অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माशांच्या पिल्लांचे व बोट्यांचे उत्पादन

माशांच्या पिल्लांचे व बोट्यांचे उत्पादन

पाण्यातील शेती यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी आवश्‍यक त्या प्रमाणात इच्छित प्रजातींचे बियाणे उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असते. गेल्या काही वर्षांमध्ये माशांच्या नवजात पिल्लांचे उत्पादनाचे प्रमाण वाढले असले तरीही इच्छित आकाराचे बियाणे मिळणे अजूनही कठीण आहे. माशांच्या पिलांच्या संगोपनामध्ये 72-96 तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात पिलांचा समावेश होतो, जी नुकतीच खाऊ लागलेली असतात. ही पिल्ले सुमारे 15-20 दिवसांच्या कालावधीसाठी खात असतात ज्या दरम्यान ती सुमारे 25-30 मि.मी.. लांबीची होतात. ही पिल्ले नंतर दुसर्‍या एका तलावामध्ये त्यांचे रुपांतर बोट्यांमध्ये होईपर्यंत २-३ महिन्यांसाठी संगोपित केली जातात. बोट्यांमध्ये रुपांतरित झालेली पिल्ले सुमारे 100 मि.मी.. एवढ्या आकाराची असतात.

नर्सरी तलावाचे व्यवस्थापन


नर्सरींसाठी 0.02-0.10 हेक्टर क्षेत्रफळांचे आणि 1 ते 1.5 मी. खोल असणारे तलाव उत्तम मानले जातात. मात्र 0.5 हेक्टरपर्यंत क्षेत्रफळ असणारा तलावही व्यावसायिक उत्पादनासाठी वापरला जाऊ शकतो. पिलांचे नर्सरीमध्ये संगोपन करण्यासाठी पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था असणारे आणि नसणारे मातीचे तलाव किंवा सिमेंटच्या टाक्या यांपैकी एकाचा वापर केला जातो. नर्सरीमध्ये माशांच्या पिलांच्‍या संगोपनाचे टप्‍पे पुढीलप्रमाणे आहेत:

साठवण्यापूर्वी तलावाची तयारी

पाणवन्स्पती नष्ट करणे: माशांच्या तलावामध्ये पाणवनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होता कामा नये कारण या वनस्पती पाण्यातील पोषकद्रव्ये मोठ्या प्रमाणात शोषून घेतात ज्यामुळे तलावाची उत्पादनक्षमता कमी होते शिवाय या वनस्पतींमुळे इतर भक्षक प्राण्यांना पाण्यात वास्तव्य करण्यास मदत मिळते आणि अशा माशांमुळे आणि कीटकांमुळे माशांना मुक्‍तपणे फिरण्यास अवरोध होतो. म्हणूनच तलाव तयार करताना त्यातील पाणवनस्‍पती काढून टाकणे ही सर्वात पहिले कार्य आहे. साधारणपणे, छोटे तलाव किंवा नर्सरी यांमध्ये हे काम मुख्यत्वे हातानेच केले जाते कारण त्यांचा आकार लहान असतो. मोठ्या तलावांमध्ये पाणवनस्‍पतींचे उन्‍मूलन करण्‍यासाठी यांत्रिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय पद्धतीही वापरल्या जाऊ शकतात.

Fish 5.jpg
नर्सरी-टाक्यांचे दृश्य

भक्षक आणि इतर अनैच्छिक माशांना काढून टाकणे

तलावांमध्ये साप, कासवे, बेडूक, पक्षी यांसारख्या भक्षकांसोबतच इतर भक्षक/अवांछित मासे उपस्थित असणे माशांच्या छोट्या पिलांसाठी घातक असतेच शिवाय त्यामुळे त्यांना जागेचा आणि प्राणवायूचा (ऑक्सीजनचा) ही पुरेसा पुरवठा होण्यास त्रास होतो. तलावांतील पाणी काढून टाकणे व ते वाळविणे किंवा योग्य ते मत्स्यनाशक वापरणे यासारखे उपाय वापरून भक्षक आणि इतर अवांछित जीवांना काढून टाकता येईल. मासे साठवण्यापूर्वी महुआच्या तेलाच्या मळीचा 2500 कि.ग्रा./हेक्टर या प्रमाणात तीन आठवड्यांसाठी वापर करूनही उत्तम परिणाम साधता येईल. ही तेलाची मळी मत्स्यनाशक म्हणून काम करतेच शिवाय ते विघटन झाल्यावर एक उत्तम जैविक खत म्हणून देखील कार्य करते आणि नैसर्गिक उत्पादकता वाढवते. 350 कि.ग्रा./हेक्टर-मी. या दराने व्यावसायिक ब्‍लीचींग पावडर (30% क्लोरिन) वापरणे देखील माशांना मारण्यास प्रभावी ठरते. 100 कि.ग्रा./हेक्टर-मी. या दराने यूरिया वापरल्यास ब्‍लीचींग पावडर निम्म्या प्रमाणात वापरली जाऊ शकते. यासाठी ब्‍लीचींग पावडर वापरण्याच्या 18-24 तास आधी यूरिया वापरणे गरजेचे आहे.

तलावासाठी खत

शैवाल (प्लॅंक्टन) हे माशांचे नैसर्गिक खाद्य आहे. संस्करित तलावांमध्ये खत वापरून ते तयार करता येते. ते तयार करण्यासाठी वापरण्‍यात येणार्‍या तलावांना नको असलेले भक्षक आणि तण काढून टाकल्यानंतर मातीच्या pH नुसार आतून चुना लावतात. त्यानंतर त्यात शेण, पोल्ट्रीमधील विष्ठा यांसारखे जैविक खत किंवा इतर अजैविक खत किंवा दोन्ही एकामागून एक याप्रमाणे टाकले जाते. योग्य शैवाल उगविण्यासाठी दरहेक्टरी 750 कि.ग्रा. शेंगदाण्याच्या तेलाची मळी, 200 कि.ग्रा. शेण आणि 50 कि.ग्रा. सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण खूप प्रभावशाली मानले जाते. या मिश्रणापैकी निम्मे मिश्रण पाण्यात व्यवस्थित मिसळून त्याची टूथपेस्टसारखी घट्ट पेस्ट केली जाते आणि साठवणीपूर्वी 2-3 दिवस संपूर्ण नर्सरीमध्ये पसरवली जाते. उरलेले मिश्रण 2-3 डोसच्या स्वरूपात तलावातील शैवालाच्‍या (प्लँक्टनच्या) पातळीनुसार वापरण्‍यात येते.

Fish 6.jpg
माशाचे पिल्लू

जलकीटकांचे नियंत्रण

पाण्यातील कीटक आणि त्यांचे लार्वा लहान वाढणार्‍या माशांबरोबर खाद्य मिळविण्यासाठी स्पर्धा करतात त्यामुळे नर्सरीचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. साबण-तेलाचे मिश्रण (स्वस्तातील वनस्पती तेल 56 कि.ग्रा./हेक्टर या दराने आणि त्याच्या 1/3 इतका स्वस्तातील साबण) वापरणे हा यावर सर्वांत सोपा उपाय आहे. दरहेक्टरी 100-200 लीटर घासलेट (केरोसिन) किंवा 75 लीटर डिझेल आणि 560 मि.ली. द्रवरूप साबण किंवा 2-3 कि.ग्रा. कपडे धुण्याची पावडरसुध्‍दा यासाठी वापरली जाऊ शकते.

साठवण

तीन दिवस उबविल्यानंतर नवजात पिल्ले नर्सरीमध्ये पाठवली जातात. पिलांना नव्या पर्यावरणाशी जुळवून घेता यावे म्‍हणून ही प्रक्रिया साधारणतः सकाळी करण्‍यात येते. मातीच्या नर्सरीमध्ये नवजात पिलांची घनता दरहेक्टरी 35-50 लाख असावी. सिमेंटच्या टाक्यांमध्ये हीच क्षमता 1-2 कोटी एवढी असू शकते. नर्सरीमध्ये शक्यतो एकाच प्रजातीच्या माशांची शेती करावी असे सांगितले जाते.

साठवणीनंतरचे तलावाचे व्यवस्थापन

संस्करणाच्या 15 दिवसांच्या कालावधीत 2-3 विभाजित डोसच्या स्वरूपात टप्प्या-टप्प्याने आधी सांगितल्याप्रमाणे खत द्यावे. शेंगदाण्याच्या मळीची आणि भाताच्या पेंडीची 1:1 या वजनी प्रमाणात बारीक पूड करून ती पहिल्या 5 दिवसांसाठी 6 कि.ग्रा./10 लाख या दराने पुरवणी खाद्य म्हणून दिली जाते. त्यानंतर दर एक दिवसाआड 12 कि.ग्रा./10 लाख नवजात पिल्ले या दराने दिवसाला दोन समान वाट्यांमध्ये द्यावी. संगोपनाच्या शास्त्रीय पद्धती वापरून 15 दिवसांत पिलांचा आकार 20-25 मि.मी. एवढा होतो तसेच त्यांचा जगण्याचा दरही 40-60% एवढा होतो. नर्सरी संगोपनाचा काळ 15 दिवसच असल्याने हीच नर्सरी अनेक माशांचे उत्पादन घेण्यासाठी वापरली जाऊ शकते. (मातीची 2-3 प्रजाती आणि सिमेंटची 4-5 प्रजाती).

बोट्यांचे संगोपन आणि व्यवस्थापन

नर्सरीपेक्षा आकाराने मोठा, शक्यतो ०.२ हेक्टरपर्यंत क्षेत्रफळ असणारा तलाव यासाठी वापरला जातो. यातील विविध टप्पे खालीलप्रमाणे:

साठवण्यापूर्वी तलावाची तयारी

पाणवनस्पती नष्ट करणे आणि तलाव भक्षकमुक्त करणे या पद्धती नर्सरीच्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणेच केल्या जातात. कीटक नियंत्रणाच्या पद्धती याठिकाणी वापरणे तसे आवश्यक नसते. जैविक आणि अजैविक खते वापरून तलाव सुपीक करता येतो. या खतांची मात्रा मासे मारण्यासाठी वापरलेल्या मत्स्यनाशकावर अवलंबून असते. महुआच्या तेलाची मळी मत्स्यनाशक म्हणून वापरल्यास शेणखताचे प्रमाण दरहेक्टरी केवळ 5 टन पुरेसे असते मात्र खतांचे कोणतेही पोषणमूल्य नसणारी मत्स्यनाशके वापरल्यास शेणखत सामान्यतः दरहेक्टरी 10 टन इतके वापरावे लागते. एकूण मात्रेच्या एक तृतीयांश मात्रा साठवणीच्या 15 दिवस आधी दिली जाते तर उर्वरीत मात्रा पंधरा-पंधरा दिवसांनी दिली जाते. यूरिया आणि सिंगल सुपर फॉफ्सेट यांची अनुक्रमे 200 किलो आणि 300 किलो/हे/वर्ष मात्रासुध्‍दा पंधरवड्याच्या अंतराने विभागून देण्याची शिफारस करण्‍यात येते.

Fish 7.jpg
माशांच्या बोट्या

बोट्यांची साठवण

बोट्यांच्या साठवणीचा दर प्रामुख्याने तलावाची उत्पादकता आणि वापर करण्‍यात येणार्‍या व्यवस्थापन पद्धती यांवर ठरते. बोट्यांसाठी साठवण घनता साधारणपणे 1-3 लाख/हेक्टर अशी आहे. नर्सरीच्या टप्प्यात एकावेळी केवळ एकाच प्रजातीचे संगोपन केले जाऊ शकते तर बोट्या संगोपनात मात्र वेगवेगळ्या मत्स्य प्रजातींचे पालन करता येते.

