অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्रोकोली लागवड तंत्रज्ञान

ब्रोकोली ही परदेशी भाजी असून खाण्यास कुरकुरीत आणि चवदार आहे. ब्रोकलीच्या भाजींचा आकार फुलकोबी सारखाच असून फक्त गड्याचा रंग हिरवा असतो. मुख्य गड्याव्यतिरिक्त खोडावर असलेल्या पानांच्या बेचक्यातून लहान लहान ब्रोकोलीनें गड़ेड मुख्य गडडा काढल्यानंतर तयार होतात. मुख्यत्वेकरुन सॅलेडमध्ये या भाजीचा उपयोग करतात. सध्या भारतामध्ये ही भाजी प्रचर्लित झालेली असून मोठ्मोठ्या पंचताराकिंत हॉलमध्ये तसेच घरी या भाजीचे संप्लेंड तयार करुन जेवणात वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. ब्रोकोलीमध्ये 'भ आणि ‘क’ जीवनसत्चे तसेच कॅल्शियम, लोह उपलब्ध असल्यामुळे ब्रोकोलीला 'सुरक्षित अन्न म्हणून संबोधले जाते.

हवामान

ब्रोकोलीचे  उत्पादन  थंड़ हवामानात अतिशय उत्तम प्रकारें घेता येते. हिंवाळी हगामात लागवड फायदेशीर असते. ज्या भागात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिंकाणीही लागवड करता येते. दिवसाच्या २५ ते २६ अंश सेंग्रे.आणि रात्रीच्या १६ ते १४ अंश सेग्रे. तापमानात ब्रोकलीचे उत्पादन व प्रत अतिशय  चांगली येते.

महाराष्ट्रात ब्रोकली या पैिकाची लागवड अतिशय  कमी क्षेत्रावर आहे. महाराष्ट्रात हे पीक रब्बी(हिंवाळी) हंगामात घेता येते.

जमीन

चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी, मध्यम रेतीमिश्रित  जमीन लागवडीसाठी अतिशय चांगली असते. जमीनीचा सामू  ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा. लागवड़ींच्या अगोदर उभी-आड़वी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमीन अंदाजे ४० सेंमी. खोल नांगरुन ढेकळे फोडून टीलरच्या  सहाय्याने भुसभुशीत करावी. शेवटच्या कृळ्वणीच्या वेळी हेक्टरी  २५ ते ३० टन चांगलें कुजलेले शेणखत टाकून मातींत मिसळून घ्यावे.

हरीतगृहामध्ये लागवड करण्यासाठी  हरितगृहात तयार केलेले माध्यम फॉरमॅलीन  या रसायनाद्वारे निर्जतुक करावे. त्यानंतर ६० सें.मी. रुंद. ३० सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करुन दोन गादीवाफ्यामध्ये ४० सें.मी. अंतर ठेवावे.

रोपे तयार करणे

गादिवाफे पद्धत

गादीवाफ्यावर बी पेरुन रोपे तयार करुन लागवड करूतात. गादीवाफे १ मी. रुंद, २० सें.मी. उंच, १० मी. लांब आकाराचे तयार करण्यासाठी प्रधम जमीन नांगरुन कुळ्वून भुसभुशीत करुन घ्यावी. प्रत्येक गादी वाफ्यात अंदाजे १० ते १५ किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर ५ सें.मी. अंतरावर २ सेंमी. खोलीच्या रेघा भासून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात बिंयांची पेरणी करावी व बारीक शेणखताने बी झाकून घ्यावे. झारीच्या सहाय्याने हलके पाणी द्यावे. हेक्टरी लागवडीसाठी संकरीत  जातीचे ३१२ ग्रॅम बीयाणे लागते. बीयाची उगवण ५ ते ६ दिवसात होऊन ३५ दिवसात पुनरलागवडीसाठी  रोपे तयार होतात.

रोपवाटीकेस पाणी देताना कॅल्शियम नायट्रेट व पोटॅशियम नायट्रेट यांचे मिश्रण प्रत्येकी १ ग्रॅम प्रती लिटर  पाण्यात मिसळून ४ ते १० दिवसाच्या अंतराने द्यावे. रोग व किंडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस असलेल्या किड्नाशकांची फवारणी करावी. प्लॅस्टिक ट्रेमध्ये रोपनिर्मिती या पद्धतीत ट्रेमध्ये कोकोपीट माथ्यम भरुन बी टाकावे. वरीलप्रमाणेच ट्रेमधील बी उगवून आल्यावर रोपांची काळ्जी घ्यावी. पुनर्लागवडीसाठी रोमे २० ते २५ दिवसात तयार होतात. म्हणजे रोपांना ५ ते ६ पाने असून रोपांची उंची १२ ते १५ सें.मी. भासते.

जाती

रॉयलग्रीन ,एव्हरग्रीन ,डॅन्यूब , अव्हेला ,युग्रीस , सलीनास , पिलग्रिम ग्रीन माऊठेन, प्रेिमीयन कॉप, पुसा ब्रोकली, पालम समृद्धी, गणेश ब्रोकली, पुसा केटीएस-१

लागवड

गादी वाफ्यावर दोन ओळींमध्ये ३० × ३० सें.मी. अंतरावर ब्रोकोली रोपांची पुनर्लागन  करावी. हेक्ट्ररी ६६,६६० इतकी रोपे बसतात. लागवड शिफारस केलेल्या कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. सरी-वरूंबा पद्धतीने लागवड ६० x ४५ सें.मी. अंतरावर करावी. हरितगृहातील लागवड प्रत्येक गादी वाफ्यावर 3o × 3o में.मी. अंतरावर करावी.

पाणी व्यवस्थापन

पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने किती व कशाप्रमाणे पाणी द्यावे, ही बाब महत्वाची  आहे . पिकला दररोज किती लिटर पाण्याची संभाव्य गरज आहे, हे प्रथम निश्चित करून दररोज पाणी देण्याचा कार्यक्रम निश्चित करावा.

खत व्यवस्थापन

सर्वप्रथम माती परीक्षण करून जमिनीतील उपलब्ध मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती घ्यावी. साधारणतः हेक्टरी नत्र १५0 कि., स्फुरद १00 कि. आणि पालाश १७0 कि. ही खते देणे आवश्यक आहे. माती परीक्षण अहवालप्रमाणे मॉलिब्डेनम व बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून द्यावीत. बोरॉनची कमतरता असल्यास खोड पोकळ होणे आणि गड्यांचा हिरवा रंग फिकट होणे ही लक्षणे आढळून येतात. उपाय म्हणून लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी एकरी ४ किलो बोरॅक्स (सोडायम टेट्र बोरेट) जमिनीतून द्यावे. लागवडीनंतर ६० दिवसांनी पुन्हा ४ किलो बोरॅक्स जमिनीतून द्यावे.

आंतरमशागत

पुनलागवडीनंतर ३0 दिवसांनी वाफ्यावरील गवत/तण काढून माती ३ ते ४ सें.मी. खोलीपर्यंत हलवून घ्यावी. माती हलविताना रोपांना मातीचा आधार द्यावा. तसेच पुन्हा २० ते २५ दिवसांनी खुरपणी करून वाफे स्वच्छ करून घ्यावेत.

काढणी व उत्पादन

जातीनुसार ब्रोकोलीचा गड्डा ६० ते ७0 दिवसात काढणीस तयार होतो. विक्रीच्या दृष्टीने व चांगला बाजारभाव मिळण्यासाठी गडडयाचा व्यास ८ ते १५ सें.मी. असतानाच काढणी करावी. गडुा घट्ट असताना त्यातील कळ्यांचे फुलांत रूपांतर होण्यापूर्वीच काढणी करावी. गड्डे साधारणपणे १५ सें.मी. लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत. प्रत्येक गड्यांचे वजन सरासरी ३oo ते ४oo ग्रॅम असणे आवश्यक आहे. ब्रोकोलीचे हेक्टरी १९ ते २0 मे.टन उत्पादन मिळते.

किड नियंत्रण

ब्रोकोली पिकावर मावा, तुड्तुडे, काळी माशी, चौकोनी ठिपक्याचा पतंग अशा विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी मॅलेथिऑन १ मिली. किंवा डायमिथोएट १ मि.ली. प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

रोग नियंत्रण

रोप कोलमडणे, घाण्या रोग, करपा, भुरी, केवडा, क्लब रूट आणि ब्लक लेग अशा रोगांचा ब्रोकोली पिकांवर प्रादुर्भाव होतो. या रोगांच्या नियंत्रणासाठी काँपर ऑक्सिक्लोराईड २.५o गॅम किंवा डायथेन एम.४५ २.५0 ग्रॅम किंवा बाविस्टीम १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून ३ ते ४ फवारण्या १o ते १२ दिवसांच्या अंतराने कराव्यात तसेच रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 11/16/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate