Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 03:45:37.572002 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / शोभिवंत माशांची निर्यात
शेअर करा

T3 2019/05/21 03:45:37.576710 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 03:45:37.599837 GMT+0530

शोभिवंत माशांची निर्यात

जागतिक बाजारपेठेतील शोभिवंत माशांची मागणी लक्षात घेऊन केरळमधील मत्स्य उत्पादकांनी शोभिवंत माशांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे.

जागतिक बाजारपेठेतील शोभिवंत माशांची मागणी लक्षात घेऊन केरळमधील मत्स्य उत्पादका ंनी शोभिवंत माशांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत देशाचा विचार करता केरळ शोभिवंत माशांच्या निर्यातीमध्ये आघाडी घेईल अशी शक्‍यता मत्स्योद्योग मंत्री एस. शर्मा यांनी व्यक्त केली.

केरळमधील अलुवा येथे मत्स्य उद्योग समूहाची सुरवात करण्यात आली. या वेळी श्री. शर्मा बोलत होते. ते म्हणाले, की भारतातून जपान, इटाली आणि फ्रान्सला निर्यात होते; परंतु जाग तिक पातळीवर भारताचा शोभिवंत निर्यातीमधील वाटा एक टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. श्रीलंकेचा वाटा जवळपास आठ टक्के आहे. येत्या काळात जागतिक बाजारपेठेत मत्स्य निर्यात वाढीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने मत्स्योद्योगाला चालना देण्यात येणार आहे. त्यात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीबरोबरीने शोभिवंत मत्स्यपालनासाठी विशेष योजना राबविली जाणार आहे.

जगात शोभिवंत माशांच्या सुमारे सहाशे जाती अस्तित्वात असून, त्यातील 100 जाती आपल्या देशात सापडतात. या शिवाय परदेशातील सुमारे 100 जातींचे शोभिवंत मासे भारतात प्रजननाकरिता वापरतात. शोभिवंत माशांमध्ये गप्पी, मोली, स्वोर्ड टेल, प्लॅटी, कार्पस, गोल्ड फिश, बार्ब, डॅनिओ, टेटा, गोरामी, सिकलीड या जाती महत्त्वाच्या आहेत.

स्त्रोत: अग्रोवन

3.0303030303
हर्षल पाटील Jan 06, 2017 02:30 PM

या विषयीची माहीती व प्रशिक्षण मिळेल का
९८५००६२३८२
नालासोपारा

तुषार बाबर Nov 21, 2016 01:40 PM

या विषयीची माहीती व प्रशिक्षण मिळेल का

विठाबाई जगताप Oct 04, 2016 11:57 PM

मला शोभिवंत माशांचा व्यवसाय करायचा आहे त्या करता मासे पाहिजे आहे

राजीव भ आयरे Apr 27, 2015 10:16 PM

मला शोभीवंत माशांचा व्यवसाय कराय चा आहे त्या करीता बिज व मासे पाहीजे आहेत

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/21 03:45:37.804640 GMT+0530

T24 2019/05/21 03:45:37.810299 GMT+0530
Back to top

T12019/05/21 03:45:37.492470 GMT+0530

T612019/05/21 03:45:37.508742 GMT+0530

T622019/05/21 03:45:37.561928 GMT+0530

T632019/05/21 03:45:37.562810 GMT+0530