অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कांदा

प्रस्‍तावना

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे.  भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर  कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत.  तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकटया नाशिक जिल्‍हयात घेतले जाते.

हवामान

कांदा हेक्‍टरी हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्‍ट्रातील सौम्‍य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्‍त असते.

जमीन

पाण्‍याचा उत्‍महिन्‍यातम निचरा असणारी भुसभूशीत जमिन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्‍यम ते कसदार जमिन कांद्याला चांगली मानवते.

पुर्वमशागत

जमीनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाचे पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भूसभुशित करावी. जमिनीत हेक्‍टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे.

लागवड हंगाम

महाराष्‍ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करतात.

वाण

बसवंत ७८० :  खरीप व रब्‍बी हंगामासाठी ही जात योग्‍य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्‍यमहिन्‍यात ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

एन – ५३ :  ही जात खरीप हंगामासाठी योग्‍य आहे. 100 ते 150 दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लाल भडक असतो. हेक्‍टरी उत्‍पादन 200 ते 250 क्विंटल मिळते.

एन- 2-4-१ :  ही जात रब्‍बी हंगामासाठी योग्‍य असून रंग  भगवा व विटकरी आहे. कांदा आकाराने मध्‍यम गोल असून साठवणूकींत हा कांदा अतिशय चांगल्‍या प्रकारे टिकतो. ही जात 120 ते 130 दिवसांत तयार होते. हेक्‍टरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल मिळते.

पुसा रेड :  कांदे मध्‍यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्‍यम तिखट असतात. लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

बियाण्‍याचे प्रमाण

हेक्‍टरी कांद्याचे 10 किलो बियाणे पुरेसे असते.

लागवड

कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणा-या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्‍या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी. गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा. वाफयातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. वाफयाच्‍या रूंदीशी  समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्‍यात. आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे. बी उगवून येईपर्यंत.

झारीने पाणी घालावे. बी उगवल्‍यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. फुलकिडे व करपा यांच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायथेनएम 45 तसेच 50 ग्रॅम युरीया व 10 मिली सॅडोवीट यासारखी चिकट द्रव्‍ये मिसळून दर 10 दिवसांच्‍या अंतराने 4 ते 5 फवारण्‍या कराव्‍यात. रोपांना हरब-यासाठी गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्‍य समजावे. खरीप कांदयाची रोपे 6 ते 7 आठवडयांनी व रब्‍बीची 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात. रोपे काढण्‍यापूर्वी 24 तास अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे. कांदयाची लागवड गादी वाफयावर तसेच सरी वरंब्‍यावर करता येते. सपाट वाफयामध्‍ये हेक्‍टरी रोपांचे प्रमाण जास्‍त असले तरी मध्‍यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्‍पादन मिळते. सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी. रोपांची लागवड सकाळी अथवा संध्‍याकाळी करावी. रोपांची लागवड 12.5 बाय 7.5 सेमी अंतरावर करावी.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

कांदा पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्‍फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्‍या वेळी घ्‍यावे. त्‍यानंतर 1 महिन्‍याने 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.

आंतरमशागत

रोपांच्‍या लागवडीनंतर शेतात तण दिसल्‍यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी 3 आठवडयांअगोदर पाणी बंद करावे म्‍हणजे पानातील रस कांद्यामध्‍ये लवकर उतरतो आण माना पडून कांदा काढणीस तयार होतो.

रोग व कीड

कांदयावर प्रमुख रोग म्‍हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चटटे पडतात. शेंडयापासून पाने जळाल्‍ यासारखी दिसतात. खरीप कांदयावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. फूलकिडे किंवा अळया हेक्‍टरी अगदी लहान आकाराचे किटक पातीवरील तेलकट पृष्‍टभागात खरडतात. व त्‍यात स्‍त्रवणारा रस शोषतात. त्‍यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.

उपाय

फुलकिडे व करपा रोगाच्‍या नियंत्रणासाठी पुनर्लाण केल्‍यानंतर दोन तीन आठवडयांनी प्रती हेक्‍टरी फॉस्‍फॉमिडॉन 85 डब्‍ल्‍यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्‍ल्‍यू एस.सी. 550 मिली अधिक डायथेन एम 45, 75 डब्‍ल्‍यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायथेन झेड – 78, 75 डब्‍ल्‍यू डी पी 1000 ग्रॅम अधक 500  ग्रॅम सॅडोवीट चिकट द्रव्‍य 500 लिटर पाण्‍यात मिसळून पाहिली फवारणी करावी. पहिल्‍या फवारणी नंतर तीन चार आठवडयांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीच्‍या वेळी प्रती हेक्‍टरी फॉस्‍फोमिडॉन 85 डब्‍ल्‍यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्‍ल्‍यू. एस.सी. 550 मिली अधिक कॉपर ऑक्झिक्‍लोराईड 50 डब्‍ल्‍यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायिन झेड 78, 75 डब्‍ल्‍यू.डी. पी. 1000 ग्रॅम 500 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

काढणी व उत्‍पादन

कांदयांचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्‍यात काढणीस तयार होते. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते. यालाच मान मोडणे असे म्‍हणतात.  60 ते 75 टक्‍के माना मोडल्‍यावर कांदा काढणीस पक्‍व झाला असे समजावे. कुदळीच्‍या साहारूयाने आजूबाजूची जमिनी सैल करून कांदे उपटून काढावेत. काढणीनंतर 4, 5 दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान लहान ढिगा-याच्‍या रूपाने ठेवावा. नंतर कांदयाची पात व मळे कापावे. पात कापताना 3 ते 4 सेमी लांबीचा देठ ठेवून पात कापावी. यानंतर कांदा 4 ते 5 दिवस सावलीत सुकवावा. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

स्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate