प्रक्षेत्रामध्ये भातांच्या विविध जातींवर तापमानातील बदल आणि कार्बन- डाय-ऑक्‍साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे होणारे परिणाम तपासले आहेत. त्यामध्ये काही भात जातींनी वाढत्या कर्बवायूंच्या प्रमाणाशी जुळवून घेण्यासाठी आवश्‍यक जनुकीय गुणधर्मांचा शोध घेण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी सध्या प्रचलित असलेल्या भात जातींवरील कर्बवायू आणि दिवस, रात्रीतील तापमानाच्या पातळीचा परीणाम तपासला.

निष्कर्ष

  • सर्वसाधारणपणे अधिक कर्बवायूमध्ये अधिक बायोमासची निर्मिती करतात. तसेच यामुळे वाढत्या तापमानाचा परिणामही कमी होतो.
  • या संशोधनामध्ये तण मानल्या जाणाऱ्या लाल भात जातींचा समावेश होता. ही जात भात शेतीमध्ये वाढत्या कर्बवायू पातळीमध्ये लागवडीच्या भात जातीपेक्षा वेगाने वाढते व अधिक बियांचे उत्पादन करत असल्याचे दिसून आले आहे.
  • दिवसाचे तापमान 84 अंश फॅरनहीट आणि रात्रीचे तापमान 70 अंश फॅरनहीट असताना लाल भात व प्रचलित रोंडो ही भात जाती अधिक कर्बवायूच्या स्थितीमध्ये अधिक उत्पादन देत असल्याचे दिसून आले. लाल भाताची वाढ अधिक होऊन बायोमास अधिक मिळते.
  • या गुणधर्माचा उपयोग भात उत्पादक देशामध्ये साधारणपणे 2050 पर्यंत असलेल्या तापमानामध्ये तग धरणे व अधिक उत्पादनासाठी होऊ शकतो.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.01470588235
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/19 08:42:54.111107 GMT+0530

T24 2019/06/19 08:42:54.117780 GMT+0530
Back to top

T12019/06/19 08:42:53.762128 GMT+0530

T612019/06/19 08:42:53.780736 GMT+0530

T622019/06/19 08:42:53.843388 GMT+0530

T632019/06/19 08:42:53.844379 GMT+0530