साठवणीनंतरचे तलावाचे व्यवस्थापन

बोट्यापालनासाठी 5-10% एवढा खाद्य दराचा वापर करतात. बहुतेक अशा परिस्थितींमध्ये पुरवणी खाद्य 1:1 प्रमाणात असणार्‍या शेंगदाणा मळी आणि भाताची पेंड इतपतच मर्यादित असते मात्र येथे चारा म्हणून काही अपारंपारिक पदार्थसुध्‍दा वापरता येतात. तलावात गवती मासे पाळले असतील तर त्यांना वोल्फिया, लेम्ना, स्पायरोडेला यांसारख्या वनस्पतींचे खाद्य द्यावे. पाण्याची पातळी 1.5 मी. पर्यंत खोल ठेवणे, अधूनमधून खते देणे ह्या इतर व्यवस्थापन पद्धती आहेत. मत्स्यपालनाच्या शास्त्रीय पद्धती वापरून बोट्या 80-1000 मि.मी./८-९ ग्राम एवढ्या वाढवल्या जाऊ शकतात आणि त्यांच्या जगण्याचा दरसुध्‍दा 70-90% पर्यंत नेता येतो.

पिल्ले संगोपनाचे अर्थशास्त्र

अनु.क्र.

विषयवस्तु

किंमत
(रूपयांमध्ये)

I.

खर्च

A.

अस्थिर किंमत

 

1.

तलाव लीज खर्च

5,000

2.

ब्लीचिंग पावडर (10 ppm क्लोराईड)/इतर विषारी पदार्थ

2,500

3.

खते व उर्वरके

8,000

4.

अंडी (10 लाखांना रु. 5000 प्रमाणे 50 लाख)

25,000

5.

पुरवणी खाद्य (10 रु. कि.ग्रा. दराने 750 कि.ग्रा.)

7,500

6.

व्यवस्थापन आणि साठवणीसाठी कामगारखर्च (100 माणसे दररोज माणशी रू.50 या दराने)

5,000

7.

इतर खर्च

5,000

 

एकूण खर्च

58,000

B.

एकूण किंमत

1.

अस्थिर किंमत

58,000

2.

अस्थिर किंमतीवरील व्याज (वार्षिक 15% दराने एक महिन्यासाठी)

0.725

संपूर्ण बेरीज

58,725
» 59.000

II.

निव्वळ उत्पन्न

पिल्ले विकून (15 लाख पिल्ले दर-लक्ष रु. 7000 या दराने)

1,05,000

III.

एकूण उत्पन्न (निव्वळ परतावा-एकूण किंमत)

46,000

जून ते ऑगस्‍ट अशा एका मान्सून मोसमामध्ये किमान दोन मत्स्य प्रजातींचे पालन करता येते. म्हणून एक हेक्टर पाण्याच्या क्षेत्रफळातून दोन मासेपीक वापरून मिळणारे एकूण उत्पन्न रू. 92000 असेल.

बोट्या संगोपनाचे अर्थशास्त्र

अनु.क्र.

विषयवस्‍तु

किंमत (रूपयांमध्ये)

I.

खर्च

 

A.

अस्थिर किंमत

1.

तलाव लीज खर्च

10,000

2.

ब्लीचिंग पावडर (10 ppm क्लोराईड)/इतर विषारी पदार्थ

2,500

3.

खते व उर्वरके

3,500

4.

पिल्ले (दर लक्ष रु. 7000 प्रमाणे 3 लाख)

21,000

5.

पुरवणी खाद्य (7000 रु. टन दराने 5 टन)

35,000

6.

कामगारखर्च (100 माणसे दर रोज माणशी रु. 50 या दराने)

5,000

7.

इतर खर्च

3,000

एकूण खर्च

80,000

 

B.

एकूण किंमत

1.

अस्थिर किंमत

80,000

2.

वार्षिक 15% दराने तीन महिन्यांसाठी आवृत्ती खर्चावरील व्याज

3,000

संपूर्ण बेरीज

83,000

II.

निव्वळ उत्पन्न

 

बोट्या विकून (2.1 लाख बोट्या दर हजार रु. 500 या दराने)

1,05,000

 

III.

एकूण उत्पन्न (निव्वळ परतावा-एकूण किंमत)

22,000

स्त्रोत: सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर, ओरिसा

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate